पितृ शास्त्र: भाग ९ श्राद्ध / पितृपक्षाविषयी शंका समाधान:©

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2320904951258502&id=100000170606055

🍁👍🍁

💁🏻‍♀  ९)पितृ शास्त्र: भाग       
श्राद्ध / पितृपक्षाविषयी शंका समाधान:©
'शिवंजय':डॉ संजय होनकळसे

आपल्यात कित्येक उत्सुक व साधक असर असतात की त्यांना श्राद्ध व व इतर पुण्य कर्म करावी वाटतात ,पण माहिती नांदते ,व अपूर्ण माहिती असते .त्या संदर्भात काही शंका समाधान
पितृ पक्षात यात्रा ,इतर पूजा व व चांगली कामे जारण्यास काही हि अडचण नसते.

१. घरात / कुळात चालू वर्षात मृत झाली असल्यास महालय श्राद्ध करता येते का ?

नाही. मृत व्यक्तीस एक वर्ष पूर्ण झाल्याशिवाय महालय श्राद्ध करता येत नाही.

२. घरात / कुळात सवाष्ण मृत झाली असल्यास कोणत्या दिवशी श्राद्ध करावे ?

सवाष्ण व्यक्ती मृत होऊन एकवर्ष पूर्ण झाल्यानंतर पितृपक्षात “अविधवा नवमी” (भाद्रपद कृष्ण नवमी) या दिवशी श्राद्ध करता येते.

३. ज्या पूर्वजांची तिथी पौर्णिमा असेल त्यांचे श्राद्ध कोणत्या दिवशी घालतात ?

पंचमी, अष्टमी, द्वादशी किंवा सर्वपित्री अमावस्येला घालतात.

४. ज्यांचा मृत्यू हा घातपाताने झाला असेल किंवा आत्महत्या केली असेल त्यांचे श्राद्ध कोणत्या तिथीस घालावे. ?

शस्त्रदहित श्राद्ध म्हणजे भाद्रपद कृष्ण चतुर्दशी या तिथीस घालावे.

५. संन्याशी किंवा घर सोडून गेलेल्या व्यक्तींचे श्राद्ध कोणत्या तिथीस घालावे ?पितृशास्त्र :6)देव ऋषी तर्पण विधी
अशा व्यक्तींचे श्राद्ध भाद्रपद कृष्ण द्वादशीला घालतात.

६. पितरांची तिथी माहित नसल्यास कोणत्या दिवशी श्राद्ध करावे ?

भाद्रपद कृष्ण द्वादशी किंवा अमावस्या ( सर्वपित्री अमावस्या ) या दिवशी सर्व पितरांचे (ज्ञात-अज्ञात)श्राद्ध घालता येते. तसेच ब्राम्हणास हिरण्यदान व अमावस्या मागणाऱ्या स्त्रीला शिधा दान द्यावे.

७. श्राद्ध घालतांना नैवेद्य मंडल कसे घालावे ?

पाण्याचे गोल मंडल करून त्यावर नैवेद्याचे ताट मांडावे व अंगठ्याच्या बाजूने उलट्या दिशेने पाणी फिरवावे.

८. अघोर पितरांच्या सद्गतीसाठी कोणती सेवा करावी ?

पितृस्तुती, बाह्यशांती सुक्त, पितरतुष्टीकारक स्तोत्र वाचावे तसेच दुपारी १२ वाजता एका पोळीवर थोडा भात,तूप,५-७ काळे तीळ घेऊन खालील मंत्र दक्षिणाभिमुख बसून १ माळ जप करून अंती त्या माळेचा स्पर्श त्या भातास करणे. यामुळे अघोर पितरांना देखील सद्गती लाभते.

