संजय:केदारनाथ आपदा २०१३ जून.

शिवंजय संजय:केदारनाथ आपदा २०१३ जून.
खाली दिलेला प्रसंग वाचल्यावर त्याखाली दिलेल्या दासबोधातील समर्थ वचनांचे पुन्हा पुन्हा वाचन cv करा व त्याते किती खोल गर्भितार्थ दडला आहे ते अनुभवा!

उत्तराखंडात आलेल्या जलप्रलयाच्याच रात्रीचा प्रसंग...पाण्याचे भव्य लोंढे केदारनाथ मंदिराकडे येताना पाहून सुमारे ५०० भाविकांनी केदारनाथाच्या चरणांचा, अर्थात मंदिराचा आश्रय घेतला...काही बाहेरच्या दिशेला पळाले...मंदिरात घनघोर काळोख पसरलेला, बाहेरच्या तांडवाचा रुद्रभीषण आवाजच तो काय सोबतीला...भाविकांचा धीर सुटला...अंत:करणापासून शिवाला आर्ततेने हाका मारावयास लोकांनी सुरुवात केली....रात्रभर ॐ नम: शिवाय चा मोठ्या आवाजात जप या भाविकांनी केला...पहाटे पाणी ओसरल्यावर बाहेर येऊन पाहातात तो काय चमत्कार! सगळा गाव पाण्यात धुवून निघालेला! केवळ मंदीरच वाचलेले! कसे काय बुवा? मागे जाऊन पहातात तो लक्षात आले! एक अतीभव्य शिळा त्या प्रचंड जलप्रवाहाला थोपवीत, त्यातील वेगाने वहाणा-या दगडांच्या ठिक-या करीत शिवालयापासून केवळ ५० फ़ुटावर थांबलेली होती!
हजारोंना यमसदनी धाडणा-या मंदाकिनीनेआर्त नामस्मरणात शिवमंदिरात थांबलेल्या एक अन् एक शिवभक्ताचा प्राण वाचविला होता!

आता समर्थांच्या खालील ओळी एक एक करून नीट वाचा! त्याचा अर्थ अधीक खोलवर उमगेल!

कोडें सांकडें  संकट  |  नाना  संसारखटपट |
आवस्ता लागतां चटपट | नामस्मरण करावें ||

संपत्ती अथवा विपत्ती | जैसी पडेल काळगती |
नामस्मरणाची  स्थिती | सांडूंच  नये  ||

नामें संकटें नासतीं | नामें विघ्नें निवारती |
नामस्मरणें  पाविजेती | उत्तम  पदें  ||

नामें पाषाण तरले | असंख्यात भक्त उद्धरले |
महा पापी  तेचि  जाले | परम पवित्र ||

नामाचा महिमा जाणे शंकर | जना उपदेसी विश्वेश्वर |
वाराणसी  मुक्तिक्षेत्र  |  रामनामेंकरूनी  ||

-समर्थ रामदास
www.dasbodh.com

Comments

Popular posts from this blog

कृष्णसखा उद्धव

पितृशास्त्र भाग 10:"पितृपक्ष: निषिद्ध कार्य :चुकून नका करू हे  काम*

केल्याने देशाटन.......|