वशिष्ठ आश्रम/कामरूप आश्रम. चवथ्या मितीतील अव्यक्त सिध्दाश्रम:"शिवंजय"संजय.

माझी वशिष्ठाश्रमास भेंट।


वशिष्ठ आश्रम:आसाम अरुणाचल डायरी
वशिष्ठ आश्रम/कामरूप आश्रम.
चवथ्या मितीतील अव्यक्त सिध्दाश्रम:"शिवंजय"संजय.

भारत हा जगासाठि एक अध्यत्मिक दिपस्तंभ आहे.अध्यात्म हि भारताची  जगाला देण आहे.भारतीय अध्यात्म शास्त्राच औत्सुक्य व अभ्यास सारं जग करतय, भारताचा अध्यात्मातील  अधिकार व वर्चस्व आज अमेरीका,युरोप,रशिया,जपान इ.सर्व देश मान्य तर करतातच पण आत्मियतेने स्विकारत पण आहेत .म्हणूनच आज अमेरीकेतील व्हाईट हाउसमध्ये शासकिय व शाहि इतमामात त्यांच्या स्वतंत्रता दिनी ४ जुलैस रूद्र पठण होते तर जपानमध्ये सरकारतर्फे  सहस्त्र चंडी याग बाकायदा भारतिय पंडितांना आमंत्रीत करुन केला जातो.तसेंच अरेबियन प्रांतात रामधून गायली जाते व गीता पठण होतं.
 भगवान अगस्त्य व परशुराम प्रेरीत अग्निहोत्र व सोमयाग तर सर्व जगभर अक्कलकोट शिवपूरीच्या तीन शिलेदारांनी (वसंत परांजपे,माधव पोतदार व सुधाकर मुळे /जे आजही कार्यरत ८०+ आहेत./) प्रसारीत व सुयोग्य रीत्या अत्यंत कष्ट घेउन व प्रचंड तळमळीने स्थापित केले आहे व मी त्याचा सायलेंट विटनेस, मुक निरीक्षक वा साक्षीदार अगदि लहान पणा पासून,१९७८ पासून, आहे.असो विषय गहन व महान आहे. व एका संपुर्ण लेखाचा विषय आहे.
 तर भारतीय अध्यात्मशास्त्र( लक्षात घ्या शास्त्र)अनुसार
आपल्याकड़े  चिरंजीव व मृत्युंजय सिद्धात्मे आहेत व आजही ते कार्यरत आहेत, त्याला तार्किक कारणे व् अनुभूतींची जोड़ आहे .
पहा "सिद्ध व् सिद्धाश्रम "चवथ्या मितितिल मृत्युंजय सिद्ध व् त्यांचे अव्यक्त ,अदृश्य आश्रम :  शिवंजय:डॉ संजय होंनकळसे waiting for right publisher)अत्यन्त
क्लिष्ट व कष्टप्रद योगिक ध्यान धारणा करुन हे शीवस्वरूपत्व,शिवसायुज्जता, मृत्युंजय वयातीतता साध्य करून सीद्धत्व प्राप्त करतात. जीवन सिद्ध करतात म्हणून ते सिद्ध ,मरणा वर विजय मिळवतात म्हणून मृत्युंजय,ज्या वयात ते सिद्धत्व प्राप्त करतात त्याच वयात ते अनेकानेक कल्प राहतात म्हणून वयातील.
ब्रह्मर्षी वशिष्ठ ,सर्वश्रेष्ठ शुद्ध अगस्त्य, जगप्रसिद्ध  सिद्ध महावतार बाबाजी हि काही उदाहरणे।।
शांती ब्रह्म वशिष्ठ यांनी सिद्धत्व प्राप्त केेल ते स्थान आसामच्या गोहाटी पासून 20 किमी मेघालय जवळ आहे  तिथेच  त्यांचा चवथ्या मितीतील आश्रम कामरूप आश्रम आहे.
उत्तरेस विशेषतः ईशान्येस वसिष्ठांच कार्य बाहुल्य आहे.
दक्षिणेस अगस्त्य व पातंजली ,उत्तरेस आदी शंकर व महावतार बाबाजी।
 वशिष्ठानि अनेक स्थांन आपल्या तपसाधनेनी पुनीत पवन केलेली आहेत.

