2)पितृशास्त्र: मृत्युपरांत जीवन मार्गदर्शन

  🕉 अगस्तै नमः ।कृन्वंतो विश्वम् आर्यम्।
2)पितृशास्त्र: मृत्युपरांत जीवन मार्गदर्शन
:'शिवंजय ':डॉ संजय होनकळसे
https://m.facebook.com/story.php?story_fbid=2316181865064144&id=100000170606055

देवताभ्यः पितृभ्यश्च महायोगिभ्य एव च।
नमः स्वधायै स्वाहायै नित्यमेव भवन्त्युत।।
वायू पुराण

मृत्युपरांत जीव देहातून बाहेर पडलेला पडतो अशा शरीरास प्रेत म्हणता ,शिवातुन प्राणशक्ती बाहेरपडल्यावर ते शव होते.त्यातून बाहेर पडलेल्या आत्मज्योतिस योग्य वाटचाल करण्यास व होण्यास  साहाय्य म्हणून अंत्येष्टी ( अंत्य=शेवटचा इष्टी =अग्नी संस्कार) व तेरा दिवसाचा त्या आत्म्यास मार्गदर्शनपर
व संस्कार व्हावे म्हणून तेरा दिवस विधी करतात .हे संस्कार जर केले गेले नाहीत ,(आज काल फॅशन  आहे तस नकरण्याची व नाकारण्याची)तर तो जीवात्मा प्रेत योनीत जातो पिशाश्च योनीत जातो .आपक्या या विधीस आधुनिकतेच्या नावाखाली वा अज्ञानाने नाकारण्यांनी हे लक्षांत घेणे हितावह होईल की इतर धर्मात हि त्यांचे त्यांचे विधी आहेत व ते पाळले जातात .तिथे आपणाला त्यांच्या भावना व पद्धतीचा आदर राखायचा ही आपली सहिष्णुता. पहाना आपण उल्लेख करताना इतर धर्म असं म्हणायचं ,मात्र इतरांनी हिंदू ऐसे,वैसे करत डायरेक्ट वार करायचे.असो  पण आज जगभर त्या विधींमधील दोषच समोर येत आहेत व सनातन पद्धतच योग्य व शास्त्रोक्त  आहे हे मान्य होत आहे  उदाहरण घ्यायचे तर पारशी पद्धतीत शवास गिधास खावयास देतात  गिधाडे शव खातात पण आज मुंबइसारख्या  ठिकाणी शहरी भागात कुठून गिधाडे येणार त्तमुळे देह कुजून जातात व ते सार्वजनिक आरोग्यास धोकादायक हिट आहे ,हे कुणी बोलण्यासाहि धजावत नाही असे कित्येक शव त्यांच्या स्मशानभूमीत सोडून पदके आहेत ,एका पारसी बाईने आपल्या वडिलांचा शव 5 वर्षांपूर्वी असायचं ठेवला व चार दिवसांनी पाहायला गेली तर देह तसंच सादत होता ,तिने गपचूप फोटो काढले असे अनेक दिवस तिने निरीक्षण केले व नाग ते दुखाने पब्लिश केले तर तिला outcaste केले गेले असे किती देह आजही सडून कगराब होऊन सार्वजनिक आरोग्यास घातक होत आहे .
तसेंच ख्रिश्चन धर्मांत व इस्लाम  मध्ये दहन न करता दफन करतात .त्यांना तेवढी दोन गज जमीन भाड्याने घ्यावी लागते व ती ठराविक मुदातीसाठीचं मिळते व कित्येक थिकाणी मरणा आधीच बुक करावी लागते जमिनीचे भाव वाढत आहे तसे जागा व किंमत न परवडणारी होतेय .जगण्यापेक्षा मरणाची किंमत जास्त मोजची लागतेय 1982 साळू span मॅगझीन ने यावर लेख लिहून हिंदू पद्धत कशी इकॉनॉमिक व सुलभ आहे व ती ख्रिश्चन धर्माने स्वीकार्य जारण्यासाग विचार व्यक्त केला गेला . आपली  दहनाची पद्धत शास्त्रोक्त व योग्य आहे पंच भुताने बनलेला देह पंचतत्वातच विलीन होतो.व आपली पद्धत इतरां पेक्षा स्वस्स्त व मस्त आहे हे आता सिद्ध होत आहे.आणखीन एक अत्यंत शास्त्रीय कारण आहे प्रेतास गिधाडे वा दफन करण्यापेक्षा अग्नी देण्याचे शास्त्रीय कारण.
आपल्या शरीरात पंच प्राण व पंच उप प्राण असतात 1)प्राण ,2)आपान,3)व्यान 4)उदान व 5)समान।
*१) नाग  २) कूर्म  ३) कृकल  ४) देवदत्त  ५) धनंजय*
प्रत्येक प्राणाचे कार्य भिन्न भिन्न आहे.
पाच मुख्य प्राण..
*१) प्राण:- हा वायु हृदयात राहतो व श्वासोच्छवास करतो.
२) अपान:- हा वायु मोठया आतडयात राहतो व मलमूत्राचे विसर्जन करतोO.
३) व्यान:- हा सर्व शरीरव्यापुन राहतो.
४) उदान:- हा कंठात राहतो व अन्नरसाचे विभाजन करतो.
५) समान :- हा नाभी कमलात राहतो व सर्व नाडयांना अन्नरस पुरवितात
पाच उपप्राण आहेत....
१) नाग  २) कूर्म  ३) कृकल  ४) देवदत्त  ५) धनंजय*
१) नाग* :- हा वायु ढेकर निर्माण करतो व शरीरातील अशुद्ध तत्वे बाहेर टाकतो.
२) कृर्म* :- हा वायु पापण्यांची उघडझाप करतो.
३) कृकल* :- हा वायु शिंक व खोकला निर्माण करतो
४) देवदत्त* :- हा वायु जांभई निर्माण करतो.
५) धनंजय* :- हा वायु मृत्यूनंतर आपल्या शरीरात राहतो व वातावरणातील पिशाच्चे शरीरात शिरणार नाहीत याची काळजी घेतो.
यावरून एक गोष्ट लक्षात येईल की. प्रेत जाळणे ही गोष्ट शास्त्रीयद्रुष्टया अतिशय चांगले आहे. कारण प्रेत जाळल्याने धनंजय वायू शरीरात Iअडकून राहत नाही व जीवात्म्याचीही मायेतून त्वरीत सुटका होते.
(सिद्धपुरुषांचे देह चिन्मय असतात*,त्यांचे देह पुरतात व त्यावर समाधी बांधतात व त्या समाधीची पूजा केली जाते अर्थात तेही सिद्धपुरुषाच्या इच्छेनुसार)
'शिवंजय':डॉ संजस्य होनकळसे
drsanjayhonkalse.tripod.com
shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

कृष्णसखा उद्धव

पितृशास्त्र भाग 10:"पितृपक्ष: निषिद्ध कार्य :चुकून नका करू हे  काम*

७)पितृशास्त्र:अंत्येष्टी व दशक्रिया