दक्षिणद्वार सोहळा:
दक्षिणद्वार सोहळा: शिवंजय डॉ संजय होनकळसे©
http://shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com/2018/07/blog-post_85.html
भारतीय संस्कृती,परंपरा,व नित्यजीवनामध्ये नदी हिअत्यंत पूजनीय ,जीवन दायिनी जीवन उद्धारिणी व पवित्र मानली जाते.नदिला तीर्थाचा दर्जा प्राप्त आहे.भारतातील अनेकानेक तीर्थक्षेत्रे ही नद्यांच्या किनारी वसलेली आहेत.अत्यन्त पवित्र मानल्या गेलेल्या नद्यांपैकी गंगा व यमुने काठी तीर्थ राज क्षेत्रे आहे.त्यातूनही नद्यांच्या संगम ज्याला प्रयाग म्हणतात ही अत्यन्त पवित्र म्हणून मान्यता प्राप्त आहे.त्रिवेणी संगम ,त्रिवेणी सागर संगम हे जगांत एकमेवद्वितीय आहेत.सोमनाथ येथे तर तीन नद्या व् सागर संगम आहे.सद्गुरुकृपे भारतात सप्त पवित्र नद्या व प्रमुख संगमात स्नान तर्पणाचे भाग्य मला लाभले व नाड्यंकाठचे अनेक तीर्थस्थान व इतरही अनेकनद्यांमधे तर्पण स्नान करवले गेले.
असेच एक स्थान आहे जेथे सात नद्यांच्या संगम आहे व त्याचा सोहळा पण साजरा होतो .ते म्हणजे कोल्हापुरच्या शिरोळ तालुक्यातील नृसिंह वाडी होय , व तेथील कन्यागत ,द्क्षीण द्वार सोहळा .
स्वयंभू मनू वा सत्ययुगापासून असलेल्या सत्व राज तम व उत्पत्ती,स्थिती,लय या त्रिगुण ,त्रिगुणातीत दत्त अशा या त्रैलोक्य अवताराचा उगम ,उद्भव ,व उन्नत प्रवास त्यांच्या 16 अवतार स्वरूपात आहे हे बहुदा फारच थोड्या साधक भाविकांना ज्ञात असावे .कालाग्नि क्षमन या दत्तरूपाचे श्रीपाद श्रीवल्लभ व नृसिंह सरस्वस्ति इत्यादी हे कलीयुगीन संन्यासी दत्तावतार प्रचलित व प्रसिद्ध आहेत.
कृष्णेकाठी वसलेल नृसिंहसरस्वती या संन्यासी दत्त अवतार याचं हृदयस्थान ,हृदयालाय आहे असे मीं नेहमी म्हणत आलों आहे.कलीयुगीन दत्तस्वरूप अवतारी श्रीपाद श्रीवल्लभ व नृसिंह सरस्वती यांचे जीवन कार्य कृष्णेच्या संनिधी झाले आहे.वाडी हे श्री दत्तावताराचे हृदयस्थान आहे तर कृष्णा तिरीचेच कुरवपूर नाभिस्थान आहे.त्यामुळे या सर्व भागातील प्रदेश कृष्णावेणी व दत्तावतारी संन्यासरूपी श्रीपाद व नृसिंह यांच्यामुळे पावन व सुपीक,सुजलाम, सुफलाम आहे.एकंदरीत कृष्ण नदीचे महत्व व महात्म्य अविरत व अविचल आहे. स्कंदपुराण,पद्म पुराण, व ब्रह्मपुरांणात कृष्णा नदीच्या महात्म्याचं वर्णन प्रस्तुत आहे.पांडवांनीही कृष्णेतीरी धार्मिक कृत्ये केल्याचा उल्लेख आहे.भगवान परशुरामयांनीही 21 वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केल्याच्या पातकापासून कृष्णतिरिच मुक्ती मिळवली. आदिशांकरचार्यांनाही कृष्णा विष्णूरूपी असल्याचा साक्षात्कार झालेला होता.
