पितृशास्त्र: भाग 10 सर्वांच्या नावे पिंड दान/तर्पण करावे ।

पितृशास्त्र: भाग १०

सर्वांच्या नावे पिंड दान/तर्पण करावे ।
शिवंजय डॉ संजय  होनकळसे.

पितृशास्त्र: भाग १०


सर्वांच्या नावे पिंड दान/तर्पण करावे ।

शिवंजय डॉ संजय  होनकळसे.

©®

https://shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com/2018/10/8.html


पिंड हे आपल्या पितरांचे प्रतींनिधीत्व करतात आपल्या वडील ,आई,काका मामा भाऊ आत्या ,काकू ,सासू सासरे ,सावत्र ,इतकेंच काय अनौरस व अज्ञात इतकेंच काय मृत शत्रूस पण तर्पण देतात हे सुद्न्य साधकांनी कृपया लक्षांतच  नाही तर चांगले ध्यानांत ठेवावे व आचरणात आणावे.

कां?

 तर ते आता पाहुयात.

जीव साधारण पणे तीन पिढ्या पर्यंत पितृ योनीत राहतो,अंत्य संस्कार ,व दशक्रिया नाही झाल्या तर तो प्रेत योनीतच राहतो अथवा शापित वा कुणाची हाय लागल्यास व अकाल मृत्यू आल्यास तो प्रेत योनीतच रहातो. तर अशा प्रेत योनीत असलेल्यांचा उद्धार व या सुटका होणे जरुरीचे आहे हे लक्षांत घेणे इष्ट ठरेल.या ना त्या कारणाने त्यांचे विधी पूर्वक गमन झाले नसेल ,ते अनौरस ,व अकाली व शापित यातनांमुळे अधांतरीत असतील. तर कुणीतरी त्यांची भुक्ती, मुक्ती व तृप्ती करायला पाहिजे म्हणून अगदी शत्रूंच्या नावाने पण तर्पण करावे.श्राद्ध तर्पण विधी पहिला तर अगदी जलचर,अपघात होऊन वारलेले, बुडून गेलेले ज्ञात व अज्ञात ,गुरु शिष्य,मित्र,शत्रू सर्वांच्या नावे पिंड वा तर्पण केले जाते ,आम्ही स्वतः गेली 25 वर्षे कित्येकांच्या नावाने ,अगदी देशहितार्थ हौतात्म्य पत्करले, बॉम्ब स्फोट ,1993 ,26/11,26 जुलैच्या हाहाःकार ,लोकल मधील स्फोट याने मृत्यू पावलेल्यांच्या नावाने तर्पण करतो.माझ्या माहितीतील एक जण तर दर वर्षी रायगडावर जाऊन सर्व मृत मावळे व सैनिकांच्या नावे श्राद्ध घालतात.

असो, कुणीतरी त्यांच्यासाठी प्रयत्न करणे जरुरीचे आहे ते पुण्यप्रदच आहे .त्यांचे आशीर्वाद मिळणे हेही नसे थोडके .

          या वरून हेही लक्षांत घेणे श्रेयस्कर ठरेल कि काहीजण एखाद्या आवडत्या व्यक्तीच्या नावेच फक्त श्राद्ध करतात. म्हणजे फक्त आईचे,वा वडिलां चे.तेही चुकीचे आहे.म्हणून सर्व पितरांचे श्राद्ध करण योग्य,मर णांताणी वैराणी मेल्यानंतर  सारे शत्रुत्व संपते कारण शत्रुत्व हे देहाशी असते /होते ,देह गेल्यावर शत्रुत्व पण मिटते.

मरणांतानी वैराणी,आपली संस्कृति ,आपली परंपरा हेंच शिकवते.


भारतीय अध्यात्म शास्त्र व त्याच्याशी सुसंगत असे धर्मशास्त्र जीवन जगण्याचं शास्त्र आहे व ते जीवन जगण्याची कला शिक वते.

याउपर ते जीवनापश्चात वर्तुणूक व व्यवहाराचा पण विचार करते. या विचार व अभ्यासाचे अनेक पैलू आहेत त्यापैकी एकविचार म्हणजे 

"मरणांताणी वैराणी" 

असं म्हणतात की  मरणोपरांत वैर संपत।

एकदा आमचे एक जिवलग यांनी शेवटचा "राम"म्हंटल्यावर त्याच्या महाविद्यालयीन सुहृदास कळव ल्यावर सकारात्मक सुर दाख वावा म्हणून मी " मराणांतानी वैराणी" , अर्थात मृत्युनंतर त्या व्यक्तिशी व संबंधितांशी वैर संपते व वा संपवावे हे वाक्य सर्वांना कळवताना लिहिले.

असं लिहीण्याची आवश्यकता वाटली कारण नुकतेच त्यांचे तात्विक व सात्विक वाद झाल्या ने थोडासा प्रेमापोटी दुरावा निर्माण झाला होता.दोघेही मला तर  जिवलगच पण एकमेकांचे जास्त सुहृद त्यांच्या महाविद्याल यीन काळापासून होते पण over a time period एकमेकांच्या प्रगति पासून अनभीज्ञ राहिले, ज्याचा मी स्वतः साक्षीदार आहे.त्यामुळे थोड़े थोड़े 'I' mania चे गुलाम होण्याच्या कल होत असलेले म्हणून हा प्रपंच केला.पण...........बरोबर  14मिनिटांनी त्यांचा msg आला ते ठीक आहे पण "कुठच्याही नात्यांमध्ये दोन्ही बाजूंनी समजु तीने घ्यावं लागतं"त्यांचा विचार वाक्य सहज,योग्य व तार्किक  वाटते व त्यामागिल त्यांचा परिणामकारक confidence व जे बोलले तर त्यांचा forceful ness व expressions (त्यांचे हातवारे व मुखवारे) मी नेहमी पाहीले आहेत व त्यांच्या अशा म्हणन्याने त्यांच्या जवळपासच्या मित्रांवर  होणारा अनुकरणीय,व अनुकर्णीय, परिणाम मी पहात आलोय.

