वारी; च्या वाऱ्यांची ;गणना&t;त्मक प्रसूति व प्रस्तुति ही गुणात्मक सेवा साधनाच आहे। माझेही मत:©।


: "वारी" च्या वाऱ्यांची  "गणना"त्मक प्रसूति व प्रस्तुति ही गुणात्मक सेवा साधनाच आहे। माझेही मत:©। शिवंजय डॉ संजय होनकळसे ©
https://m.facebook.com/story.php?story_fbid=2163614470320885&id=100000170606055
ॐ अगस्तै नम:|कृणवन्तो विश्वं आर्यं|
(चार ओळी लिहितालिहिता बरीच लांबण लागली  पैन हाट जोड़ूँ साधकाना विनंती शांत व पेशंस ठेवून वचावे)

          कणा सरळ पण अखड नसावी.
जे आर डी टाटांचा 1982 साली मुंबई गिरगाव चौपाटीवर मुंबई महानगरपालिकेमार्फत  सत्कार केला गेला.त्यांनी मुंबई ते कराची  सोलो flight चा वर्ल्ड रेकॉर्ड केला होता.क्ष

1932 साली त्यांनी एयर इंडियाची स्थापना केली.15 Oct 1932 साली त्यांनी एक सोलो फ्लाइट कराची ते मुंबई उड्डाण केले.खर तर हा एविएशन/उडाण क्षेत्रातील नुसता ऐतिहासिकच नव्हे तर विक्रमी क्षण होता.
पण हांच क्षण त्यांनी बरोबर 30 वर्षानी 1962 साली परत जगाला बहाल केला तोहि त्यांचा दिवशी 15 ऑक्टोबर ला व त्याच वेळी व त्यांच मार्गावर. हेही नसे थोड़े म्हणून हांच विक्रम त्यांनी पुन्हा 1982 साली पुन्हा तसंच त्यांचा दिवशी केला .
विचार करा एकाच व्यक्तिने ,तेहि  भारतीयाने, वयाच्या 28 ,58 व 78 व्या वर्षी  हा विक्रम केला व त्याची गिंनिज बुक मध्ये नोंद ही झालीय
त्यासाठी हा सत्कार समारंभ 1982 साली  आयोजित केला होता.
हे  मि माझ्या पोदार महाविद्यालयीन व वहातुकीचे अर्थशास्त्र (Transport Economicsच्या व्याखानातील  उदाहरण इथे आता लिहिण्याच कारण सध्या आमचे साधक बंधू नरेश क्षीरसागर व दत्तपरीवारामध्ये रंगत असलेली चर्चाविषय:

"लोक गिरनार वा-या का मोजतात कळत नाही?
घेऊन जाणारा तो,वर चढ़वणारा तो,रुबाब मात्र आपण करायचा."

चर्चा छान रंगली,सर्वांनी मते निरामय पणे मांडली.कुठेही आकस बुद्धि दिसत नव्हती. विष्णुगिरी महाराज म्हणतात तसं"वा-या करण्यात साधना मस्त असावे ।त्यांच्या विषयी बोलण्याचा माझा अधिकार तर नाहीच पण कुवतही नाही पण त्यांच म्हणनं रास्त व कडकच।आमची 'ऋणा'नुबंधित मैत्रीण सुनेत्रा जावकरमाउली परखड. त्यांचा,माझ्या निरिक्षणारूप ,चार वर्षातील आलेख उल्लेखनिय त्यांच प्रतिकूल परिस्थितित झगडणं मी पाहिलय,पण अजुन फार लांबचा पल्ला आहे.
असो मलाही असंच वाटायचं की आपण आपली सेवा व साधना करणं महत्वाचं,मोजमाप परिमाणं नकोत.
शांतपणे माझी तीर्थयात्रा साधना मी करता झालो,नरेशमाउलीं सारखं.येतील त्यांना बरोबर घेऊन गेलो.फरक इतकांच कि :
अ)छोट्या प्रमाणात मी ते केले.
ब)सारे मूकपणे व मुख पब्लिसिटीवर व नॉनप्रॉफिट बसिस वर, स्वतःचे पैसे स्वतःच व गरज पडल्यांस इतरांचे पैसे भरून केले .
क) मी फक्त ज्योतिर्लिंगांवर भर देऊन त्याअनुसंगे आसपासची स्थाने करीत राहिलो.जस हिमालय मंडल रूद्रनाथ करताना अत्रि अनुसूया आश्रम येथे भेंट दिली.
ड) त्यावेळी FB,वॉट्स अप नव्हते म्हणुन पसारा नरेशां इतका मोठा नव्हता पण नोकरी करून एकही शनिवार रविवार ,जोडुन सुट्या घेऊन सतत केल्या.

