८)पित्रोत्सव: भारतेतर देश व पित्रोत्सव© )


8)पित्रोत्सव: भारतेतर देश व पित्रोत्सव©
🌍🌎🌏🌐🌎🌏🌍 🇦🇨🇦🇩🇦🇪🇦🇫🇦🇬🇦🇮🇦🇱🇦🇺🇦🇷🇦🇶🇦🇴🇦🇲🇦🇼🇦🇽🇦🇿🇧🇦🇧🇧🇧🇩🇧🇪🇧🇲🇧🇯🇧🇮🇧🇭🇧🇬🇧🇫
    🕉 अगस्तै नमः ।कृन्वंतो विश्वम् आर्यम्।
https://m.facebook.com/story.php?story_fbid=2319052071443790&id=100000170606055

https://shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com/2018/09/5.html

सध्या श्राद्ध,  पिंडदान,
"दशक्रिया"सा विषयी वाद सुरू आहे.कित्येकदा तो जाणीवपूर्वक व प्रचंड खर्च करून भारतात पसरवला जातो .माध्यतारी दशक्रिया नावाचा चित्रपट आला तेंव्हाही असाच वाद झाला होता  यावर या विधी विरूध्द अभ्यास/विचार न करता भाष्य केले जाते.
उदा.
'सगळं थोतांड आहे.'
                            Or
'दशक्रिया विधी करून जर आत्म्याला सद्गती मिळत आसेल तर भारत सोडून इतर देशातील सगळे मृतत्मे हे आत्रुप्त आत्मे झाले असते. '
                           किंवा
  'माणसाला सद्गती ही दशक्रिया मुळे नाही तर त्याने जीवंत पणी केलेल्या चांगल्या कर्माने मिळते.'
                                वा
खूप पाप करणाऱया माणसाचे मृत्यू पश्यात दशक्रिया विधी केल्याने त्याला सद्गती कदापि मिळतं नाही.
खरंतर हिंदू धर्म हा जगात सर्वात शास्त्रोक्त धर्म आहे व तशी मान्यता पण त्यास जगभर मिळत आहे
मी फक्त या बाबत सांगू इच्छतो कि इतर धर्मी कर्मीयांतही पितरांविषयी विचार व आचार प्रघात आहेत
,जसे पारशी नववर्षा पूर्वी पितराचे पांच दिवस मनवतात त्याला गाथा म्हणतात .हे दिवस आपल्या भाद्रपदातच येतात.
तसेंच इस्लाम मध्ये या विधीस शब्बे रात म्हणतात.ख्रीश्चन त्यानिमित्त मास ठेवतात व मृत व्यक्ती संबंधी विचार मांडून प्रार्थना करतात.
पितृपंधरवडा होतो सर्वपित्री अमावस्या तसा कर्नाटकात म्हाळ किंवा म्हाळवस, तामिळनाडुत आदि अमावसायी, केरलमध्ये करिकडा वावुबली अशा सणांद्वारे पूर्वजांना आदरांजली वाहातात.
नेपाळमध्ये ऑगस्ट – सप्टेंबरच्या दरम्यान गायजात्रा म्हणजे गावभर गाय फिरवून गोदानाद्वारे पूर्वजांचे ऋण फेडले असे मानतात
लाओस, थायलँडमध्ये उल्लंबन म्हणतात. तेथील महायान आणि थेरवादी बौद्ध लोक तो  पाळतात.
कंबोडीयात प्रचुम बेंडा हा दिवस त्यासाठी पाळतात. खेमर कालगणनेतील दहाव्या महिन्यातला पाचवा दिवस यासाठी निवडला आहे. या दिवशी सर्व लोक संध्याकाळी बुद्धविहारात जमतात. येताना भात, मासळी घेऊन येतात. पूर्वजांच्या नावे लिहीलेली निमंत्रणे त्यांचा नावाचा पुकारा करून आगीत जाळतात. त्यावर आपण आणलेला भात घालतात, मासळी घालतात.
   ऑल सोल्स डे नावाने अनेक देशांमध्ये पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते.

· कोरीयात यालाच सेवालाल म्हणतात. चार पिढ्यांपर्यंतचे मृतात्मे वंशाशी जोडलेले असतात असे मानतात विशिष्ठ वाणाचा भाताचा पिंड करून वाहातात त्याला सोंग पियॉन असे नाव आहे. येथे फक्त पुरूषच हे कार्य करतात.

·         मलेशियामध्ये माह मेरी जमातीचे लोक अरी मोयांग नावाने हे कार्य करतात.
  विएतनाम मध्ये थान मिन्ह या नावाने पितरांना आठवण्याचे दिवस घातले जातात.

·         चीनमध्ये गेल्या २५०० वर्षांपासून क्विंग मिन्ह नावाने हे दिवस साजरे करतात. तेथे हे दिवस एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात येतात. त्या काळात तेथे पाऊस असतो, सुगी असते.

