हरिद्वार :देवभूमीचे प्रवेश द्वार:

हरिद्वार :देवभूमीचे प्रवेश द्वार:


'शिवंजय': डॉ संजय होनकळसे ©

हरिद्वार : हरीचे द्वार .वैष्णव व शैव यांचे साठी केदार नाथ व बद्रीनाथ येथे जाण्या साठी प्रवेश द्वार म्हणून 'हरि'द्वार वा 'हर'द्वार.
येथे गंगा 3139 मीटर एवढ्या उंचीवरून 353 कि मी चा दऱ्या डोंगरांतून प्रवास करत प्रथम पठारावर येते म्हणून या नगरीस 'गंगा'द्वार असे पण म्हणतात. महाभारतात हरीद्वारचा उल्लेख गंगाद्वार असा आहे ,म्हणजेच गंगा द्वार हे हरीद्वारच प्राचीन नाव आहे व त्या अर्थाने हि प्राचीन नगरी आहे .
हिला कपिला असेही म्हणतात कारण येथे कपिल मुनींच तपस्थली होती. तसेच हिला मायापुरी या नावाने पण ओळख प्राप्त आहे सात मोक्षपूऱ्यांपैकी हि एक मोक्ष पुरी आहे.हरीद्वारचा हरिद्वार असा प्रथम उल्लेख पद्मपूराणात आढळतो.
अशा विविध नावाने  ज्ञात असलेली ही नगरी
श्रद्धाळूंचे  पवित्र स्थान आहे.एकदा तरी  हरीद्वारच्या हर कि पौडीत स्नान करून कृत कृत्य होण्याची आंस घेऊन इथे येतात.गंगा स्नाना बरोबर आनंदाश्रूंनी न्हाहून निघताना मी अनेकानेक लोकांना अनेकानेक वेळा पाहणारा मी मूक साक्षीदार आहे कारण माझे हरीद्वारशी काय पूर्व अनुबंध,प्रेमानुबंध ऋणानुबंध आहेत हे त्या चित्रगुप्तासच  ठाऊक,मी अनेकानेक वेळा अनेकानेक आप्तमित्रांसह इथे गंगा स्नानाचा लाभास्वाद घेत आलो आहे.
मला स्वच्छ आठवते  मी पहिल्यांदा येथे माझ्या महाविद्यालयीन मौसमात आलो होतोते आल इंडिया स्टुडंट्स लीडर्स च्या अधिवेशनासाठी आलो होतो.Earner n learner होतो .त्यावेळी मी प्रथम प्रथम गंगा स्नान केले ते या हरिद्वारच्या हर कि पौडित व त्या नंतर हा असा 'सिलसिला' आजतागायत सुरु आहे.
माझ्या गंगा स्नानांची सुरुवात रुजुवातच हरिद्वार ला झाली व आता लक्षांत येतेय कि हरिद्वार स्नान अत्यंत दुर्लभ आहे कारण:

सर्वत्र सुलभा गंगा त्रिषु स्थानेषु दुर्लभा।


गंगाद्वारे प्रयागे च गंगासागरसंगमे।तत्र स्नात्वा दिवं यान्ति ये मृतास्तेऽपुनर्भवाः ।।