हृषिकेश जवळ 27 की मि वर हृषिकेश बद्रीकेदार रस्त्यावर ब्यासी नावाचे गांव आहे तेथे एक गुफा आहे ती वशिष्ठ गुफा म्हणून प्रसिद्द आहे  . वशिष्ठांनी येथे तप केल आहे . गुफा गंगा किनारी आहे . अत्यन्त रमणीय छान प्रसन्नचित्त वातावरण आहे . दोन गुफा आहेत तिथे त्यातील एक आता घुसल खाना  म्हणून उपयोग होतो. जिथे आंत चांगला गारवा असतो ,ध्यान करण्यास व लागण्याास अगड़ी सुयोग्य वातावरण आहे  १९२५ सालीएका साधकाने ही गुफ़ा शोधुन काढली. त्यावर मि 1998 साली रविवार सामना मध्ये लेखही लिहिलाय.  सद्गुरु कृपे मी अनेक वेळा  इथेे गेलोय .

तसेच हिमालयांत शिमला इथेही त्यांचे स्थान आहे .
मनाली पासून जवळच ,रोहतांग पास रस्त्यावर दोन कुंड आहेत . ती  वशिष्ठ कुंड म्हणून ओळखली जातात. ती अत्यन्त चमत्करी अर्शी कुंड आहेत  व त्यातील पाणी हे अत्यंत औषधी आहे.दोन कुंड अगदी एक  चार ते सहा इंच अंतरावर आहेत .पण त्यातील एक
कुंड़ातील  पाणी अगदी हात भाजेल इतके गऱम तर दुसऱ्या कुंडातील  बर्फासारखं ठण्ड आहे

आपले सारेेच्या सारे 100 पुत्र  विश्वामित्रा मुळे मारले गेल्याचे समजाताच वशिष्ठ विषण्ण झाले  व् त्यांनी  तेथील नदित (आताची व्यासी / ब्यासी) आत्मसमर्पण करण्याचे ठरवले  पण नदिने त्यांना स्वीकारल नाही व् त्यांना मुक्त केले म्हणुन त्या न।दिला विपाशा म्हणजे स्वातंत्र्य हे नाव पडले ,व् मग नंन्तर ती ब्यासी म्हणून  प्रसिद्द झाली.
इथच वशिष्ठांचे मंदिर आहे.

  इथेच वशिष्ठां च मंदिर आहे . गरम पाण्याच कुंड त्यांनी लक्ष्मणा साठी वातावरण गरम करुन ऊब निर्माण करण्यासाठी निर्माण केले.
 पण गोहाटी येथील वशिष्ठ आश्रम हा सर्वात महत्वपूर्ण आहे.  कारण ते वशिष्ठांच प्रमुख कार्यालय आहे. सात कल्प आयुष्य असलेल्या वाशिष्ठांना सप्तऋषींच प्रतिनिधित्व आहे.  सृष्टीचक्र अबाधित व अव्याहत सुरु ठेवणे हे त्यांचे प्रमुख कार्य आहे. प्रलयकाळांत  सृष्टीची महत्वपूर्ण रहस्य जतन करून , प्रलया नंतर पुनरुत्थान व पुनरुज्जीवन करण्याची मुख्य भूमिका ते बजावतात ,त्यांचं विपुल लेखन याबाबत आहे.( पहा " सिद्ध व सिद्धाश्रम" "शिवंजय"डॉ संजय होनकळसे)हे सर्व करण्यासाठीच त्यांना 7 कल्प आयुष्य आहे व ते त्यांनी सिद्ध करून साध्य केले आहे.  ते सिद्धत्व त्यांना या ठिकाणी प्राप्त झाले .हे ठिकाण गुवाहाटी पासून 20 कि.मी.वर स्थित .ते ठिकाण व गाव वशिष्ठ या नावाने ओळखले जाते. येथे मिलीटरीच मोठा व व्यापक एरिया आहे ,त्यात ऑफिस ,वस्ती, हास्पिटल,व इतर कार्यालये स्थित आहेत.मेन रस्त्यावरून आत गेल्यागेल्याच वातावरणातील फरक जाणवावयास  लागते.


 आत शिरता शर्ट एक भव्य पिंपलवृक्ष तेथील ऊर्जा क्षेत्रात व उर्जेचता घनतेत भर टाकतो. तेथून वाशुष्ठ मंदिरात जावयास विस्तृत पायऱ्या आहेत .त्या चढून गेल्यावर वासीष्ठांचे मंदिर आहे . 