सिद्ध, ऋषी ,देवादिकांनाही कृष्णेच्या सानिध्याची आस व अनुभव घेतला आहे.कृष्णातीरीच्या विविध तीर्थ क्षेत्राची अनुभूती वाल्मिकी,व्यासादी, पराशर,अत्री इत्यादींनीसुद्धां घेतलीय ,आदी शंकराचार्य,संतश्रेष्ठ एकनाथ(ज्यांनी वादुस घाट बांधला),रामदास स्वामी,नृसिंह सरस्वती ,वासुदेवानंद सरस्वती टेम्बे स्वामी इत्यादिकांनी कृष्णानदीचे सान्निध्य व महात्म्य जाणले व उन्नत केलंय.जशी गंगा विष्णूच्या अंगठ्यातून,गोदावरी शिवाच्या जटेतून,नर्मदा शिवाच्या घामातून प्रकटली तशीच कृष्ण हि विष्णूच्या अंगातून प्रकटली नव्हे ती विष्णूचे जलरुपें आहे.
अशी ही कृष्णा हि साक्षात विष्णूभगवंतांचे हरीचे जलरूप आहे व वेण्णा हे हर रूप आहे .अशी ही कृष्ण वेणी जी नृसिंहवाडि येथे स्थित हरिहरस्वरूप आहे. शिरोळ तालुक्यातील नृसिंह वाडी येथे सप्त नद्यांचा संगम आहे.कृष्णा ,वेण्णा,या दोन संगमस्थ नद्यांचा व शिव ,भद्रा ,भोगावती,कुंभी व सरस्वती या पंच नद्यांचा पंचगंगा रुपी नदीचा संगम वाडीला होतो.असं हे सप्तनद्या यांच्या संगमावर वसलेलं वाडी हे निरामय, निस्पृह ,तीर्थस्थान आहे.म्हणूनच वाडीची माया व किमयाहि विरळी व न्यारी आहे.
तर अशी सप्तनदी रुपी कृष्णा संथ ,निरामय,आहे तिला कधीच उधाण येत नाही.ती नयन मनोहारी अतीव आनंदमयी आहे तिचा व सप्तनद्यांचा उगम हा महाबळेश्वरला होतो.ते तिचे मुख ,वाडी हृदय ,कुरवपूर नाभी तर ती जिथे सागरास मिळते ते तिचे चरण आहेत कारण ती तेथे म्हणजे कोरामांडल येथे दोन ठिकाणी ,दोन चरण रुपी ,विभाजनाने सागरांस मिळते ती बंगालच्या गंगासागराजवळ.ती सर्व पापांचे कर्षण करणारी =
" सर्व कर्षति चेद्योsघं तेन प्रकिर्तीता"आहे.
सर्व पापांच आकर्षण करून त्यातून मुक्ती देणारी मुक्तिदायिनी आहे.अशी ही पापक्षालिनी,इच्छाकांक्षा पुरती करून आरोग्य ,भुक्ती व मुक्ती देणारी कृष्णा वर्षातून एक दोनदा नृसिंह स्वामींच्या पादुका स्पर्शासाठी वाडीचा तीर व पातळी चिडून अगदी शांत पणे आषाढात वर चढते व पादुकांना अभिषेक करते ती उत्तर द्वारातून जाऊन दक्षिण द्वारातुन बाहेर पडते तेंव्हा त्यास दक्षिण द्वार सोहळा म्हणतात.
पावसाळ्यात कृष्णा नदीची पातळी वाढते,त्याच वेळी पंचगंगा व वेंण्णाला उधाण येते व कृष्णपंचगंगा यांच्या संगमी पाण्याला फुगवटा येतो.तेंव्हा पादुका व मंदिर पाण्याखाली येते.असे होत असताना एका विशिष्ट वेंळी दक्षिण वाहिनी कृष्ण मंदिराच्या उत्तर द्वारातून शिरून पादुकांना स्पर्श करीत दक्षिण द्वारातून बाहेर पडते त्यास दक्षिण द्वार म्हणतात ,जशी कृष्ण जन्मवेळी यमुनेच्या भरती येऊन डोक्यावरील टोपलीत ठेवलेलता बाळकृष्णाला घेऊन जाणार-या वासुदेवाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या यमुने प्रमाणेच या वेळी कृष्णावेणी स्वामींच्यापादुकांना उत्तरद्वारातून शिरत पादुकांना स्पर्शाभिषेककरत दक्षिण द्वारातून आनंदित व पावन होत दक्षिण द्वारातून बाहेर येते.गणपतीपुळे येथेही समुद्र पावसाळ्यात भरती येऊन मंदिराच्या गणेशास पदस्पर्श करतात.तसेच स्वामी पादुकांना स्पर्शाभिषेक करून कृष्णा ,अभिषेक रुपी कृष्णा, दक्षिणद्वारवाहिनी कृष्णेच्या पादुकाभिषेक झालेल्या पाण्यात स्नान करण्याच्या पर्वणीस दक्षिण द्वार सोहळा साजरा करतात.
