मथुरा  :चमत्कारी बांके बिहारी,             प्रेम मंदिर मनोहारी।

मथुरा  :चमत्कारी बांके बिहारी,
            प्रेम मंदिर मनोहारी।

शिवंजय डॉ संजय होनकळसे©

गणेश विसर्जन नंतर लगेचच मथुरेस प्रयाण केले व आज पोहोचलो. आता कसेबसे गणपती नंतरचे हे काही दिवस मिळाले .निघण्यापूर्वी तब्बेत शुक्रवारपासून अचानक गळून गेली ,अवसानच नाही राहिले तरीही निघालो .
  मी जवळ जवळ 5 ते 6 वेळा मथुरेस आलोय .मथुरा कृष्ण जन्म नगरी ,रासलीला नगरी ,राधा कृष्ण प्रेम विलास नगरी,कृष्ण नगरी,कृष्ण लीला ग्राम .
आल्यावर आंघोळ करून लगेचच बांके बिहारच्या दर्शनास गेलो.
वृन्दावन धाम येथील रमण रेती येथे स्थित हे मंदिर 1864 साली स्थापन झाले . येथे असलेली काळ्या पाषाणातील बांके बिहारी(बांके म्हणजे aall rounder बिहारी म्हणजे उपभोक्ता)ची मुर्ती अद्भुत आहे . ती तानसेन यांचे गुरु स्वामी हरिदास यांना प्रत्यक्ष राधाकृष्ण यांनी भेट दिली असं म्हणतात.
स्वामी हरिदास हे निधी वन मध्ये साधना करीत .निधीवन तेंच जिथे राधा कृष्ण व गोपी रास्क्रीडा करतात ,हो आजही तिथे यांची रास लीला चालते व त्यांची साक्ष सकाळी निधीवन उघडल्यावर येते.जसं सकाळी येथे रासलीलेच्या  खाणाखुणा दिसतात .हा ही रासलीला गुप्त असते कुणी पाहायला गेला तर तो भ्रमित होतो अशी उदाहरण आहेत.आजही रास क्रीडेनंतर राधा कृष्ण तेथे आराम करतात.
तर अशा या निधी वनात स्वामी हरिदास यांना स्वयं राधा कृष्ण यांनी दर्शन देऊन हि मुर्ती दिली जी आज बांके बिहारी मंदिरात स्थापित आहे .मार्गशिष् पंचमीस या मंदिराची स्थापन झाली असल्याबे त्या दिवशी येथे प्रकटोत्सव साजरा करतात .
हि कृष्णाचं हरफन मौला रूप दर्शवणारी अशी मूर्ती आहे .
यात राधा कृष्ण दोघेही आहेत.या मंदिरात आरती होत नाही कारण अशी धारणा आहे की भगवंत रते रास लीला करून थकून येतात त्यामुळे त्यांना त्रास होईल म्हणून ही आरती टाळतातात.
अक्षय त्रितीयेस येथे बिहारीजींच्या चरण कमळाचे दर्शन करवतात .
बांके बिहारीचं दर्शन दार दोन मिनिटांनी काही क्षण परदाबंद होते कारण अशी मान्यता आहे की त्यांचं सतत दर्शन मानवी डोळ्यांस सहन होणार नाही .
येथे गर्दी नेहमी असूनही फार शांती व प्रसन्नता भासते .हा इथे माकडांचा फारच सुळसुळाट असतो व ते माणसांचा चस्मा काढून घेऊन पाल काढतात व मग त्यांना फ्रुइति द्यावी लागते ,मग ते चास्मा परत करतात .माझ्या ओरत्येक भेंटीत हे मी पाहिलंय अनुभवलंय.
संध्याकाळी आम्ही प्रेम मंदिर येथे गेलो .हे मंदिर जगद्गुरू श्री कृपाळूजी महाराज (1922 ते 2013) यांच्या संकल्पनेतून साकारले गेले आहे व ते JKP म्हणजे जग गुरु कृपाळू परिषद तर्फे चालवले जाते आहे . सागरी कृपाळूजींनी हे अत्यंत आकर्षक व जागतिक दर्जाच्या तोडीचे मंदिर बांधले आहे असरचं एक मंदिर त्यांनी उत्तर प्रदेश च्या प्रतापगड येथील त्यांच्या जन्म गावी मांडणी गाद येथे बांधले आहे .कृपाळू जी हे पंचवे जगद्गुरू म्हणून काही तद्न्य यांनी मान्य केले व त्यांना जगद गुरु हि पदवी 14 जानवरी 1957 ला बहाल झाली त्यांनी सर्व भक्तिपंथातील सार काढून प्रेम रस लीला ,Philosophy of Divine Love चा सिद्धांत मांडला . त्यांचे कार्य हे समजुद्धाराक आहे .त्यांनी अतिशय सुसज्ज असे hospi tals ,naturopathy सेंटर्स स्थापूत केलीत जी  गरिबांना मोफत सेवा पूरवतात .तसेंच उत्तम शिक्षणाची ,उच्च शिक्षणाच्या सुविधा गरीबास पुरवल्या जातात.ISKON च्या तोडीचे मंदिर ,व्यस्थापन व आहार या देशी मंदिरामार्फत साकारल्या गेल्यात . इथली मंदिराची रोषणाई डोळ्याचेच नवे तर मनाचेही पांग  फेडणारी आहे.
या ठिकाणी गेल्या वर्षी श्री जगद्गुरुंना शंकराचार्य पॅड मिळाल्याचा शष्ठ्यब्दी सोहळा पार पडला त्यावेळी मी येथे आमचे वर्गमित्र श्री संजय केळकर, श्री pk आळशी व अमेरिकेतील मित्र श्री अनंत गफजर यांबरोबर आलो होतो ,व आठ्वफाभार ओरेम मंदिरात मुक्कामास होतो.
राधे राधे ।राधे राधे।।
शिवंजय डॉ संजय होनकळसे ©
drsanjayhonkalse.tripod.com

Comments

Popular posts from this blog

कृष्णसखा उद्धव

पितृशास्त्र भाग 10:"पितृपक्ष: निषिद्ध कार्य :चुकून नका करू हे  काम*

केल्याने देशाटन.......|