येथील स्नान हे देवांनाही दुर्लभ आहे ,गंगास्नान हे तीन ठिकाणी दुर्लभ आहे  हरिद्वार ,प्रयाग व गंगासागर येथे. येथे स्नान करणारे दिव्य लोक प्राप्त करतात व त्यांचा पुनर्जन्म होत नाही.
सुदैवाने व सद्गुरू कृपेने मी गौमुख ,गंगोत्री पासून ते गंगासागर पर्यन्त सर्व प्रमुख किनाऱ्यांवर स्नान करवून घेतला गेलोय .एवढे कि गौमुख ते गंगासागर नावाची लेख माला लिहण्याचे इच्छा गेली 20 सातशे बाळगून आहे.महावतार बाबाजी(मराठी ,इंग्रजी व हिंदीत) , सिद्ध व सिद्धाश्रम यावर लिझन प्रकाशित करवून घेतले गेले आहेच,व आध्यात्मिक विकासात्मांक व त्याद्वारे व्यक्तिमत्व व्यवस्थान याविषयावर Management By Spiritual Quotient :The Power of Faith नावाचे पुस्तक  (https://www.amazon.in/Management-Spiritual-Quotient-Power-Faith/dp/1448970148?tag=googinhydr18418-21) हि इंग्रजीत प्रकाशित करवलेय।मराठीतही करण्याची तयारीच्छा आहे.
मी येथे येऊन स्नान करण्यास आढे वेढे घेणारे कित्येक पाहिलेत,उघडयावर स्नान कसे करायचे?, पाण्यात सिलिकॉनच असते, ,कुणीही स्नान करत असल्याने पाणी खराबच असते इ ,तर कुणी इथे येऊन आजारीच पडतात व स्नान टळते. तर कुणी नुसतं पाणी प्रोक्षणाने समाधान मानतात. म्हणून मी माझट बरोबर येणाऱ्या सर्वाना अगदी आई बहिणी पासून विद्यार्थी ,मित्र यांना यथेच्छ डुंबायची ओढ लावली .त्याचे अध्यात्मिक भौतिक फायदे सांगितले व अनुभवयास दिले.वाटर थेरपी ,पाणी चिकित्सा जल स्नानवर आर्टिकल्स लिहिली. गंगास्नान क्षीण हरते ,फ्रेश करते .मार्क ट्वेन व ह्युएन स्यांग  यांनी  गंगेची भरभरून स्तुती व कौतुक केलेय, गंगेच पाणी हजारों वर्ष स्वच्छ शुद्ध राहते इतर कुठच्याही पाणी खराब होते.आंमचे ज्येष्ठ महाविद्यालयीन मित्र  श्री संजय केळकर व p k.आळशी हे अनेकदा येथे येऊन स्नान करते झालेत व आताही फक्त गंगा स्नानासाठी ते माझ्या
बरोबर येऊन  तीन दिवस मनसोक्त आनंदात तरंगत होते.
मी स्वतः 'शिवंजय': संजय गेली अनेक वर्षे कमीत कमी 65  वेळा हिमगिरी भ्रमणास येता केला गेलोय ,प्रत्येक वेळी  जाताना हरिद्वार पासून गौमुख व केदार बद्री पर्यंत मिळेल त्या गंगा किनारी जाता येता कित्येक आप्तजनासह गंगास्नान स्वर्गीय सुख अनुभवित आहे.
हरिद्वार हि कुंभ नगरी पण आहे येथे  गुरु कुंभ राशीत आल्यावर दार 12 वर्षांनी जागतिक किर्तीव दर्जाचा कुंभ मेळा व त्यादरम्यान सहा वर्षांनी अर्ध कुंभ मेळा भरतो.कुठल्याही फॉर्मल invitation शिवाय आलेल्या  जगभरातील  श्रद्धाळूंन पवित्र स्नान तेही साग्रसंगीत शाही स्नान करण्याचा भाग्ययोग सद्गुरुकृपेने मला दोन वेळा प्रत्येकी चारही कुंभ नगरीत प्राप्त झालाय.हरिद्वार स्टेशन ते हरकी पोडीपर्यंत दोन रस्ते upper बाजार व lower बाजार बारमाही गजबजलेले असूनही कलकलाट रोहित असतात ,अनेकानेक धर्मशील ,आश्रम ,मंदिरे मनसादेवी,चण्डिदेवी ,सप्तऋषी आश्रम ,शांती कुंज,पतंजली आश्रम येथे स्थित आहेत .प्रसिद्ध ठिकाण जेथे प्रजापाटीने यद्न्य जेल व माता सती सती गेली ते ठिकाणही येथेच आहे त्यावर वेगळे विस्तृत लिखाण होईल.
अशा या गंगानगरीस व गंगेस माझे अनंत कोटी नमन ,भाव तोचि देव याचे साक्षात पुरावा व अनुभव ,अनुभूती  देणाऱ्या स्वर्गातून धर्तीवर आलेल्या एकमेवाद्वितीय गंगेस वंदन .
मानो तो गंगा मा है ।
ना मानो तो बहता पानी।।
©
'शिवंजय':डॉ संजय होनकळसे
shivanjaydrsanjayhonkalse. blogspot.com
drsanhayhonkalse.tripod.com

Comments

Popular posts from this blog

कृष्णसखा उद्धव

पितृशास्त्र भाग 10:"पितृपक्ष: निषिद्ध कार्य :चुकून नका करू हे  काम*

केल्याने देशाटन.......|