ऋषिकेश गंगा माझे आजोळ:

Now,I am on my First Annual visit of 2019 to Kedarnath,This is my 38th visit by the Grace of Lord:$@π√∆¥ #

ऋषिकेश गंगा माझे आजोळ:
शिवंजय डॉ संजय।©

मानो तो गंगा माँ है।

गंगा हि आई आहे. child like faith ने तिच्या कुशीत गेले तर ती वात्सल्य सिंधू  आहे. मी ज्या ज्या वेळी ऋषीकेशच्या दयानंद घाटावर स्नान केले तेंव्हा तेंव्हा मला ही अनुभूती झाली,अनुभव तर सातत्याने येतातच.
आजही 2019च्या या भेटीत  हेंच जाणवते.माझे काय पूर्व अनुबंध,प्रेमानुबंध ऋणानुबंध  आहेत कुणास ठाऊक?पण येथे अनेकानेक वेळा  300 _400 वेळा स्नान करण्याची भाग्य लाभले मला,नाहीतर मी कुठचा दिल्लीसही जाण्याचा विचार न शिववणारा मी ,येथे येण्याची कुठलीही मानसिकता ,सामाजिकता ,आर्थिकता ,आरोग्यता वा ताकत नसणारा मी ,आजही आताही गँगा पात्रात स्नान करीत बसलोय ,सेवा साधना व विचार करतोय आठवाणींच्या लाटा, त्याही गंगेच्या,शरीर व मनाच्या किनाऱ्यावर घेत विसावतोय.