कृष्णामाईचे पाणी चढत चढत उत्तरद्वार आणि समोरुन पादुकांच्या गर्भगृहात शिरते. माई श्रींचे दर्शन घेते आणि दक्षिणद्वारावाटे हळुहळु बाहेर पडू लागते. पाणी आणखी चढल्यावर दक्षिणद्वाराने पाणी जोराने आणि भरपुर प्रमाणात बाहेर पडू लागते. हा क्षण आला की पुजारीमंडळी भोंगा नाद करवुन दक्षिणद्वार सोहळा सुरु झाल्याची सुचना देतात व असंख्य साधक व भाविक येथे स्नानासाठी धांव घेतात. कारण असे अभिषेक जल व तेही स्नानरूपे मिळणे हि अनोखी ,अवर्णनीय आनंदमयी पर्वणीच असते.
म्हणले तर हि एक भौतिक व नौसर्गिक घटना आहे पण श्रद्धेंने पाहिले ,अनुभवले तर हिचं भौतिक घटना आधी भौतिक,अध्यात्मिक अनुभूती देते.कारण साक्षात दत्तावतारी स्वामींच्या पादुकावरील वाहणाऱ्या प्रवाहाच्या अभिषेक रुपी प्रवाही जलांत स्नान करन्याचा हा दुर्मिळ प्रसंग असतो.इतर वेळी पादुका सोवळ्यांत असतात.आणि म्हणूनच या भौतिक घटनेचे भक्तीसागरांत रुपान्तर होते
वासुदेवानंदसारस्वती टेम्बे स्वामी यांनी घालून दिलेल्या या प्रथेत पुजारीमंडळी श्रींना (पंचधातुच्या पादुका, फोटो, मुखवटे व इतर चल उपकरणासह) पालखीत घालून भर पाण्यातुन मिरवत वरच्या बाजूस असलेल्या श्रीमन्नारायणस्वामींच्या (जेथे एरवी श्रींची पालखीतली उत्सवमूर्ती असते) मंदिरात आणतात व पुढचे नेहमीचे सर्व पूजोपचार येथे चालू ठेवतात.
इकडे मग देवांच्या पादुकांवरून येणाऱ्या पाण्यात स्नान करुन पवित्र होण्यासाठी भक्तांची एकच लगबग सुरु होते. या पवित्र जलात डुबकी मारताना भक्तमंडळी आपल्या मनोकामना देवांना सांगतात आणि श्रीमन्नृसिंहसरस्वती दत्तमहाराज, श्रीकृष्णामाईसह कल्पतरु होऊन त्या पूर्ण करतात अशी भक्तांची श्रध्दा आहे.
यावेळि पाण्यास ओढ असल्याने प्रदक्षिणा मार्गावर मजबूत दोरांचे कुंपण घालून भक्तांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जाते.
हा सोहळा काहि तास सुरु रहातो. मात्र पाणी जास्त वाढल्यास संपूर्ण देऊळ पाण्याखाली जाते आणि मग सुरक्षिततेसाठी कोणासही तिथे जाऊ दिले जात नाही.
श्रीकृष्णामाईचा पुर ओसरतानाहि अशी स्नानाची संधी पुन्हा मिळते.
असा सोहळा प्रत्येक पावसाळ्यात एकदोनदा तरी होतो. स्नानोत्तर काही भक्तमंडळी ते पाणी तांब्या/बाटलीत भरुन तीर्थ म्हणुन घरी नेतात.
पाणी पूर्ण ओसरल्यावर पुजारी मंडळी सर्व मंदिर स्वच्छ करतात आणि आणखी एक भक्तीसोहळा तिथे सुरु होतो. तो म्हणजे तुळशीच्या काढ्याचा.असे म्हणतात की पावसात राहिल्याने स्वमुंचता चारांनाना सूज येते व चरण पादुका फुगतात.
