ऋषी पंचमी :


https://m.facebook.com/story.php?story_fbid=2303783952970602&id=100000170606055

ऋषी पंचमी :शिवंजय डॉ संजय होनकळसे©
drsanjayhonkalse.tripod.com

🕉 अगस्तै.नम: कृन्वंतो विश्वम् आर्यम्।
 
भाद्रपद शुक्ल पक्षात गणपतीची स्थापना व उत्सव असतो व त्याची धामधुम सर्वत्र असते. या उत्सवास अनुषंगुन हरतालिका ,गौरी ,अनंत पूजन इ व्रत व पूजन असते .त्यातीलच गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमी साजरी होते.ऋषी पंचमीस अनेक दृष्टीने महत्व आहे .या दिवशी कविनारायणाचे  अवतार मच्छिद्रनाथांचा जन्म झाला.तसेंच बेळगाव निवासी श्री सिद्धारुढ सतशिष्या कलावती आईसाहेबांनी जयंती व शेगाविचा राणा गजाननमहराजांची पुण्य तिथी.

पण पारंपरिक रित्या हा उत्सव गौरी व हरतालिके सारखाच साजरा होतो.आजचा पावन दिन सर्व ऋषिमुनींच्या व संत मंडळींच्या श्रीचरणीं विनम्रतापूर्वक दंडवत घालून आपण त्यांचे कृतज्ञता-स्मरण करण्या चा व त्यांना अभिप्रेत असणा-या आदर्श जीवनपद्धतीनुसार आचरण करण्याचा व  मन:पूर्वक संकल्प करून तसे निष्ठेने वागण्याचा. स्त्रिया हा सण साजरा करतात.कारण याचा संबंध प्रजोत्पादन ,पुनर्निर्मिती ,अजाणता व अनाहूत पणे केलेल्या ,मुखत्वे करून स्त्री धर्म संबंधित, पापाचे क्षालन करण्याशि आहे .आज कालच्या अधुनिक  युगांत विशेषतः आधुनिक मुली व स्त्रियांनी हे पाळणे महत्वाचे आहे.भारतीय संस्कृतीती हि एकमेकाद्वितीय संस्कृती आहे . आपली संस्कृती हि ऋषी संस्कृतीती आहे कारण आपण असे मानतो कि आपकी उपज व उन्नती ऋषींपासून झाली ,आपले कुल हे वेगवेगळ्या ऋषींपासून निर्माण झालय. आपण त्याला गोत्र म्हणतो त्यांचे प्रतिनिधित्व सप्तर्षी करतात.
जगननियंत्या जगन्नानाथानी ,विश्वनाथाने सृष्टी कार्य तर केले पण सृष्टीचक्र चालवण्यासाठी सिध्दऋषींची निर्मिती करून ऋषीसर्ग निर्माण केला (Ref:सिद्ध आणि सिद्धाश्रम :'शिवंजय डॉ संजय होनकळसे ।U.P.P.) त्यानुसार आपल्या वैभवसंपन्न व एकमेवाद्वितीय संस्कृतीचे प्रणेते व संवर्धक असणा-या या  ऋषी-मुनींचे आपण प्रेमादरपूर्वक स्मरण करून, त्यांनी घालून दिलेल्या हितकर व श्रेयस्कर मार्गावरून चालण्याचा प्रयत्न करण्या करवण्या साठी ऋषी पंचमीचा उत्सव साजरा करणें अत्यंत महत्वाचे आहे .
सृष्टी उत्पत्ती करताना भगवान ब्रह्मदेवांनी सुरुवातीला आपल्या या सात पुत्रांना निर्माण करून त्यांना पुढे उत्तम संतती निर्माण करण्याची आज्ञा केली ते हे सप्तर्षी मरीचि, अत्रि, आंगिरस, पुलह, पुलस्त्य, क्रतु व वसिष्ठ हेच ते सात प्रथम ब्रह्मपुत्र सप्तर्षी होत. यांच्यापासूनच पुढे सर्व प्रजा निर्माण झाली, म्हणून हे मानववंशाचे मूळ जनक होत.आपण त्याला गोत्र म्हणतो. सप्तर्षी हे तर आपली अजरामर संस्कृती निर्माण करणा-या हजारो महान आत्मज्ञानी, संशोधक, शास्त्रज्ञ आणि बरेच काही असणा-या ऋषींचे केवळ प्रतिनिधी मानलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून आजवरच्या सर्व ऋषींचे सादर स्मरण करायचे ते या ऋषी पंचमीस . म्हणूनच सप्तर्षी हे आजवरच्या सर्व ऋषींचे, चरक-सुश्रुतादी, वामदेव-व्यासादी, पाणिनी-पतंजली, याज्ञवल्क्य-कश्यपादी सर्व ऋषींचे प्रतिनिधित्व करतात.
