एकमेवाद्वितीय उलटे हनुमान:सावेर ,
एकमेवाद्वितीय उलटे हनुमान:सावेर ,इंदोर
'शिवंजय डॉ संजय होनकळसे©
https://m.facebook.com/story.php?story_fbid=2427354663946863&id=100000170606055
drsanjayhonवkalse@gmail.com
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
अतुलितबलधामं हेमशैलाभदेहम्
दनुजवनकृशानुं ज्ञानिनामग्रगण्यम् |
सकलगुणनिधानं वानराणामधीशम्
रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि ||
भारताचा आध्यत्मिक प्रवास व इतिहास हा लाखो करोडो वर्षांचा आहे व अगदी सत्य युगांपासून कलीयुगापर्यंत त्यांचे पडघम ,प्रतिसाद,व कथा,अवशेष असलेली ठिकाणे आहेत.सत्य युगातील सोमनाथ पासून कलियुगातील जगन्नाथ पुरी हे याचे प्रचलित पुरावे आहेत व त्यांचे स्वतःचे असे दैवी वैशिष्ट्य आहेत.
अशी अनेकानेक ठिकाणे व मंदिरे आहेत.असेच एक अतुल्य व वैशिष्ट्यपूर्ण मंदिर उजैन इंदोर महामार्गावरील सावेर या ठिकाणी आहे .उलटे हनुमान मंदिर ,वा पाताल विजय हनुमान मंदिर म्हणून ते परिचित आहे.
यास राम पातालविजय हनुमान म्हणतात.या मंदिरात जाण्यास मी 'शिवंजय':डॉ संजय होनकळसे1995 पासून उत्सुक होतो ,अनेक वेळा या मार्गावरून महंकालदर्शनासाठी गेलो होतो,पण येथे जायला हायवे वरून आत जायला लागते शेवटी 12ते 15 वेळा महांकाळ झल्टवर 2001 साली योग आला तेंव्हा मंदिरात कुणी नव्हते .
आता 36 वेळा बारा ज्योतिर्लिंग सेवा ,सप्त कैलास ,सप्त पुऱ्या, सप्तपावन नद्यांसह सर्व प्रमुख नद्या स्नानपूजन,झाल्यावर नर्मदा परिक्रमेस तिसऱ्यांदा निघातांना 28 नोव्हे ला परत योग आला 10 साधक शिलेदार सोबत घेऊन हा शिवंजय: संजय नावाचा देह येथे परत गेला .
मंदिरात नवीन व्यास पुजारी होते त्याच्याशी सत्संग केला ,झेंडा अर्पण केला ,विश्राम केला व मगच तेथून निघालो.
हनुमानाने पाताळात जाऊन अहिरावण वधकरून पाताळावर विजय मिळवण्याच्या हनुमानाच्या मोहिमेचे एका अर्थी प्रतिकात्मक स्थान आहे.या मोहिमेतच हनुमानजींस मकरध्वज आपलाच मुलगा असल्याची माहिती झाली व तो आपल्या बरोबर त्यास घेऊन पाताळातून पृथ्वीवर आला होता.
राम जेंव्हा सीतेला सोडवण्यास लंकेकडे रवाना झाले हे जेंव्हा रावणास कळले तेंव्हा रावण आपले मरण जवळ आले या भीतीने अस्वस्थ झाला व त्याने राम लक्ष्मण यांचे अपहरण केले.हे अपहरण रावणबंधू अहिरावण याने बिभीषणाचे रूप घेऊन हरण केले .राम लक्ष्मणास बिभीषणा बरोबर पाहिल्याचे अनेकांनी सांगितल्यावर लक्षांत आले की अहिरावणा ने अपहरण केल्याचे लक्षांत आल्यावर ते पाताळा तच असतील हे लक्षांत आले .
मग काय पाताळावर विजय मिळवून त्यांना सोडवून
आणण्याची जबाबदारी हनुमंतावर आली.व ते पाताळावर कूच करण्यास सज्ज झाले .पाताळात शिरतानाची प्रतिमा सावेर ला आहे ती dive करतानाची आहे.foto पहा
हनुमंत पाताळात गेले तिथे अहिरावणाच्या राज्यात राम लक्ष्मणास सोडवण्यासाठी मकरधवजाशी सामना करावा लागला त्याच बळ पाहून हनुमंताने त्यास विचारले की तो कुणाचा पुत्र आहे? तेंव्हा तो म्हणाला की मी तो हनुमंत पुत्र आहे एका मोहिमेवर जाताना हनुमंताचे पुत्रबीज एका मगरीने गिळले व त्यापासून त्याचा जन्म झाला .मकरीपासून जन्म झाला म्हणून मकरध्वज.या मकरध्वजाचे मंदिर नैमिषारण्यात आहे.
असो मग हनुमंताने अहिरावनास मारून राम व लक्ष्मणास सोडवून आणले .ते प्रयागराज येथे त्रिवेणी संगमातून बाहेर आले व थकून आराम करतें झाले .म्हणून तिथे संगमावर लेट हनुमान मूर्ती आहे .अशी पहुडलेली मूर्ती औरंगाबाद येथील वेरुळजवळ भद्रा मारुती म्हणून जागृत व प्रसिद्ध आहे.,असाच एक पहुडलेला मारुती औमकारेश्वर येथे आहे व एक South ला आहे.
असो तर सावेर हे पाताळावर हनुमंताच्या विजयाचे प्रतीक आहे.
हि जगातील एकमेव अद्भुत स्वयंभू दिव्य दर्शन मूर्ती आहे
शिवंजय': डॉ संजय होनकळसे©
shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com
drsanjayhonkalse.tripod.com
Comments
Post a Comment