आपल्या घरी पावसाळ्यात भिजणे झाल्यावर सर्दी होऊ नये म्हणुन आपली आई तुळशीचा काढा बनवून रात्री आपल्याला पाजत असे. त्याच भावनेने पुजारी मंडळी पुढचे सलग ७ दिवस तुळशिचा काढा बनवुन त्याचा नैवेद्य रात्री देवांना अर्पण करुन नंतर प्रसाद म्हणुन भक्तमंडळींना वाटतात. अर्थात हा काढा बत्ते भरभरुन केला जातो हे वेगळे सांगायला नको.त्याच बरोबर पादुकांना तेलाचे मार्डन होते व ती सूज उतरवली जाते. अशी ही मधुरा भक्तिच हे साक्षात प्रमाण आहे.
श्रीदत्तमहाराजांची उत्सवमूर्ती जिथे असते त्या श्रीमन्नारायणस्वामींच्या मंदिराच्या समान पातळीवर त्यांचे शिष्य काशीकरस्वामी, श्रीरामचंद्रयोगी, मौनीस्वामी, गोपाळस्वामी, टेंब्येस्वामी यांचीही मंदिरे आहेत. क्वचित प्रसंगी श्रीकृष्णामाईस त्यांच्याही दर्शनाची ओढ वाटल्यास पाणी आणखी चढून त्याही मंदिरात येऊ लागते. अशावेळी पुजारी देवांसह सर्व उत्सवमूर्ती आणि पादुका वरीलप्रमाणे पालखीतुन गावात ज्या पुजा-यांची त्या सप्ताहात सेवा असेल त्याच्या घरी मुक्कामाला नेतात. आणि सर्व पुजोपचार त्याच्या घरी केले जातात.
एकाच वेळी देव आणि सर्व संन्यासी संत मंडळी गृहस्थाश्रमी पुजार्याच्या घरी येतात.
केवढे हे भाग्य!
अशा या पर्वणी काळातच अजाणतेपणे मी वाडीला प्रथम आलो ते 30 वर्षांपूर्वी 1989 साली यांचं दिवसांत.त्यावेळी जाण नव्हती तर ज्ञान कुठून असणार ? पण मला आठवते ते पूर्ण मंदिर पाण्याखाली गेलेले मी पाहिले होते.त्यावेळीं दत्त वा दत्तअवतारांबद्दलही फारशी माहिती नव्हती.त्यावेळी वाडीत उतरण्याची मुक्कामाची व्यवस्था नव्हती .ती सोय फक्त वासुदेव पुजारी यांचाकडेच होती.आम्ही तेथे उतरलो .व दत्त याग केला तोही मालामंत्र युक्त ,तोही अवधूत शास्त्री त्यांचता सारख्या सुविद्य ,सशक्त गुरुजीं मार्फत. ती माझी गुरुजींशी पहिली भेट
हि माझ्या आध्यत्मिक जीवनाची सुयोग्य नांदी ठरलीत्याचटकडून मी एकलाव्यासारखे मालामंत्र व देवी अपराध क्षमापंन स्तोत्र शिकलो .या शतकात अनेक दत्त याग ,रुद्र स्वाहाकार व इतर दत्त सेवा स्वामींनी करवल्या
त्यानंतर सर्व ज्योतिर्लिंग स्थानी रुद्र ,महारुद्र सेवा सद्गुरूंनी करवून घेतली ,12 ज्योतिर्लिंग सेवा अनेकानेक वार करवली. व आता या वर्षी दक्षिण द्वार पर्वत परत बोलावून घेतले. या वेळी आम्ही श्री चरणी ध्वज अर्पण केला तो लगेच स्वामींनी स्वीकारला व त्या चे ध्वजारोहणही करवले.
व हा सारा आजतागायतचा प्रवास व आनंद सोहळा साधक नारायण व वाचक नारायण रुपी आपणापर्यंत पोहोचवण्याच दुर्मिळ योगही लाभला ज्या योगे आजच्या तरुणांना व इतरांना स्फुएटी ,व प्रेरणा मिळो हीच भूमिका या लेखनसेवेमागची सांगून हि सेवा त्या नियंत्याचता चरणी सविनय सादर करतो.
शिवंजय डॉ संजय।©
https://m.facebook.com/story.php?story_fbid=3659033560778961&id=100000170606055
https//:drsanjayhonkalse.tripod.com
shivanjaydrsanjayhonkalse.blogspot com
Comments
Post a Comment