मंत्र :  मध्व: सोमास्याधीना मदाय प्रत्नो होता विवासते वाम |
      बहिर्ष्मती रातीर्वीश्रिता गिरीषा यांत नासत्योप वाजै: ||

९. मातामह श्राद्ध म्हणजे काय? त्यचा अधिकार कोणाला असतो?:

नवरात्रच्या पहिल्या दिवशी मातामह श्राद्ध म्हणजे आईच्या वडिलांचे श्राद्ध (दौहित्र) असते. ज्यांचे वडील जिवंत आहेत व आजोबा (आईचे वडील) जिवंत नाहीत अशा मुलांनाच दौहीत्राचा अधिकार असतो.
ज्या स्त्रियांच्या माहेरी भाऊ किंवा कोणी पुरुष नाही त्यांच्यासाठी) आजोबा गेल्यावर एक वर्षाने दौहित्र करण्यास सुरवात करावी. स्वत:चे वडील गेल्यास दौहित्र करू नये. दौहीत्राचा अधिकार नातवास तिसऱ्या वर्षापासून येतो. हे दौहित्र श्राद्ध पूर्ण स्वयंपाक करून करणे अधिक इष्ट होय. नवरात्रीचा पहिला दिवस असला तरी देवीचा वेगळा स्वयंपाक करण्याची गरज नाही.

१०. पितृपक्षात पारायण करता येते का ?

हो. पितृपक्षात कोणत्याही ग्रंथाचे पारायण करता येते.(गुरुचरित्र/नवनाथ/भागवत/श्रीपाद चरित्र इत्यादी) पितृपक्षात केलेले पारायण हे पितरांना संतोषकारक असते.

११. दैनंदिन जीवनात पितरांची सेवा कशी करता येते ?

सकाळी उठल्यानंतर देवपूजेच्या आधी नित्यसेवा ग्रंथातील पितर तुष्टीकारक स्तोत्र व बाह्यशांती सुक्त वाचावे. रोज पंचमहायज्ञ करावा (नित्यासेवा ग्रंथात विस्तृत माहिती वाचावी) या पंचमहायज्ञासाठी फक्त ५ मिनिटे लागतात.
दर अमावस्येला हिरण्यदान करावे. (१ जाणवे, पेढे, ५ / १०१ रु. दक्षिणा इत्यादी ब्राम्हणाला दान करावेत) . दर अमावस्येला १किलो कोळसा व ३ नारळ घेऊन त्यावर १ माळ महामृत्युंजय जप करावा व जवळपासच्या जलाशयात सोडून द्यावे.
प्रखर पितृदोष असल्यास  श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे नारायण नागबली किंवा त्रिपिंडी हा विधी करावा. तसेच मातृगया (सिद्धापूर,गुजराथ) येथे जाऊन पिंडदान करावे.
दरमहा किंवा वर्षातून १ पारायण “सुलभ भागवत ग्रंथाचे करावे” यामुळे पितरांना मुक्ती मिळते. भागवत पारायण करतांना “ॐ नमो भगवते वासुदेवाय” या मंत्राचे संपुट किंवा पल्लव लावल्यास जन्म-जन्मांतरीचे दोष नाहीसे होतात.पितृपक्षाबद्दल अधिक माहिती:

सामान्यांना एकाच प्रकारचे श्राद्ध माहिती आहे, पण श्राद्धाचे अनेक प्रकार आहेत...

१. नित्यश्राद्ध : यासाठी दररोज केवळ जलाचा वापर करतात.

२. नैमित्तिक श्राद्ध : सपिंडाच्या अगोदर करतात.

३. काम्यश्राद्ध : आपली जी कामना-इच्छा असेल ती तडीस जाण्यासाठी हे श्राद्ध करतात.

४. नांदी श्राद्ध : षोडष संस्कारादरम्यान करावयाचे एकप्रकारचे वृद्धीश्राद्ध. यालाच कर्मांग श्राद्धदेखील म्हणतात.

५. वृद्धीश्राद्ध : विवाहाच्या मंगलकार्यप्रसंगी करायचे श्राद्ध.

६. यात्रा श्राद्ध : यात्रेस प्रस्थान करण्यापूर्वी घृताचा वापर करून करावयाचे श्राद्ध.

७. सपिंडन श्राद्ध : एखादी व्यक्ती मृत झाल्यापासून १२ व्या दिवशी करावयाचे श्राद्ध. यामुळे व्यक्ती आपल्या पितरांमध्ये संयुक्त होते. हे श्राद्ध झाल्याशिवाय इतर कुठलेच मंगलकार्य, शुभकार्य करता येत नाही.

८. शुद्धीश्राद्ध : प्रायश्चित्त इत्यादीसाठी, मन, शरीरशुद्धीसाठी हे करतात.

९. अष्टकाश्राद्ध : भाद्रपद कृष्ण अष्टमीला हे श्राद्ध करतात.