पण जर चुकीचा विचार जरी तो तार्किक असला तर त्याचा परि णाम पण चुकीचा व कदाचि त घातक ठरू शकतो कारण ते मित्र सुशिल,सुशिक्षित सुविद्य तर आहेतच पण सामाजिक प्रतिष्ठा व भावी पिढिवर परिणाम कारक प्रभाव पाड़णा-या व्यवसायाशी ते निगड़ित आहेत.त्यांना कसं समजवावे हा यक्षप्रश्न मला नेहमी पडतो व मी काही करू शकत नाही एवढे ते आता मोठे झालेत.


पण मी पण हाडाचाच शिक्षक आहे.निदान त्यांच्या आसपास च्या,व त्यांच्या सारख्या असू शकणा-या  इतर खुल्या दिलाच्या learning  attitude असलेल्या सुहृद व वाचकांना पचनी पडावं व प्रभु कृपे जर त्या माझ्या जीवलगांना कळलं तर सोने पे सुहागा होवो म्हणून हे येथे उदाहरणादाखल लिहले. प्रपंच कारण ते जैसे माझे तसाच मी पण त्यांचा जीवलगच,कदा चित थोड़ा जास्तच,आहे.तर त्यां चं म्हणणं "कुठच्याही नात्यांमध्ये दोन्ही बाजूंनी समजुतीने घ्यावं लागतं" हे तार्किक असलं तरी वर करणी आहे व valid दिसलं तरी fallaciuos ,चुकीचच आहे. म्हणजे 

All  crows are black.

All negroes are black .

Therefore all negroes are crows.

‌हे जेवढं तार्किक दृष्टया संगत( लॉजिकल)वाटत असले तरी फाल्स (not true)आहेव invalid हि ,असुसंगत आहे


कुठचही  नातं हे परस्पर पुरकच पाहिजे तरच ते टिकेल पण मृत्यू नंतर ते नातं पण मरतं म्हणजेच शत्रुत्व पण मरतं म्हणून साऱ्यांचे अगदी शत्रूच्या नावेही श्राद्ध तर्पण कराव.देवता,असुर,यक्ष, नाग,गन्धर्व,राक्षस,पिशाच,गुह्मक,सिद्ध,कूष्माण्ड, वृक्षवर्ग, पक्षी, जलचर जीव व वायु वर आधारित जीव आहेत त्यांना पुष्ट्वव शांत करण्यासाठी म्हणून मी हे तर्पण करतो

एवढेंच काय पूर्व जन्मातील बांधवांचे नावाने पण तर्पण करतात. ।

त्याचा श्लोक:

देवासुरास्तथा यक्षा नागा गन्धर्वराक्षसा: ।  पिशाचा गुह्यका: सिद्धा: कूष्माण्डास्तरव: खगा: ॥


जलेचरा भूमिचराः वाय्वाधाराश्च जन्तव: । प्रीतिमेते प्रयान्त्वाशु मद्दत्तेनाम्बुनाखिला: ॥


नरकेषु समस्तेपु यातनासु च ये स्थिता: । तेषामाप्ययनायैतद्दीयते सलिलं मया ॥


येऽबान्धवा बान्धवा वा येऽन्यजन्मनि बान्धवा: । ते सर्वे तृप्तिमायान्तु ये चास्मत्तोयकाङ्क्षिण: ॥


ब्रह्माजी  पासून कीटकां पर्यंत जितके  जीव आहेत ते  तसेंच देवता, ऋषि, पितर, मनुष्य और माता, नाना इत्या दि पितृगण- सर्व तृप्त होउं कुळातीलगेल्या करोडकरोडों पीढया त म उत्पन्न झालेले पितर ब्रह्मलोकपर्यम्त सात द्वीपों त कुठेही निवास करणारे असोत , त्यांच्या तृप्तिसाठी हे तिलमिश्रित जल त्यांना प्राप्त होवो.

तसेंच  जे पूर्व जन्मी माझे  बान्धव नसतील,व या  जन्मात व एखाद्या दूसऱ्या जन्मात माझे बान्धव असतील त्या सर्वांना माझ्या तर्पणाने मुक्ती व तृप्ती लाभो .


पहा किती सारासार ,परिपूर्ण ,व सार्वत्रिक विचार आपल्या सनातन संस्कृतीत केला गेला आहे .आता  तरी सो called अंधांग्ललेल्या (("blinded by वेस्टर्न culture)यापल्या परी जणांनी बोध घ्यावा हिचं पितरं व प्रभूंचरणी प्रार्थना.

इदं न मम।

$@π√@¥ #©

Comments

Popular posts from this blog

कृष्णसखा उद्धव

पितृशास्त्र भाग 10:"पितृपक्ष: निषिद्ध कार्य :चुकून नका करू हे  काम*

केल्याने देशाटन.......|