अनेकानेक वेळा स्नान करूनही मला स्पष्ट आठवते मी प्रथम ऋषीकेशला महविद्यालयीन जीवनात 16 जानेवारी 1974 ला आलो होतो.
त्यानंतर  महाविद्यालयाची सहल घेऊन येथे1986स स्नान केले.
त्यानंतर 1991 च्या 17 ऑक्टो. ला गंगोत्रीस जाण्यासाठी म्हणून आई,बहीण,भाचीस घेऊन आलो त्या रात्री 2 वा 35 मिनिटांनी गाढ निद्रिस्त असता आश्रमात गाडी चालल्या सारख्या भिंती हलु लागल्या,आधी थकल्यामुळे व गाडी प्रवासामुळे गाडीतच आहे असे वाटले पण मग गोंधळ व आवाजाने त्या कंपातच जागा झालो व लक्षांत आले की तीव्र भूकंप झालाय.
थोड्याच वेळांत बातमी थडकली कि गंगीत्री मार्गा वरील मुख्य पाडाव असलेल्या उत्तरकाशी येथे भारी भक्कम 6 रिक्टर स्केलचा भूकंप होऊन प्रचंड जान मालाची हानी झाली होती.
सकाळी गंगेत स्नान केले.आमचा  गंगोत्री गौमुखचा प्लॅन भूकंपामुळे बारगळला कारण रस्ता खचला व भूस्खलनामुळे  सारंच फ्लॉप.
तरीपण show must go on या तत्वानुसार आम्ही बद्रीनाथला प्रयाण केले होते.
बद्रीनाथ बद्दल  नंतर लेखन ,येथे फक्त ऋषीकेश व गंगा. या नंतर गंगाईने एवढी कृपा केली की हे  ऋषीकेशच गंगा स्थान माझं आजोळच झालं. लहानपणी एकाकी वाढलो मावशी,मामा,काका,आजी आजोबा असा गोतावळा वा त्यांचा सहवास माहितच नव्हता व कथा कादंबऱ्या सिनेमाच्या प्रभावामुळे नेहमी वाटायचे कि आपले आजोळ वा मामाचा गाव असावा सुटीत मज्जा करायला. "झुक झुक झुक झुक आगीनगाडी,
धुरांच्या रेषा हवेत काढी,
पळती झाडे पाहूया,
मामाच्या गावाला जाऊया "
या प्रभावातील ते भारलेले दिवस,  पण हा अनुभव  आमच्या गावीही नसलेले  आम्ही .त्यामुळे मनांत एक सुप्त अशी इच्च्छा घर करूनच होती कि आपलंपण एखाद आजोळ असावा एखादा मामा काका अफ्रीकेतून यावा. आणि पहा गंगा माझी माय माउली झाली ती आज तागायत.आजतागायत असे एकही वर्ष गेले नाही की माळ गंगाईने बोलावून कुशीत वात्सल्य विसावा दिला नाही. कधी कधी तर वर्षातून तीन चारदा येणे झाले अगदी नोकरी व्यवसाय घर दार सांभाळून ,आजारी आईची सेवा करत करत येत झालो.
गंगाईने अक्षरश: मला माय माउली सारखें सांभाळले व मी पण अगदी बाळासारखा नेहमी व आजही परतीच्या वाटेवरील मी तिच्या प्रेम कुशीपात्रात शिरतो. आजवर माझ्या बरोबर अनेक जण आलेत जवळ जवळ सर्वांना पोहता येत नसे ,मजसकट, अन मी नेहमी म्हणतो कि गंगा आई आहे बाळासारखं उतरा ,आई कधीच वाईट करणार नाही . आणि खरोखर माझ्या बरोबर येणारे सारे साक्षी आहेत,एकदा गंगेत उतरल्यावर त्यांना विनवण्या करून,पुढच्या प्रवासात बद्री केदार रस्त्यावर परत आपण स्नान करू या लालचेने बाहेर काढले आहे,अर्थात हृषीकेश सोडल्यावर आपण सतत गंगा साक्षीनेच तिच्या सह प्रवास करतो व मिळेल त्या प्रत्येक ठिकाणी  आईच्या कवेत मायेने ओथंबून गेलोय व इतरांनाही नेलय.माझ्या सुज्ञ साधक वाचकां ना आश्चर्य वाटेल पण हा अनुभव आधुनिक मराठीत मांडायचा म्हणजे हा age neutral व gender neutral अनुभव असतो कारण लहान मोठे स्त्री पुरुष म्हातारे कोतारे यांचा हा अनुभव असे. मग माझी 80 + आई असो ,वा 55 प्लस बहिण असो वा 16 -23  चे  विद्यार्थी,वा त्यांचे भाऊ बहीण आई वडील असोत.
मला मात्र हे सर्व करतांना कार्या लयीन पीडा सातत्याने सहन करा वी लागत असे.कारण माझ्या बरोबर विद्यार्थी,मुलीपण .आमची सर्वांची चांगली निरागस निरामय गट्टी बट्टी व भट्टी जमलीअसली तरी जग तसे नव्हते व नाहिये त्यामुळे पालकांना पण सुरवातीस शंका,भीती असे.आपला पाल्य चांगला आहे पण बरोबरीच्या मुलांचा व संजय सरांचा काय भरोसा?त्यात मी तरुण,सिंगल. त्यात माझ्यावर सर्वांचं प्रचंड विश्वास व जीव या उपर माझी माणसं हाताळण्याची पद्धत जगा वेगळी पण मजेशीर  व अनूभव देणारी, शिकवणारी ,व व्यक्तिमत्व घडवणारी. त्यामुळे मला व बरोबरीच्यांना एकमेकां बाबत अतूट जिव्हाळा.पण पालकांच्या पचनी हे पडणं मुश्किल व्हायचं कि आपले पाल्य आई वडीलां इतकेच  बाहेरच्या माणसास इतके कसे मानतात वा मानू शकतात?मला हे कळत असे पण मी मुलांना कसं सांगणार ?त्यामुळे कधी भाऊ,कधी आई,कधी मित्र*(ज्याच्या कडे आपण मन मोकळं करू शकतो तो मित्र)कधी सखा (जो न सांगता आपलं मनीचं ओळखतो तो सखा)तर कधी दुर्वासाची भूमिका बजावूनही मी आई सारखा वडीलांसारखा व काका मामा हि बिरुंद कधी लावून घेतली नाही मी संजयसरंच म्हणून राहिला गेलो.
उदाहारण म्हणून नमूद करतो माझी एक विद्यार्थिनी ऋचा देशपांडे मुबंई उपनगरातील एका उच्चभृघरातील मुलगी व तिची बहीण जी माझी विद्यार्थिनी नव्हती.त्या दोघी आईच्या मागे लागल्या आमच्या पहिल्या वहिल्या  ऋषीकेश चारधाम सहलीस जाण्यास . मुलांना नाही कसं म्हणणार?म्हणून मग त्यांच्या मातोश्री स्वतः सहलीस आल्या. त्यांना 5 स्टार राजधानी च्या प्रवासाची सवय आम्ही 2 क्लास 3 टायर मधून प्रवास करणारे पण त्यांनी मुंबई दिल्ली हा मे च्या वैशाख वणव्यातील चक्क मध्य प्रदेश व राजस्थाना तील कोटा  भरतपूर असा प्रवासच इतका एन्जॉय केला की त्या अत्यंत लाडा काळजीच्या छत्र छायेत वावरणाऱ्या मुली आईस म्हणाल्या की या नंतर आम्हास राजधानि एक्सप्रेसचा प्रवासचं नको कारण त्यात बाहेरच जग,मज्जा अनुभवतांच येत नाही.अर्थात त्यांच्या मातोश्रीनीही व त्यांच्या जेष्ठ भगीनी यांनीही प्रवास एन्जॉय केला  ऋषीकेशची गंगाईची प्रेमकरुणा अनुभवली. मग काय त्या श्रीमती सुलभा देशपांडे आमच्या प्रत्येक सहलीच्या अतूट भागच झाल्या कीवत्यांच्या  मिस्टरांच्या पण समजण्या पालिजडे गेले इतके कि ते स्वतःही एका retreat साठी ऋषीकेशला 10 दिवस आमच्यात राहिले.असो अनुभव ,अनुभूती आपल्या पाल्याचा माणूस म्हणून झालेल्या व्यक्तिमत्व विकासांती हळू हळू इतर सर्व पालकांना आमची भट्टी स्वीकारावी लागली नव्हे तेही आम्हाला जॉईन करू लागले. असे कळत नकळत 200 ते 250 जण म्या पामरार्फत गंगा चरणी आणवले गेले.
गंगेने त्यांनाही आपलेसे केले भाग्यशाली केले .आज ते सर्वही सुजाण,सुस्थित आहेत पण हे घडवल्या गेल्याचे दिवस त्यांची आमरण पाठ सोडणार नाही हे अबाधित सत्य आहे.आजही ते एकत्र आहेत त्यांचे संसार, बायका व मुले एकत्र जाणीवपूर्वक भेंटतात.
'$#¡v@π√∆¥':$@π√∆¥ #©πक@£$€

Comments

Popular posts from this blog

कृष्णसखा उद्धव

पितृशास्त्र भाग 10:"पितृपक्ष: निषिद्ध कार्य :चुकून नका करू हे  काम*

७)पितृशास्त्र:अंत्येष्टी व दशक्रिया