दुर्मिळ ,दुर्धर व दुर्लभ अति वरद दर्शन:40 वर्षातून एकदाच होऊ शकणारे मोक्ष व प्रगतिकारक उत्सव दर्शन

दुर्मिळ ,दुर्धर व दुर्लभ अति  वरद दर्शन:40 वर्षातून एकदाच होऊ शकणारे मोक्ष व प्रगतिकारक उत्सव दर्शन
'शिवंजय':डॉ. संजय होनकळसे
'शिवंजय':डॉ. संजय होनकळसे

‌  कांचीपुरम हे सप्त मोक्षपूऱ्यांपैकी एकपुरी.मनी ध्यानी,स्वप्नी नसताना 12 ज्योतिर्लिंगाच्या 36 वाऱ्याच्या अनुषंगाने इतर अनेकानेक उच्चस्तरीय धार्मिस्थळांसह (जसे एक ओंकार पर्वत,मानसरोवर,त्रिस्थळी,चारधाम, पंच केदार पंच बदरी,पंच प्रयाग,षष्ठ कार्तिकेय स्थाने,सप्त नद्या,सप्त कैलास,अष्ट नारायण,अष्ट विनायक नव दुर्गा,दश विद्या,11 रुद्र,12 ज्योतिर्लिंग प्रत्येकी 36 वेळा, 33 शक्ती पीठे व 30 पितृ स्थान)या बरोबरच सप्त पुऱ्यांची दर्शन सेवाही 3 ,3 वेळा परमपित्या,परम दयाळू, परमात्म्याने  करवून,घडऊन घेतल्या. या अनुभवावर आधारित अध्यात्मान्कद्वारे व्यवस्थान याविषयावर इंग्लिशमध्ये पुस्तक[Management by Spiritual Quotient :Power of Faith :https://www. amaz on.in/Management-Spiritual-Quotient-Power-Faith/dp/1448970148?tag= googinhy dr18418-21)
त्यातील तामिळनाडूतील कांचीपुर हे  देवळांचे माहेरघर आहे कारण शिवशक्ती व विष्णूसह इतर देवतांची येथे 1008 देवळे आहेत,शिव कांची व विष्णू कांची या दोन ,जुळ्या मोक्षपुऱ्यात.
विष्णूकांची येथे विष्णूचे वरदराज मंदिर(हे 108 दिव्य विष्णूस्थानांपैकी एक आहे) हे वैष्णवांसाठी जुलै ऑगस्ट 2019 या दरम्यान वैशिष्ठ्यपूर्ण ठरत आहे.कारण40 वर्षातून एकदाच येणारा  "अति वरद उत्सव" सोहळा साजरा होत आहे. साधारण दिवसास 2 ते 3 लाख वैष्णव व भाविक येथे आपला माथा टेकायला येत आहेत.
9 फूट उंच असलेली औदुंबराच्या झाडापासून ब्रह्मदेवाने बनवून घेतलेल्या विष्णूच्या चार मूर्त्यांपैकी एक मूर्ती हि येथील सरोवर ,पुष्करीणी जीचं नाव अनंत सरोवर आहे त्यातून  उत्सवपूर्वक बाहेर काढून तिची 48 दिवस पुजाउत्सव दर्शन करवले जाते.असा हा सोहळा 40 वर्षातून एकदा म्हणजे मानवी आयुष्यात दोनदा, फारतर तीनदा (120 आयुष्यमान धरल्यास) येउ शकतो.
अतिवरद विष्णू मूर्ती हि औदुंबराच्या झाडा पासून ब्रह्मदेवांनी बनवून घेलेल्या 4 मूर्तीं पैकी एक सत्य युगीन मूर्ती आहे .

त्याची कथा अशी आहे :