तेथे आत वशिष्ठ ज्या ठिकाणी तपस केले व अमरत्व ,सिद्धत्व प्राप्त केले ती पवित्र शिळा आहे. त्यावर साधना ,तपश्चर्या करून त्यांना सायुज्जता प्राप्त झाली. ते शिव स्वरूप झाले अर्थात मृत्युंजय झाले ,त्यांनी मृत्यूवर विजय प्राप्त केला तो  येथे .या वशिष्ठ भूमीत,त्यांनी वयावर विजय प्राप्त केला व म्हणून ते वयातील, ज्या वयात त्यांना सिद्धत्व प्राप्त झाले त्या वयातच ते स्थिर झाले.तसेंच इच्छातीत कारण इच्छा धनी झाले.ज्या ठिकाणी ऋषीमुनी यांना सिद्धत्व प्राप्त होते ती सिद्धभूमी तो त्यांचा सिद्धआश्रम व तो चवथ्या व पाचव्या मितीत असतो,त्यांच्या इच्छेनेच एखाद्यास तेथे जाता येते.
हा आश्रम अदृश्य असतो पण कार्यरत असतो.
ज्या पाषाणावर तपस करून त्यांनी शीव सायुज्जता प्राप्त केली तो पवित्र पाषाणआजही या ठिकाणी आहे ,त्याच्या बाजूला दोन झऱ्याचे कुंड आहेत  व तेथुूनच गंगा ,कांता व ललिता या नद्या उगम पावतात व त्या एकत्र होऊन वशीष्ठ नदीत रूपांतरित होतात.या देवाला मागेच त्यांचा प्रवाह आहे.तेथे वातावरण सुंदर व प्रसंण्मयी आहे . शांतपानेतेथे बसावे थोडे ध्यान ,साधना करावीशी वाटते.


वशिष्ठ गुफा मंदिराच्या बाजूस आणखी एक मंदिर आहे तेथे वाशिष्ठनचा उभा पुतळा आहे.
 आश्रम परिसर सुंदर ,मोहक, प्रसन्न,दैवी व भारलेला  आहे.
अशा या सिद्धभूमीस व्यक्तीश जाऊन माथा टेकण्याचे अनुपम भाग्य मला पामराला लाभले तेही डॉ महिन्यात तीन वेळा यातच कृतकृत्यता वाटते ,धन्यता वाटते.एप्रिल 16 स प्रथम मी या भारलेल्या आश्रमात आलो तेंव्हा आठवले कि 2012 साली येथुन मेघालय येथे जातानाच मला वशिष्ठाश्रमाचे वेध लागले होते. पण युथ हॉस्टेलवाले यांचे शेड्युल मध्ये ते बसत नव्हते म्हणून थीदा ऊरासाच झाला होता.
पण सत्य संजल्पाचा डेटा व त्राता भगवंत याची प्रचिती यावेळी आली . नंतर परत लगेचच हा योग पुन्हा आला तो 25 एप्रिल 18 स . तिसरा योग्य जून मधे अंबुबाची पर्व साजरा जारण्यास आलो तेंव्हा  जून 28 ला .मला  अनाहूतपणे ,न ठरवता असा त्रिवार योग्य आला हेंच परम भाग्य. अशा या शांतिब्रह्म  जगतऋषी वशिष्ठांच्या  सिद्धभूमिस कोटी कोटी प्रणाम कारण सृष्टी नियमन साठी ,पार्याने आपल्यासाठीच हे सर्व अव्याहत पणे चालले  आहे कालही, आजही आपण असतांना ,उद्याही आपण नसू तेंव्हा.
drsanjayhonkalse.blogspot com🙏🏼©🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼shivanjay dr sanjay 26 एप्रिल 2018
👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻https://youtu.be/5VlUbsSPKvk

"shivanjay"Dr.sanjay
"TRUTH MUST N DOES ULTIMATELY ALWAYS PREVAIL"


Comments

Popular posts from this blog

कृष्णसखा उद्धव

पितृशास्त्र भाग 10:"पितृपक्ष: निषिद्ध कार्य :चुकून नका करू हे  काम*

७)पितृशास्त्र:अंत्येष्टी व दशक्रिया