साधारण एका वर्षांत 25 ते 30 वेगवेगळ्या ठिकाणी भारत भर व 2013 पासून जगभर यात्रा करत राहिलो,घरदार,नोकरी व इतर जबाबदाऱ्या सांभाळत,अशाच इकॉनॉमी बजेट मध्ये.

कधी स्पर्धा व वाऱ्यांच ध्येय ठेवलं नाही.पण कार्यालयीन कारणां साठी रेकॉर्ड ठेवत गेलो.आणि लक्षांत आले विश्वानाथानी आपसूकच,सातत्याने नचुकता, एकही वर्ष वाया न घालवता  (continuously,consistent ly,constantly)आई खाटेवर व दूसरे कुणी नसताना पण तीला एकटी न पडु देता सेवा करवुंन घेतली व1997 ते 2002 या दरम्यानच म्हणजे 5 वर्षांत 12 ज्योतिर्लिंगे यात्रा 12 वेळा व उपयात्रा करवल्या गेल्या. (नारेशरावांची व् तद्विचारी इतरांची माफ़ी मागून पण अंकशास्त्रमंडित हेतुपूर्वक लिहितोय).मग तशीच सहजसवय झाली ती आज तागायत त्यानंतर अगदी मी,नाही म्हणत म्हणत:
35 वेळा 12 ज्योतिर्लिंगे,
एकादश शिवस्थाने,
काही दशविद्या स्थान, अष्टनारायण,अष्टविनायक,
सप्त कैलास,
षष्ट कार्तिकेय,
पंचलिंग,पंच रामा,पञ्च बद्री ,पंच केदार,पञ्च प्रयाग,
चारधाम, शंकराचार्य व् बुद्ध चार धाम,
त्रिस्थली,35 शक्ती पीठें,
दोन ब्रह्मा स्था नं,
एक ओमकार पर्वत करउन घेतली गेली.