अगस्त्यादी वशिष्ठ ऋषींनीच सुरुवातीला आपली देवदत्त अलौकिक प्रज्ञा वापरून विविध प्रयोग करून ही पृथ्वी राहण्या-खाण्यायोग्य केली, मानववंशाचे सर्वतोपरि भले कसे होईल ? याचा सूक्ष्म विचार करून नियम बनवले व अभ्युदय-नि:श्रेयसरूपी धर्म व अध्यात्मशास्त्र श्रृति-स्मृतींच्या रूपाने प्रचलित केले. या सर्व ऋषींचे मानवी जीवन व संस्कृतीवर अत्यंत मोठे उपकार आहेत.त्यामुळं  तर आज मनुष्य व इतर प्राण्यांमध्ये काही भेद आहे तो भोग योनी व कर्म योनीचा. त्यांनी घालून दिलेले अत्यंत योग्य असे आदर्श, सगळ्याच गोष्टींना एक योग्य मर्यादा घालून दिलेली आहे. पण आजकालच्या अधुनिक पण धकाधकीच्या जीवनात ती मोडली जातात त्यामुळेच कुटुंबात, समाजात व पर्यायाने मानवजातीत अनेक ऱ्हास व उत्पात होतात. रोज आपण पाहातोच आहोत उघड्या डोळ्यांनी. म्हणून  या परमज्ञानी ऋषिमुनींच्या मार्गदर्शनाचे चिंतन मनन करून अखंड सुखी व्हायला पाहिजे. अशी ही भान-जाणीव निर्माण होऊन टिकावी, यासाठीच आजच्या ऋषिपंचमीचे औचित्य आहे.
म्हणून आज ऋषी पूजन करतात व कळत नकळत आपल्या हातून झालेल्या सृष्टी नियमांच्या भंग  झाल्यास त्यातून क्षमा याचना व पाप क्षालन करण्याचा हा दिवस।म्हणून यादिवशी सप्तर्षींचे पूजन करतात ,व ऋषींची भाजी करतात बैलाच्या  कष्टांचे पदार्थ खात नाहीत.
पण स्त्रिया हा सण ऋषी पत्नी अरुंधती च्या निमित्ताने पण करतात.
अरुंधति ही महान पतीव्रता आहे सप्तर्षि मंडळात ती स्थित आहे तिच्यासारखं  अखंड सौभाग्य प्राप्त व्हावं म्हणून भाद्रपद पंचमीला ऋषिपंचमीला तींच पूजन स्त्रीया करतात.सप्तर्षि मंडळात तिला मानाचं स्थान आहे.
मानवी जीवनातील बाल्यावस्था ते यौवन,वृद्धावस्थेतील निरागसता ही अरुंधति ची देन आहे.त्याच अस झाल,अरुंधति ही मेधातिथी या ऋषीची कन्या.पण पूर्व जन्मात तिने तपाचरण करून भगवान विष्णुंना प्रसन्न करून घेतले.त्यासाठी तिने प्रत्येक तीन दिवस निर्जळी उपवास करून चवथ्या दिवशी आहार अशा क्रमाने ’ॐ नमो वासुदेवाय ॐ’ जप करत कित्येक तप तपस केले.त्याने प्रसन्न होऊन श्रीविष्णुंनी तिला तीन वर प्रदान केले.एक वर तीने मागितला तो असा “संसारात जन्मत:च कुठल्याही प्राण्याच्या मनात काम विकार असू नये“.भगवंत तथास्तु म्हणले,त्यामुळे बाल्य,जरावस्थेत काम वासना बळवंत नसतात.आपले पतिव्रत्य अखंड अक्षय राहावे हा दूसरा वर तिला मिळवला.तिसरा वर पतीव्यतिरिक्त दुसर्‍या कुणावर तिची वासना जाऊ नये.ज्याची तिच्यावर वासना येईल त्याला नपुंसकत्व प्राप्त होईल.