तुळजाऊंची घोर निद्रा:

तुळजाऊंची घोर निद्रा:
::शिवंजय डॉ संजय होनकळसे

दंड नेसवन एकमर्कद्वितीय सोहळा।
पहा याची देही याची डोळा।।
सुखे निद्रा घेई ।
आता माझी तुळजाई:'
शिवंजय डॉ संजय होनकळसे

महाराष्ट्राची कुलस्वामिनी शिवाजीच्या स्वराज्य साधनेची सांख्यिदारच नव्हे तर तिच्या आशिर्वादे ते त्यांनी प्राप्त करून आदर्शवत राज्य शासन केले. ती राज्याची शक्ती देवता ठरली.
आई तुळजाभवानी आदिशक्ती ही वर्षातून २१ दिवस निद्रा घेतात ,उरलेले ३४४  दिवस देवी अष्टौप्रहर जाग्रृत असते.
*निद्रा समयी देवीला १०८ साड्यांचे वेष्टन (दंड नेसवने)करवून विधिवत् पलंगावर निद्रेसाठी ठेवले जाते.असा सोहळा असणारे तुळजाभवानी शक्तीपिठ एकमावाद्वितीय आहे*

*मंचकी निद्रा:-
*देवीची मंचकी निद्रा २१ दिवसात विभागलेली आहे*

*सर्व प्रथम मंचक म्हणजे काय ?*

*मंचक याचा अर्थ पलंग असा आहे.*
*देवी भवानीची निद्रा तीन प्रकारात विभागली आहे ती अशी👇🏼*

*१)घोर निद्रा :-नवरात्रीच्या आधी देवी योगनिद्रेत होती म्हणजे महिषासुराशी युध्द करण्यापूर्वी देवी ही निद्रा घेत होती पण महिषासुराचे देवतांवरचे वाढते अत्याचार पाहून ब्रह्म-विष्णू आणि महेश देवीला आठ दिवसानंतर योग निद्रेतून उठवून देवदेवतांचे रक्षण करण्याची विनवणी करतात.या निद्रेतून जागी होऊन देवीने घोर रूप प्रकट केले या मुळे या निद्रेस घोर निद्रा म्हणतात.*

*२)श्रम निद्रा : घोर निद्रेतुन जागी होऊन देवीने महिषासुराचे चाललेले अधर्म कारस्थान पाहून युद्धास तयार झाली नऊ दिवस आसुरांसोबत युध्द केले. नवव्या दिवशी आसूर शरण आला देवीच्या चरणी स्थान मागून देवतांची माफी मागितली.*
*यावेळी नऊदिवस युध्दामुळे देवीला थकवा आल्याने शारदिय नवरात्रा नंतर पाच दिवसाची निद्रा घेते यालाच श्रमनिद्रा असे म्हणतात. या निद्रे साठी तुळजाभवानी चे माहेर अहमदनगराहुन पलंग येतो त्यावर आईसाहेब निद्रा घेतात या निद्रेस मंचकी निद्रा म्हणतात.*

*३)मोह निद्रा:-शाकंभरी नवरात्रीच्या दरम्यान पौष शुद्ध प्रथमा ते अष्टमी काळात देवी निद्रिस्त असते.*
*देवीची मोह निद्रा हे स्रृजनाचे प्रतिक असुन ८ दिवस हे निद्रा काळाचे संपल्या नंतर नवमी म्हणजे तुळजाभवानी प्रकट दिवस किंवा जन्म दिवस असतो*
*त्या मुळे या निद्रेस मोह निद्रा म्हणतात हे नऊ दिवस म्हणजे नऊ महिन्यांचे सुचक आहेत जसे नऊ महिन्यांनी स्रृजन होते तसाच हा कालावधी असतो.*
*देवी शारदिय अश्विन नवरात्रा आधी आठ दिवस चांदीच्या मंचकावर निद्रा घेते.*
*शारदिय अश्विन नवरात्रानंतर पाच दिवस माहेरच्या चंदनाच्या पलंगावर विश्रांती निद्रा घेते*
*आणी शाकंभरी पौष नवरात्री दरम्यान देवी आठ दिवस चांदीच्या मंचका वर निद्रा घेते*

*अशा अवघ्या विश्वाचा भार सोसुन विसावा घेण्यासाठी आई गादीवर असते म्हणुन तमाम देवी भक्त तथा देवीचे आराधी देवी मातेश्वरीच्या या निद्राकालात गादी ,उशी, तक्क्या यांचा त्याग करतात.उपवास धरतात.*

*अशा माझ्या माय भवानीचा महीमा अगाध अन् अनंत आहे.*

पितृपक्षातील  काल आष्टमीस रात्रौ आभिषेक पुजे नंतर आई तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा आरंभ होनार आसल्या कारणाने देविचे शेजगृह स्वच्छ करण्यात येते
तसेच देवि ज्या गादीवर निद्रा करणार आहे ती गादी भरण्याचे व पहिल्या गादीतला कापूस साफ करण्यासाठी गावातील पुजारी महिला ,आराधी महिला,व सर्व भक्त मंडळी हा कापूस निवडून साफ करतात साफ करते वेळी या कापसा मध्ये रानातील काटे,कुटे ,दसकट,काच माती वगैरे आढळून येते तो एक दैवी चमत्कारच आहे.*
असो तर ह्या आशा चार गाद्या भरून त्या पलंगावर टाकल्या जातात व नंतर आज रात्रौ देवीला या वर निद्रीस्त करण्यात येते.
आणि हा गादीचा कापूस पिंजण्याचा मान मुस्लिम समाजातील बाशूमिया शेख पिंजारी या घराण्याकडे तर गादी भरण्याचा मान ब्राम्हण समाजातील आच्युत कुलकर्णी यांना आहे.* *आणि देवि जेंव्हा निद्रा आवस्थेत असते तेंव्हा देविला सुवासिक अत्तर व सुवासिक तेलाचे आभिषेक केले जातात.*
*तरी  सर्व भाविक भक्तांनी देविचे निद्रा रुपातील दर्शनाचा आवश्य लाभ घ्यावा.*

*श्री तुळजाभवानी माता की जय*🕉👏🏻🔱

*सदानंदीचा उधे उधे ........*🕉👏🏻🔱
इदं न मम्।
तुळजाईसमर्पणमस्तु।।
शिवंजय डॉ संजय होनकळसे।
drsanjayhonkalse.tripod.com
shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

कृष्णसखा उद्धव

पितृशास्त्र भाग 10:"पितृपक्ष: निषिद्ध कार्य :चुकून नका करू हे  काम*

केल्याने देशाटन.......|