सरस्वतीने एकदा ब्रह्मास विचारले की सरस्वती व लक्ष्मी यांत कोण शक्तिमान आहे.यावर देवांनी लक्ष्मीच्या बाजूने कौल दिल्यावर सरस्वती रागवून  सोडून निघून गेली.नंतर एकदा ब्रह्मदेवांनी केलेल्या अश्व मेध यज्ञात विघ्न आणण्यासाठी सरस्वतीने वेगवती नदीचे रौद्ररूप धारण केले. तेंव्हा विष्णूने प्रकट होऊन तिला थोपवले व यद्न्य सुरु राहिला.तेंव्हा ब्रह्माने विश्वकर्मांकडून औदुंबरपासून चार मूर्ती घडवून घेतल्या त्यातील हि मूर्ती आहे जीची कांचीस मुख्य देवता म्हणून स्थापना झाली व त्या भागास विष्णू कांची हे नाव पडले.सं संस्कृत मध्ये औदुंबरास अति ,तामिळ मध्ये अथी म्हणतात व विष्णूस वरदराज वर देणारा राजा म्हणून ही अति वरद मूर्ती म्हणून प्रसिद्ध आहे.
हि मूर्ती येथील प्रमुख मूर्ती होती ती 16व्या शतकापर्यंत स्थापित होती.दर्शनास खुली होती.
सोळाव्या शतकात (1669)हि तेथील अनंत सरोवरात लपवून ठेवली गेली ती तेथील दत्तात्रेय परंपरेतील उपासक पुजारी यांच्या मार्फत ती सरोवरात लपवली गेली. दुर्दैवाने तिचा ठाव विसरला गेला ,ते पुजारी  निधन पावला ,मग त्यांच्या वंशजांनी पण प्रयत्न केला पण ....... ...
म्हणून मग अत्रि ऋषींनी बनवलेली  व पुजलेली मूर्ती देवळांत स्थापित केली  ती अगदी औदुंबराच्या मूर्तीसारखीच दिसते जी आजही तेथे मुख्य दर्शनासाठी  आहे.
अचानक 1709 साली सरोवर साफ केले गेले तेंव्हा एक नागपाश रूप पेटीत मूळ मूर्ती सापडली .
मूर्ती सरोवरांत कां टाकली गेली याची वेग वेगळी कारणे  सांगितली जातात.एक म्हणजे त्याकाळी इस्लाम आक्रमणाचे भय होते त्या पासून बचावार्थ ती सरोवरांत लप वली गेली .
दुसरे असेकी ब्रह्माने ती पुजन करीत असता थोडी खराब झाली म्हणून विष्णूच्या सुचने बरहुकूम तसे केल गेले.व तिसरे कारण मूर्तीची झीज झाल्याने ती सुरक्षित राहावी म्हणून पाण्यात ठेवली जात होती.
असो मला वाटायचं की औदुंबरच्या लाकडाची मूर्ती पाण्यात ठेंवून खराब होत असेल पण अभ्यास म्हणाला की  शिवंजय:संजय औदुंबर पाण्यात एक वेगळी चकाकी व वलय ,शक्ती प्राप्त करते त्यामुळे ती जास्त स्पंदने व electro magnetic waves प्रसारित करते.त्या मुळे  ती शत्रू नाश ,भौतिक प्रगती व मोक्ष कारक होते.मुळात औदुंबर हे अत्यंत शुभ, पवित्र मानले जाते ,ते दत्तात्रेयाचे प्रिय निवास स्थान त्यात ब्रह्माने तयार करवून विधिपूर्वक स्थापन केलेली व सत्ययुगात ब्रह्मा,त्रेता युगात गजेंद्र ,द्वापारांत बृहस्पती कलि युगात  अनंत शेष यांच्या शुभकमलहस्ते पूजन केली गेलेली.यामुळे तिचे महत्व अति आहे .या उत्सवास ब्रह्मोत्सव असेही संबोधतात कारण येथे ब्रह्माने पूजा केली ,तसेंच ब्रह्म म्हणजे विशाल स्वरूप म्हणून विशाल उत्सव.ब्राह्मचा एक मिनिटं तो पृथ्वीवरील 1 दिवस  म्हणून चार  मिनिटेव काही सेकंद ब्रह्माची 48 मानवी दिन हि सामान्य भाविकांस लाभार्थ दिली गेली ती विष्णूच्या आज्ञेने.आजही कलियुगात  तिचे पूजन अनंतशेष सरोवरांत करतात जशी बद्री व केदारांची पूजा नारद व उद्धव 6 महिने आजहि करतात.
असो 1709 नंतर असे ठरवले गेले की ती मूर्ती दर चाळीस वर्षे सरोवरांत विशिष्ट लेपन करून ठेवावी व दार चाळीस वर्षांनी ती विधी पूर्वक बाहेर आणून 48 दिवस ठेऊन रोज मंडल पूजन करवावे.म्हणून मग दर चाळीस वर्षांनी येथे हा अति वरद उत्सव साजरा होतो. मूर्ती नउ फूट उंच आहे.ती पाहिले 24 दिवस आडवी व निजलेल्या स्वरूपा त ठेवली व पुजली जाते व उरलेले  24 दिवस उभी ठेवली जाते.
यावर्षी ती चाळीस वर्षांनी म्हणजे 2 जुलै 1979 ते 16 ऑगस्ट 1979 नंतर आता 1 जुलै ते 17 ऑगस्ट पर्यंत बाहेर असून या दरम्यान हा अति वरद उत्सव सुरु आहे .1979  पूर्वी 12 जुलै 1939 ला हा उत्सव झाला व आता ता नंतर 2059च्या जुलै मध्ये पुन्हा होईल.
यावेळी साधारण पणे 2.5 ते 3 लाख भाविक  रोज उत्साहात दर्शन घेतात.
‌मी पण आता केदारनाथ येथून तेथे सद्गुरू कृपेने via रामेश्वरम जाणार आहे .तर माझे व मजबरोबर साधक मित्रमैत्रिणींचेही व सर्व साधक नारायणांचे या औदुंबर दत्तात्रेय रुपी वरद विष्णूचे दर्शनलाभ प्राप्त होवो अशी गंगाधरेश्वर केदारनाथास प्रार्थना करून लेखणीस अल्प विराम देतो .जय भोले.
‌शिवार्पर्ण मस्तु।
‌इदम् न मम्
‌'$#¡v@π√∆¥': $@π√∆¥
‌© शिवंजय डॉ संजय होनकळसे
‌shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com
‌drsanjayhonkalse.tripod.com

माझे लिखाण
महावतार बाबाजी पुस्तक

मराठी ,इंग्लिश,हिंदी

सिद्ध व सिद्धाश्रम
हिंदी
मराठीत तयार आहे प्रकाशकाची वाट पाहत 

Management by Spiritual Quotient :Power of Faith :https://www. amaz on.in/Management-Spiritual-Quotient-Power-Faith/dp/1448970148?tag= googinhy dr18418-21)




Comments

Post a Comment

Popular posts from this blog

कृष्णसखा उद्धव

पितृशास्त्र भाग 10:"पितृपक्ष: निषिद्ध कार्य :चुकून नका करू हे  काम*

७)पितृशास्त्र:अंत्येष्टी व दशक्रिया