पण हे प्राप्त करण्यासाठी तिला मेधातिथी मुनींच्या यज्ञात स्वत:चं पुरोडाश = हवीष्यान्न भगवंताच्याकडून बनवून घेऊन स्वत:ची आहुति दिली,हे करता करता तिने ब्रह्मर्षि वशिष्ठांना मनोमनी वरले ॰ त्यांच चिंतन करतच तिने अग्निसमर्पण केले.ती मेधातीथीच्या यज्ञातून प्रगट झाली.गम्मत म्हणजे आपणास द्रौपदी ही याज्ञसेनी यज्ञातून जन्मलेली म्हणून ओळखतो.पण ही द्वापारयूगातील घटना आहे.त्याच्या बर्‍याच आधी सत्ययुगांत अरुंधति यज्ञवेदितून जन्मली आहे.मग तिचा व वाशिष्ठांचा विवाह झाला.त्या दोघांना सातकल्प इतके आयूष्य ब्रह्मदेवांनी आयुष्य बहाल केले.त्यांना सूर्या प्रमाणे प्रकाशमान बिना अवरोध करणारे विमान दिले(ही सत्य युगांतील आहे आणि विमांनाच्या शोधाच क्रेडिटमात्र पाश्चात्यांना दिले जाते).कारण सृष्टी विस्ताराचे कालातीत कार्य करायचे आहे.विवाहोत्तर ते दोघे विमानाने देवतांनी सांगितलेल्या स्थानी प्रयाण केले.अरुंधति वशिष्ठांना ते ज्या ज्या रूपांत विश्वकल्याणाच,विस्तारांच कार्य केले त्याला अनुरूप अशा पद्धतीने अरुंधतीही त्यांना साथ देत असते.
वाशिष्ठांना शंभर मुले झाली, ती विश्वामित्र ऋषींच्या कट कारस्थानामुळे मारली गेली.त्यातूनही शक्ती या नावाच्या त्यांच्या मुलाची पत्नी गर्भवती  होती व तिज पासून त्यांना पराशर ऋषि जन्मले व त्यांनी कृष्ण द्वैपायन व्यास यांना जन्म दिला म्हणजे व्यास हे वाशिष्ठांचे पणतू होत.  
चरित्र दिव्य,सन्मार्ग दर्शी, प्रेरणादायी,कृतार्थ असे त्यांचे चरित्र आहे.
म्हणून दोषां मुक्‍त होण्यासाठी ऋषीपंचमूचे व्रत करतात . मान्‍यता है कि जर महिलांकडून मासिक धर्म पालनात काही नियम तोडले  गेले ( जे आज सर्रास होते ) { ref अंबुबाची उत्सव कामाख्या :http://shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com/2018/06/blog-post_29.html}
तर  त्यांनी  ऋषि पंचमीस  सप्‍त ऋषिनची पूजा करुन भूल सुधारन  पापक्षालन युक्त व दोष मुक्‍त होऊ शकते . तर माबाव आहे तिथे समस्या आहे  व समस्या आहे तिथे उपाय व क्षालन आहे .
तर त्यासाठी करतात व्रत ऋषी पंचमीचे
आज मी अनेक विद्यार्थिनी व स्त्रियांना हे व्रत मनोभावें  व अनेक वर्षे करतात त्यांना हे व्रत का करतात असे विचारले तर आधुनिक मुली व स्त्रिया तर सोडाच पण परंपरा मानण्या ऱ्या स्त्रियांनीही सांगता आले नाही म्हणून उशिरा का होईना हा लेक्गं प्रपंच केला तो ता सर्व अजाण वजांजार महिला पुरुषांस ,माता अरुंधती व सप्तर्षी स्मरेण,मी शिवंजय डॉ संजय ,समर्पित करतो.
शिवार्पणमंस्तू
'शिवंजय':डॉ संजय होनकळसे©
drsanjayhonkalse.tripod.com
http://shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com
=========================

Comments

Popular posts from this blog

कृष्णसखा उद्धव

७)पितृशास्त्र:अंत्येष्टी व दशक्रिया

भाग 2काशीविश्वनाथाची इतिहास गंगा:$#¡v@π√∆¥ dr $@π√∆¥