१०. पुष्टीश्राद्ध : द्रव्य, संपत्ती, ऐश्वर्य, आरोग्य इत्यादींच्या प्राप्तीसाठी पुष्टीश्राद्ध करतात.

११. पार्वण श्राद्ध : दरवर्षी करावयाच्या श्राद्धाला पार्वण श्राद्ध म्हणतात. अमावस्या, चतुर्दशी, अष्टमी व संक्रांती पर्वावर करावयाच्या श्राद्धासही पार्वण श्राद्ध म्हणतात.

१२. गोष्टी श्राद्ध : विद्वान व ब्राह्म समुदाय एकत्र येऊन तीर्थाच्या ठिकाणी पितरतृप्त करून संपत्ती व सुख प्राप्तीसाठी करावयाच्या श्राद्धास गोष्टीश्राद्ध म्हणतात. श्राद्धाविषयी चर्चा करताना अचानक स्वयंस्फूर्तीने जे श्राद्ध केले जाते त्यालाही गोष्टी श्राद्ध म्हणतात.

याव्यतिरिक्त दधी श्राद्ध, हिरण्य श्राद्ध, हस्तश्राद्ध, चट श्राद्ध, आत्म श्राद्ध असे विविध श्राद्ध प्रकार आहेत. श्राद्धाच्या काही सोप्या पद्धती पण आहेत. श्राद्धाच्या सोप्या रिती :

१. पाण्याने भरलेला कुंभ-कलश दान करा.

२. अन्नदान करा

३. तीळाचे दान करा

४. गाईस गवत घाला

५. श्राद्ध तिथीस उपोषण-उपवास करा

६. श्राद्ध विधीचे वाचन करा

७. दक्षिणाभिमुख बसून पितरांचे मन:पूर्वक श्रद्धेने स्मरण करा. त्यांच्या आठवणीने डोळे आपोआप ओले होतात. ते होऊ द्या.

८. निर्मनुष्य जंगलात आकाशाकडे दोन्ही हात उंच फैलावून अंत:करणापासून मी निर्धन व अन्नविरहित आहे, मला पितृऋणातून मुक्त करा, अशी प्रार्थना करा.

जो श्राद्ध करणार असतो त्याला आपल्या मृत पित्याची मृत्यूची तिथी नीट माहिती असावी. त्याच तिथीला महालय पक्षात (म्हणजेच भाद्रपद कृष्ण पक्ष अमावस्येपर्यंत) श्राद्ध करावे.

हे श्राद्ध नेमके कधी करावे?

उत्तर: श्राद्ध अपरान्हकाळात करावे. आता प्रश्न पडेल तो हा अपरान्ह काळ काढण्यासाठी बाहेर कुठेही जाण्याची गरज नाही. तो आपल्यालाही काढता येतो. अपरान्ह काळ काढण्यासाठी आपल्या गावच्या सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळा माहिती असायला हव्यात. प्रत्येक गावाची ती वेळ वेगळी असल्याने अपरान्ह काळदेखील वेगळा असतो. अपरान्ह काळ काढण्यासाठी दिवसाचे पाच समान भाग करावे लागतील. त्या पाच समान भागांना वेगवेगळी नावे आहेत. ती अशी.

१. स्थानिक सूर्योदय वेळ

२. प्रात:काळ समाप्त

३. संगव काळ समाप्त

४. माध्यान्ह काळ समाप्त

५. अपरान्ह काळ समाप्त

६. स्थानिक सूर्यास्त वेळ.

ज्याने त्याने आपापली स्थानिक सूर्योदय व सूर्यास्ताची वेळ गृहीत धरावी. सूर्यास्ताच्या वेळेतून सूर्योदयाची वेळ वजा केली की दिनमान म्हणजेच दिवसाचे एकूण तास येतात. याच दिनमानाचे पाच समान भाग करावेत. त्यानंतर प्रत्येक समान भाग सूर्योदयाच्या वेळेत मिळवित जावा. म्हणजे आपणास क्रमश: प्रात:काळ, संगवकाळ, माध्यान्ह काळ, अपरान्ह काळ व सूर्यास्त या समाप्ती वेळा मिळतील. त्यातील अपरान्हकाळ महत्त्वाचा. उदाहरणार्थ आपल्या गावचा सूर्योदय सकाळी वाजता व सूर्यास्त सायंकाळी ६:३० वाजता असेल तर दिवसाचे तास झाले साडेबारा.