महावतार बाबाजींवर पुस्तक लिहल्यावर {महावतार बाबाजी :मराठी,हिंदी व आता इंग्रजीतही.जगांत कुठल्याही भाषेत बाबाजींवर चरित्रात्मक प्रथम व आजही एकमेव पुस्तक ज्यानंतर इतर अनेक (पण चरीत्रात्मक नव्हे)पुस्तके आली} त्यात लेखक परिचय देताना ही सारी आकडेवारी (पण त्यावेळी जेवढि लागु होती तेवढि)द्यावी लागली. त्यानंतर काही गोष्टी लक्षान्त आल्या.
१)मार्गदर्शन व मदत:
   एक म्हणजे उत्सुक व इच्छुक चौकशी करू लागले की जायचे कसे,व्यवस्था,अडचणी इत्यादीं बाबत मार्गदर्शन मागु लागले.ही समस्या मलाही सुरुवातीला होती की जिथं ज्यायचं,तिथली मार्ग, व्यवस्था इत्यादी.माझी काही स्थान तेंव्हा व आजही अपरिचित आहेत जस  कित्येकांना आजही ज्योतिर्लिंगे कितीआहेत हे माहीत नसते,माहित असले तर एका जन्मात ती शक्य नाहीअसे वाटते,जावे वाटलं तर ती नेमकी कुठे आहेत व कुठली हे कळत नाही,अमरनाथ सारखी स्थानंपण ज्योतिर्लिंगच आहे असे कित्येक जण समजतात,सिद्धपीठ व शक्ति पीठ यातला फरक माहीत नसतो, पीठ व पादुका यात गफलत होते,(गिरनारला पादुका आहेत,तर कुरवपुरला पीठ आहे पण तेथेही पादुकाच आहे असे कित्येक जण समजतात)
२)विश्वास:
  कित्येकांना आपण स्वतः या धर्मयात्रा करू शकतो हा विश्वास निर्माण झाला व नन्तर मला तसा प्रयत्न करण्यासाठी उद्युक्त करता येऊ लागले.या धर्मयात्रा आहेत सहली नाहीत हे सांगता येवू लाग ले त्यासाठी लेख लिहू लागलो. ref'केल्याने देशाटन' सारखे लेख लिहून घेतले गेले(http://shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com/2011/ 08/blog-post.html)
.3) विकास:
    या धर्मयात्रांच्या फायदा ( वैयक्तिक{व्यक्तिमत्व विकास, समस्या निवारण,भौक्तिक धार्मिक,आध्यात्मिक)अनुभवला,कळला ,कळवता आला.
४)जाणीव जागृति:          अनुमान,अनुभव,अनुभुति या त्रिजाणीवा जागल्या,जगल्या जगवल्या ,जागवल्या जाऊ ला गल्या.
५) संपर्क:
      लिखाणाद्वारे साधका पर्यन्त इच्छुकांपर्यंत,साधना मार्गातील लायक व गरजुंपर्यन्त पोहचता आले .वरील २,३,४ याबत विपुल  लिखाणसेवा,वाचकनारायण सेवा सामना,लोकसत्ता,मासिक,त्रैमासिक ,वार्षिकांक यांत करवून घेतली गेली.http://shivanjaydr sanjayhonkalse.blogspot.com/?m=1
जसं आपण बुद्ध्यांक (IQ), भावनांक(EQ)म्हणतो तसं मी अध्यात्मांक"(SQ=spiritual quotient यावर पुस्तक लिहिले:Management by Spiritual Quotient: (Sieq): The Power of the Faith. https://www.amazon.in/dp/1448970148/ref=cm_sw_r_cp_apa_i_8XokBbJ3VDNPX
६) सुहृद गांठी:
अनेक मित्र,साधकबंधू जेष्ठसंत, सुहृद  लाभले.सर्व नावे सांगणे कठिण,जैसे स्वामी अभिरामदा स,महंत चंद्रगिरी,केदारबद्रीचे प्रधान पुजारी,वेदमूर्ती विवेक शास्त्री,त्यांचे चिरंजीव विश्वजीत गोडबोले,वेदमुर्ती अवधूतशास्त्री, कुरवपूरचे राजूभट्ट,दत्तभक्त सुहृद श्री सुहास जोशी,गुरुतुल्य गुरुनाथ मुंगळे,दादा बापटमहाराज,माज गावकरसर,सज्जनगडीचे मारुतिबुवा रामदासी,बदलापूरचे दत्तमूर्ती दत्तात्रेय गुरुजी  इतर ठिकाणचे संत महंत पुजारी,महंतचंद्रगीरीजी,शंभुनाथ महाराजगिरनारी300वर वा-या आमचे गिरवीचे जेष्ठबन्धु जयंत देशपांडे,पुणेनांदेड़ सिटीचे जेष्ठगुरु बंधु गुरूजी(पूर्वाश्रमिचे खळदकर,थाण्याचे गुरुभाऊ कैलास बंधू कुलकर्णी,आदरणीय शंकर महाराज सेवक भटकती आत्मा नाथबाबा,पप्पा पुराणिक, मित्र महेश सावंत,शेखर सोहोनी यांच्यासारखे कित्येक सुहृद स्नेही जिवलग लाभले.
७)कित्येक ठिकाणी संवाद, अनुभव कथन ,विचार प्रस्तुती करवून घेतली गेली .जसे 2017 ला आमचे गुरुभाई श्री कैलास बंडू कुलकर्णी (६० पेक्षा जास्तवेळा गिरनार व अनेकांना निरामय मार्गदर्शन) यांनी ठाण्यात बोलायला लावले व मेडिकल adviceच्या against मीही 3 तास बोललो.
८)स्फूर्ती व् प्रेरणा:
   सर्वात महत्वाचे माझी आकडे वारी अनेकांना स्फूर्तीदायक, प्रेरणा दायक ठरली।उदा.माझ्या पोदार महाविद्यालयातील कलिग सौ नीलिमा सोळंकुरकर 2002 च्या जानेवारी माझ्याकडे आल्या व म्हणाल्या ",संजय तुम्ही कसे काय सारे ज्योतिर्लिंग 12 वेळा केलेत ? मी नाताळांत श्री शैलम येथे जाऊन आले किती लांब आहे ते ? तुमची 12 वेळा यात्रा झाली मला ते शक्य नाही मग मी देवाला 12 वेळा नमस्कार केला व या नंतर प्रत्येक ठिकाणी करेन.
आमचे साधक स्नेही महेशजी सावंत हे 2015 ला पुस्तकाच्या (बाबाजी)माध्यमातून भेटले व त्यांनी 2015 ते 2017 केवळ या दोन वर्षांत 12 ज्योतिर्लिंग यात्रा चारधाम ,कैलास, 112 दिवसांत नर्मदा परिक्रमा ,परशुराम कुंड यात्रा केल्यां.अनेक यात्रा आम्ही सह केल्या.मला माहित आहे महेशजी हे नक्क्की दुजोरीत करतील.
तसेच महंकालचे पंडित कौशल व्यास ,व् ओंकारेश्वरचे कौशिक सुरेश ,सोमनाथचे पुजारी हेतल जानी यान ज्योतिर्लिंगे यात्रा कंटास प्रवुत्त केले.
मग आपल्या वाऱ्यांच्या माहितीने जर अनेकांना वरील 8 लक्षणीय फायदे व् प्रेरणा ,स्फूर्ती मिळत असेल तर तस का सांगायचे नाही? तेही आप्त अज्ञात ,ज्ञात साधकांना.
नेमके हेंच जे.आर.डी.यांनी त्यांच्या 1982 नोव्हे च्या सत्कारास उत्तर देताना सांगितले. ते म्हणाले होते
"हा तीन वेळा वयाच्या तीन टप्य्यात विशेषतः या 78 वयात केलेला जागतिक विक्रम,पराक्रम केला तो प्रसिद्धिसाठी नाहीतर आजच्या तरुणाईस प्रेरणा मिळावी म्हणून केला"
नेमकं हेंच मला आता उतरणीला लागताना (या आधीतर शिक्षक म्हणून वाटतच होते व मी ते प्रभुकृपे नीट केले)वाटतें की यात्रा आवर्तने,आपले अनुभव,विचार सर्वांपर्यंत विशेषतःआमच्या ओमकार दामले सारख्या तरुणां पर्यन्त पोहचावे कारण आजची तरुणाई विचार करणारी आहे त्यांना औत्सुक्य,निरिक्षण शक्ति, कुतूहल व गरज आहे व ती मी आमची "स्व"रपा रुचिरा हसोळ कर,टीका शा"स्त्री"-मित्र पूनम देशमाने व दामल्यांसारख्यां च्या नजरेत नेहमी पाहतो.तरुणांना श्रद्धेपेक्षा logically, सायंटीफिक ली  सांगणं गरजेचे आहे पण तसे सांगणारे फारच कमी आहेत. ।लक्षांत घ्या तसं  सांगणारे कमी आहेत.बाकीचे अमाप एक तर बुकींश(bookish) सांगणारे आहेत जे आज तरुणांनाच  कां वरिष्ठांमध्ये पण श्रद्धा निर्माण कर शकत नाहित.(वरीष्ठ मित्र दिलीप दोड व इतरांनी तसं मला 17 ऑक्ट 2017 च्या ठाणे कैलास कुलकर्णी यांच्या गिरनारवारी मेळाव्यात माझ्या कथना नंतर स्पष्ट सांगितले  होते व ते येथे परत हे स्फुट वाचलतर जाहीर रित्या  सांगतील याची मला खात्री आहे) व जे प्रसिद्ध संत महात्मे साधू अध्यात्म सांगतात व व्याख्यान देतात ते बहुतेक सारे श्रद्धा गृहीत धरून बोलतात.तसं आजच्या बुद्धिवादी तरुणाईचं नाही त्यांना आकडेवारीत,वैज्ञानिकरित्याच तार्किक सांगणे महत्वाचे.आपले अध्यात्म संपूर्ण,लक्षांत घ्या संपूर्ण  शास्त्र आहे.म्हणूनच नाही का आपण कित्येक उत्सव,सण,वार, विधी,अगदी जन्मापासून मरणा पर्यंत व मरणोपरांत विधीबाबत शास्त्र असे म्हणते ?हेंच सांगतो. म्हणूनच मला वाटते काय हरकत आहे  अंकीय गणनेत.
मग आपल्यातीलच कुणास वाटेल टाटांचं ठीक आहे ,भौक्तिक आहे,  अध्यात्मात हे लागू नाही.तर तसं नाहीये .
अंक व् अंकशास्त्र महत्वाचच. म्हणूनच आपण 27 ,54 ,108 या अंकांना महत्व देतो,जप 108 ची एक माळ होते.गोंदवलेकर महाराज व इतर संत 12 राशी व जन्मपत्रिकेतील 12 घरांच्या शुद्धिसाठी 12 कोटींचा जप संकल्प करण्यास सांगतात.यज्ञ याग,लघुरुद्र,महारुद्र,चंडियाग, सोमयाग,गणेशयाग,अधिष्ठाने उपासना,पुरश्चरण यांत आवर्तनां ना ,त्यांच्या संखेस महत्व असते.  म्हणूनच आमच्या इंदोरीमाउली ज्योती भोरास्कार घोरात कष्टात चा देशासाठी 51000 आवर्तनां चा संकल्प करतात व करवतात. म्हणून आपण म्हणतो रामदासांनी 14 वर्षे गायत्री पुरश्चरण केले. रंगवधूत यांनी विक्रमी 108 दिवसात नर्मदा प्रदक्षिणा केलि.
तर आपली साधना मग ती वारीची असो वा इतर काहीही सांगण्यात काहीही वावगे नाही.

