4)पितृशास्त्र: मृत्यूपाश्चात जीवसृष्टी:पितृलोक
https://m.facebook.com/story.php?story_fbid=2316921904990140&id=100000170606055
https://shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com/2018/09/blog-post_24.html
4)पितृशास्त्र: मृत्यूपाश्चात जीवसृष्टी:पितृलोक
Shivanjay dr Sanjay honkalse©
पितृणां लोकमपि गच्छंतु ये मृताः|
मृत्यूनंतर जीव जेथे जातो त्या भुवनास 'पितृलोक' म्हणतात .पितृलोक हे पितरांचे निवास स्थान होय.
आपल्या वंशातील सर्व मृत व्यक्तिना प्रेत योनीतुन मुक्ति मिळावी म्हणून प्रेतावर व पिंडावर संस्कार केले जातात हे आपण पाहीले. हे संस्कार केले नाही तर काय होते ? तर ते आज आपण पहाणार आहोत.
जो पर्यंत मृत व्यक्तिच्या देहाला अग्नी संस्कार होत नाहीत तो पर्यंत त्या देहाला प्रेत अवस्थाच असते. असा जीव प्रेतलोकात राहतो. पुढे पाहूच सप्त पाताळातील 'अतल' नावाच्या पाताळात प्रेत लोक आहे,प्रेत निवास आहे.
दशक्रिया व श्राद्ध संस्कारीत जीव पितृलोकात जातो.
जसे मानवास मृत्युलोक हे निवास स्थान आहे तसेंच सृष्टीत इतरांसाठी पण निवास वा लोक आहेत.आपण जर फक्त बुद्धीमान राहून बुद्धिवादाचाच पहाडे म्हंटले तर इतर जीवं सृष्टी आहे हे सहजासहजी पटत नाही. कारण ते आधुनिक विज्ञानाच्या कक्षेत अजून आलेले नाही.आपण विज्ञानाने सिद्ध केले तर ते डोळे झाकून स्वीकारतो पण त्या स्वीकारण्याच्या क्रियेस आपण अंध श्रद्धा म्हणत नाही कारण विज्ञानावर आपला विश्वास असतो .मग श्रद्धा आपण का झिडकारतो? श्रद्धा तर विश्वास पेक्षा फार श्रेष्ठ आहे कारण 'प्रत्येक विश्वास हा श्रद्धेच मूळ आहे पण विश्वास हा दृढ ,अमर्याद,शाश्वत, अविचल,व प्रमाणित विश्वास (Faith is* (F)IRM ,(A)BOUND, (I )NFLICKERING),(T)IMELESS,AND (H)ONEST BELIEF.:REF Management by Spiritual Quotient ,dr Sanjay HONKALSE https://www.amazon.in/dp/1448970148/ref=cm_sw_r_wa_apa_i_F.qQBbYHPSEEJ
मग विश्वास अंध असतो श्रद्धा नव्हे श्रद्धा हि नेहमीच डोळस असते
म्हणून श्रद्धा हि विश्वास असते पण प्रत्येक विश्वास हि श्रद्धा होईलच असे नाही .म्हणून श्रद्धा झिडकारणे हे नुसते चूकच नाही तर अशास्त्रीय व अमानवी आहे हे आजच्या पिढीने समजून घेणं व आपण त्यांना समजावून देणे महत्वाचे नाही का?
तर्क संपतो तेथे श्रद्धा सुरु होते,:Faith begins where reason ends:(Ref As quoted above).
असो तर ब्रह्माण्डात इतर अनेक जीव सृष्टी आहेत हे आपल्या सिद्ध व ऋषी मुनींनी हजारों वर्षांपूर्वी लिहलय व ते आधुनिक विज्ञानाच्या कवेत येत नसले तरी शास्त्रीयच आहे कारण 'ऋषी' म्हणजेतो जो सत्य शोधतो , व आधुनिक विज्ञानाचे हेतू व ध्येय हि तेंच आहे फक्त त्याच्या कक्षा मंद व अरुंद आहेत.
तर या विश्वात एकुण चौदा भुवनं म्हणजे चौदा लोक आहेत . मर्त्यलोक धरून 14 लोक ,भुवने आहेत ,सप्त सर्ग वा लोक व सप्त पाताल अशी त्यांची विभागणी होते.
१) भुः, २) भुवः , ३) स्व: , ४)महः , ५) जनः , ६) तपः , आणि ७) सत्यम् असे सात लोक आहेत व
१) अतल , २) वितल , ३) सुतल, ४) तलातल , ५) रसातल , ६) महातल , व ७) पाताल असे सप्त पाताळ आहेत . अशी एकुण चौदाभुवनं आहेत .
ही चौदाहि भुवनं एकापेक्षा एक सूक्ष्म आहेत. आपण सगळे भुः लोकात राहतो. भुवः लोकात भुत, प्रेत, पिशाश्च , शाकिणी, डाकिणी इत्यादी दुष्ट योनि राहतात. भुः लोकात राहणाऱ्या पेक्षा भुवः लोकात राहणाऱ्या या दुष्ट योनिंचा देह सूक्ष्म असतो.ते आपल्याला पाहु शकतात पण आपण त्याना पाहु शकत नाही. अशी दुष्ट शक्ती जवळुन गेल्याचा भास मात्र होतो. अशा आत्म्याना लिंग देह असतो, मन व वासना आसतात , इच्छा असतात . असे आत्मे अंतराळात भरकटत असतात. असे अतृप्त आत्मे एखाद्याच्या शरीराचा ताबा घेवुन आपली वासना तृप्त करून घेत असतात.
जी माणसं अंघोळ करित नाहीत ,अमंगळ राहतात, लघवी परसाकडेला जावुन आल्यावर हातपाय धुवत नाहीत , स्त्रिया मासिक पाळीत अमंगल ठिकाणी जातात , चवथ्या दिवशी डोक्यावरून अंघोळ करून केस मोकळे सोडुन घराबाहेर पडतात अशा अमंगल स्त्री पुरूषांच्या देहात असे आत्मे प्रवेश करतात म्हणून सदा सर्वकाळ मंगल , पवित्र राहणं किती गरजेचं आहे हे यावरून कळेल.
हे अतृप्त आत्मे जेव्हा आपल्या देहात प्रवेश करतात तेव्हा भयानक यातना होतात
इदं न मम्।
शिवार्पणम्
शिवंजय डॉ संजय होनकळसे©
SANJAY HONKALSE
shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com
Thank u sir for this information
ReplyDelete