त्याचे पाच समान भाग केले तर अडीच तासांचा एक भाग होतो. सूर्योदयाच्या वेळेत पहिले अडीच तास मिळविले की मिळेल प्रात:समय. समाप्तीचा काळ म्हणजे सकाळचे साडेआठ. त्यात पुढे अडीच तास मिळविले की वाजतात ११. हा झाला संगव काळ. त्यात पुढचे अडीच मिळवायचे. वाजला दीड. हा झाला माध्यान्ह काळ. त्यात पुढचे अडीच मिळविले की वाजतात चार म्हणजेच दुपारी दीड ते चार हा झाला त्या गावचा अपरान्ह काळ. ज्यावेळी कावघास टाकणे प्रशस्त मानले जाते.

   कावघास टाकण्यासाठी माध्यान्ह काळ समाप्ती वेळेपासून अपरान्ह काळ समाप्तीपर्यंतचा काळ प्रशस्त असतो.

श्राद्ध म्हटले की लोकांना अनेक प्रश्न पडतात. एखाद्याचा मृत्यू अधिकमासात झाला असेल तर? श्राद्ध तिथीला ग्रहण असेल तर? श्राद्धाचे भोजन करावे की नाही? जिथे प्रश्न आहे तिथे उत्तर आहे...

एखाद्याचा मृत्यू अधिकमासात झालेला असतो. पण तरी त्याचे वर्षश्राद्ध मात्र अधिकमास ज्या महिन्यात असेल
त्या नेहमीच्या महिन्यातच करावे.

ग्रहण काळात श्राद्ध येत असेल तर ग्रहण वेधाच्या काळात हिरण्य श्राद्ध करावे.
माता-पिता जिवंत असताना इतर ठिकाणी श्राद्धाचे भोजन करावयास जायला कोणतीही हरकत नसते.
श्राद्धवेळी साधू-संन्यासी, योगी पुरुषांना भोजन दिल्यास पितर अधिक संतुष्ट होतात.
अनेकांना श्राद्धाच्या वेळी गोत्र माहीत नसते. मग त्यांनी श्राद्ध करताना ‘कश्यप’ गोत्र उच्चारावे.
अनेकांना पितरांची नावे माहिती नसतात किंवा वयोमानाने आठवत नसतात. मग अशावेळी पुरुष पितरांसाठी देवांची
नावे घ्यावीत व स्त्री पितरांसाठी नद्यांची नावे घ्यावीत.
गरूड पुराणातातील बाराव्या अध्यायात ७० व ७१ क्रमांकाचा एक श्लोक आहे. तो असा...

" तस्मात पुत्रेण कर्तव्य षोडशत्रयम भर्तुर्वा कुरूते पत्नी तस्या: श्रेयो ह्यनन्तकम
सम्परैतस्य या पत्यु: कुरूते चौर्ध्वदैहिकम क्षयाहं पाक्षिकं श्राद्धं सा सतीत्युचते मया "

याचा अर्थ असा आहे, जिला संतान नाही तिने पती हयात नसताना स्वत: श्राद्ध केले तरी चालते. वडील हयात
असताना पुत्राची आजोबा-पणजोबा यांच्यासाठी तीर्थश्राद्ध करायची इच्छा असेल तर त्याने त्यासाठी पित्याची परवानगी
घ्यावी. पित्याच्या परवानगीशिवाय त्याने ते श्राद्ध करू नये.
इदं न मम्।
शिवअर्पणम।।
शिवंजय डॉ संजय होनकळसे©

Comments

  1. Woah! This site's template/theme appeals to me much.
    It's straightforward, yet it's effective. Getting the "perfect balance" might be difficult at times.
    between excellent usability and aesthetics, I think you did a fantastic job on this.
    Furthermore, the blog is quite rapid to load.
    I'm using Firefox. Fantastic website!
    sonic visualiser crack
    thunderbird portable crack
    hitman pro crack
    eset smart security crack

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कृष्णसखा उद्धव

पितृशास्त्र भाग 10:"पितृपक्ष: निषिद्ध कार्य :चुकून नका करू हे  काम*

केल्याने देशाटन.......|