मग  प्रश्न निर्माण होतो की समस्या काय आहे ? कशांत आहे ?
तर ती आपल्या,तूमच्या माझ्या मनात,वागण्यात आहे.
होतं  काय की अध्यात्मात सावधानता व भाव महत्वाचा. सावध असावे.बहुतेकजण अर्ध्या हळकुंडाने पिवले होतात.
आपण पाहतो वाचतो  FB व  सोशल नेटवर्किंग वर 'अनुभवा' च्या पोष्ट यात वाचतो की मला असा अनुभव आला तसा दृष्टान्त मिळाला,गाय दिसली,श्वान दिसला वगैरे व मग आपण त्यातच रमतो। अनुभव दृष्टान्त येणे चांगलेच ते शेयर करणेही वाइट नाही तर त्यात अडकुन राहणं हे अयोग्य ,नव्हे वाईटच विशेषतः साधकांना व मुमुक्षुना. मग ते संसारी असले तरी . कारण त्याने आपली प्रगति खुंटते आध्यात्मिक तर खुंटतेच भौक्तिकही, म्हणून याबाबी नुसत्या लाक्षणिक म्हणूनच घ्याव्यात.म्हणून वारिच्या वाऱ्यांची प्रस्तुति करावी पण सावधानतेने करावी हे महत्वाच.
दूसरे असे की भाव महत्वाचा कही जण आपला प्रभाव पड़ावा म्हणून वा इतर काही ulterior हेतुसाध्यतेसाठी फुशारक्या मारण्यासाठी ,प्रचारासाठी एवढेच काय स्वार्थ मतलबासाठी अंकित बढ़ाया मारतात की मि यांव केले वा मला त्यांव होते व् फसतात वा फसवतात पाया पडूँ घ्यायची स्वयं लागतेयातूनच ढोंगीपणा अहंकार  पैदा होतो ,आध्यात्मिक कमाइस leakeges निर्माण होतात . म्हणूनच ऐसे म्हणतात की अहंकार वाईट मैग तो व्यवहारातला असो वा अध्यात्मतला.अध्यात्मतला ego तर जास्त वाईट.आम्ही अंचिता यात्रांच् एक सोवनिर काढले होते 1997ला त्यात शेवटचे पान  लिहिताना मी म्हंटले होते की " Ego leads to down fall ,ego in spirituality has a bigger greater down fall .TO SAY THAT I DONT HAVE EGO USVALSO AN EGO ITSELF."
आमच्या नरेश भाऊना नेमक हेंच म्हणायचं असावे नाहीतर ही आपली आध्यात्मिक कमाईच आहे.आपला रुतबाच,रुबाबच.मी व आपल्यातील कित्येक साधक गण साधे पणाने यात्रा करतात पण यज्ञ, याग ,व धार्मिक विधी दान धर्म करताना विचार नाही करत. इतर 
वेळी काटकसर करणारा मी याबाबत नेहमी म्हणतो हे खर्च ही माझी चंगळ आहे .
एकन्दरीत  अध्यात्मात वारीच्या वाऱ्यांची गणना करावी पण अकड़ नसावी. पहाना ध्यान करताना पाठ व् कणा सरळ असावा पण ताठरपणा ,अकड़ नसावी . तसंच मग "वारी"च्या वाऱ्यांची 'गणा'त्मक /अंकात्मक प्रसूती व  प्रस्तुति 'अंकि'त करणे ही "गुणा" त्मक  सेवाच आहे फक्त तिं भावात्मक असावी, सावध असावी.इति
"शिवंजय" डॉ संजय©link
shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com
drsanjayhonkalse.tripod.com
     इदं न मम
.
https://www.facebook.com/drsanjayhonkalse

Comments

Popular posts from this blog

कृष्णसखा उद्धव

पितृशास्त्र भाग 10:"पितृपक्ष: निषिद्ध कार्य :चुकून नका करू हे  काम*

केल्याने देशाटन.......|