·         जपानमध्ये पर्वेकडील भागात जुलैच्या शेवटच्या आठवड्यात तर पश्चिमेकडील भागात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात तीन दिवस यासाठी देतात. या दिवसांना ओबोन ओमात्सुरीम्हणतात. पूर्वजांसाठी आकाश कंदिल लावतात. दिवे पाण्यात सोडतात, तिसर्‍या दिवशी तीरो नागाशी – विशेष अन्नपदार्थ करतात.

·         इंग्लंडमध्ये ही पद्धत १५३६ पासून सुरू झाली. या काळात पूर्वजांच्या थडग्यांची डागडूजी करतात. त्यावर आरास करतात.

·         जर्मनीत एर्नटं डांक फेस्ट हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण असतो.

·         रोम मध्ये लेम्युलारिया हा तत्सम सण आहे.

·         मादागास्कर बेटांमध्ये दर सात वर्षांनी पूर्वजांची प्रेते उकरून त्यांचे कपडे बदलतात.

·         हैती देशात वुडू धर्मीय लोक पूर्वजांचे स्मरण करतात त्या दिवसांचे नाव आहे – जोर दे औक्स. आपल्या पूर्वजांचे मृतात्मे मानव आणि देव यांच्यात संवाद सांधण्याचे काम करतात असे ते मानतात

·         मेक्सिकोमध्ये ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात – दिआ द ला मुरतोस – हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण आहे.

·    अमेरिकेत युरोपीय वंशजांसाठी मे मधला शेवटचा सोमवारमनवतात तर सप्टेंबरमधला शेवटचा रविवार आदिनिवासी अमेरिकी पूर्वजांसाठी पाळतात.

·     

याशिवायही अनेक देशांमध्ये, लोकसमूहांमध्ये ‘पितरं घालण्याच्या’ पद्धती असू शकतील. बहुतेक सर्व सभ्यतांमध्ये पूर्वजांची आठवण करण्याची प्रथा आहे. त्यात रूढ असलेल्या कृती वेगवेगळ्या आहेत असे दिसते. ते ते स्थानिक लोक त्या त्या कृती त्या त्या दिवसात केल्या नाहीत किंवा त्यांना जमले नाही तर हळहळत असतील, पाप लागले असे म्हणत असतील. जगभर रूढी वेगवेगळ्या आहेत त्यामुळे त्या न केल्याबद्दल – पाप – लागायचेच असेल तर सगळ्यांनाच पाप लागणार कारण कोणीच जगातल्या सर्वच्या सर्व रुढी पाळत नाहीत. रुढी कालानुसार बदलतात पण आपल्या जन्माला कारण असणार्‍यांबद्दल कृतज्ञ राहाण्याची भावना मात्र सर्वांच्यात शाबूत दिसते. -आपल्या मृत नातेवाईकसाठी असा काही विधी श्रद्धा म्हणून केला त्या व्यक्तीच्या नावाने अन्नदान केले तर त्यात एवढी बॉम्बबोब करायची गरज नाही.
सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या व्यक्तींचा ह्या गोष्टीवर अजिबात विश्वास नाही त्यांच्या नावाने स्मारके पुतळे उभारले जातात तर एखाद्या व्यक्तीच्या नावाने अन्नदान केले किंवा विधी केला तर बिघडले  कोठे.
इदं न मम्।
शिवार्पणम्।
शिवंजय डॉ संजय होनकळसे©
drsanjayhonkalse.tripod.com
shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com
Statutory statement:मी काही याविषयीचा तज्ञ नाही पण सद्य परिस्थितीतील अज्ञान ,चुकीचे विचार व वरून भुलावणाराअतर्क्य तर्क,तसेंच आपला सनातन विचार हा किती परीपूर्ण  आहे यांचा सापेक्ष व तौलनिक अनुभव या विचाराने जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी सांगावे,share करावे म्हणून हा प्रपंच.'शिवंजय':डॉ संजय होनकळसे              

Comments

  1. Anyhow good information! Very best of luck
    overall all are aesthetic towards their customs rituals traditions cummunity religion etc, but they are all pretending to be modern or updated to the new, why? what is the big reason behind all this? many of the times
    our Hindu's are mostly targeted for all this. Are we only that much downtroddens that anyone can target us and insult us.
    very sad but most truthful

    ReplyDelete
  2. Anyhow good information! Very best of luck
    overall all are aesthetic towards their customs rituals traditions cummunity religion etc, but they are all pretending to be modern or updated to the new, why? what is the big reason behind all this? many of the times
    our Hindu's are mostly targeted for all this. Are we only that much downtroddens that anyone can target us and insult us.
    very sad but most truthful

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कृष्णसखा उद्धव

पितृशास्त्र भाग 10:"पितृपक्ष: निषिद्ध कार्य :चुकून नका करू हे  काम*

केल्याने देशाटन.......|