सत्यनारायण पूजा : सत्य; हाच नारायण:काळाची गरज.

सत्यनारायण पूजा : "सत्य" हाच नारायण:काळाची गरज.
Truth must nd does ultimately always prevail:
.'shivanjay':dr Sanjay honkalse.©

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2886322858050039&id=100000170606055

--------------------------------http://shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com/2018/08/blog-post_26.html

वैदिक संस्कृती हा पुरातन धर्म नाही तर ते शास्त्र आहे,जीवन सिद्धान्त आहे ,way ऑफ living ,तत्वज्ञान ,अध्यात्म शास्त्र आहे व ते  सनातन आहे ,अव्यय आहे ,शाश्वत  Eternal आहे.
         
धारयते इति धर्म .

तो आयुष्यात धारण केला जातो म्हणून धर्म.वैदिक धर्मात कुठेही मूर्तिपूजन सांगितले नाही.येथे निर्गुण निराकार याचीच उपासना सांगितलिय तींच इस्लाम ने उचलली आहे असे प्रो मो हानिफ सारखे वैदिक धर्माचा ,संस्कृतचा अभ्यास केलेले निवृत्त मुसलिम  प्राध्यापकहि कबुल करतात.या अर्थी इस्लाम व सनातन धर्म एकच आहे. दुर्दैवाने व्यवहारात त्याचा विपर्यास केलेला जाणवतो.असो येथे comparative religion हा विषय नाहीये.
वैदिक धर्म पंच महाभूत पूजा ,विशेषतःअग्नी पूजा सांगतो.व म्हणून हवीर हवनांचे महत्व आज विज्ञानही मान्य करते. आजही अगस्त्य व परशुरामाने सांगितलेली अग्नी पूजा ,सूर्यनारायण रुपी अग्निनारायणाची पूजा सोमयाग द्वारे शिवपुरीचे गजानन महाराज व त्यांचे अनुयायी गोव्याचे श्री भाऊ ,आंचल ,व बल्लाळ आपटे हे कुटुंबीय ,तसेंच श्री सेलूकर महाराज, बार्शीचे कै.काळे यांचा आश्रम,भोपाळच्या माधव पोतदार इ  अग्नि पूजा अग्निहोत्र अभियान चालवीत आहेत  नव्हे त्या सर्वांनी ,श्री वसंत परांजपे ,सुधीर मुळे व माधव पोतदार यामार्फत सर्व दूर जगभर प्रसारीत व  प्रचलित केली आहे  व होमाथेरपी म्हणून अमेरिका युरोप,ऑस्ट्रेलिया,लंका ,इ ठिकाणी प्रचलित आहे.आमचे स्नेही सोमयागी सुनीलशास्त्री , कृष्णा शास्त्री व त्यांचे सहकारी हि सेवा अव्याहत पणे करीत आहेत.
‌पण सामान्य मानवास निर्गुण उपासना समजणे कठीण. बाल वर्गात वा बाल बुद्धी असलेल्या बालकास जर हे  सांगीतले तर त्याची अवस्था माझ्या नवऱ्याची बायको या tv सिरीयल मधील shanaya सारखी होईल व तो गोंधळून तिच्यासारखेच म्हणेल "मला समजेल असे सांग ना"? निराकाराकडे जाण्यासाठी,निर्गुण समजण्या साठी सगुण कळला पाहिजे ,ग म भ, न शिकून मग वाक्य,व्याकरण,दृष्टांत व मग तत्वज्ञान कळेल त्याच नियमाने  सगुणातून निर्गुणात जाता येईल म्हणून सगुण उपासना सुरु झाली ती उपनिषदे व पूराणं या माध्यमा तून,उपनिषदे व मुख्यत्वे पुराणं भक्ती व श्रद्धा यावर भर देतांत.सर्वांपर्यंत पोहचावा म्हणून नराचा नारायण होण्यासाठी उप निषदे व पुराणे आली .त्यात यद्न्य ,दान धर्म याबरोबरच पूजनालाही महत्व दिले गेले. अंतिम "सत्य"समजण्या साठी व त्या द्वारे अभ्युदय ,श्रेयस व निःश्रेयस प्राप्तीसाठी ,सत्य नारायण ,सत्य दत्त,सत्यविनायक सत्य हनुमान,सत्य अंबा इत्यादी पूजा प्रचलित आहेत.

  या पूजा,विशेषतः सत्य नारायणाची षोडशोपचार पूजा गेल्या कित्येक वर्षांपासून दर पौर्णिमेस,श्रावणात आणि मंगल कार्य झाल्यावर घरांघरात केली जाते. इतक्या वर्षात ती कित्येकां च्या अंगवळणीही पडली आहे पण सोशल मीडियावर व्यक्त होणे जसे सोपे झाले तसे हिंदू धर्मावरील जहरी फुत्कारांना उधाण आले.त्याचाच परिणाम म्हणून कुणी आंबेकर कुलदीपक विद्यार्थी प्रतिनिधी 'कन्हैय्या' होऊ पाहत आहे. काही महाभाग तर केवळ त्या एका उद्दिष्टासाठीच जगू लागलेत. ( त्यांना त्यासाठी पैसे मिळत असावेत याला सिद्ध करणारे कारणे आता सर्वश्रुत आहेत. )श्रावणांत सुरु होऊन धुलीवंदनाच्या दिवशी संपणाऱ्या सणांवर सन्माननीय टीकाकार मात्र सातत्याने टीका करण्याचे इति कर्तव्य वर्षभर पार पाडतात. कॉपीपेस्ट केलेल्या म्हणजेच चोरलेल्या या पोस्ट एखाद्या संसर्गजन्य आजाराप्रमाणे सर्वत्र पसरतात. त्यात मांडलेले मुद्दे  बुद्धिप्रामाण्यवादी व त्यामुळे इतके प्रभावी असतात की  श्रद्धेय माणसाच्याही श्रद्धापण डळमळी त होऊ पहातात.सर्वधर्म समभावा चे मूल्य फक्त हिंदुनीच जपायचे. आपल्या अॉफिस मध्ये कुणी मुस्लिम कर्मचारी असेल तो त्याचा धर्म म्हणुन नमाज पडत असेल तर आपण त्याच्या धर्माचा आदर ठेउन सहकार्य करतो.परंतु आपला कोणी आपला धर्म कार्य करत असेल तर आपलेच educated but not learned ( भारतात सुशिक्षत लोक आहेत पण सुसंस्कृत नाहीत)लोक विरोध करतात. धर्मकार्याला आपल्याच लोकांचा विरोध हिच सनातन संस्कृतीची मोठी शोकांतिका आहे.आजमितीला ब्रिटन ,युरोप येथील सारे देश आपआपल्या प्रथा पाळतात कॅनडा ,अमेरिका ,अस्ट्रेलिया,अगदी चीन या सारखे देशही परप्रांतीयना त्यांच्या परंपरा,प्रथा व अधिनियम पाळण्याचे बंधन घालतात मग भारतीयांनी आपल्या परंपरा पाळण्यात आक्षेप कां? कारण उघड आहे सनातन संस्कृती वरचढ व सार्वत्रिक होण्याची भीती व पोलिटिकल व्होट बँक.त्यात जन नारायण आज आपली बाजू ,आपली संस्कृती याबाबत जागरूक होऊ पाहत आहे . त्यामुळेंच आज दारिद्र्य, लोक संख्या, शिक्षण , आरोग्य,,प्रदूषण यावर कुणी बोलत नाही अजेण्डा एकच  हिंदू विरोध व त्यासाठी divide व rule. पहाआज  आरक्षण मग मराठा ,पटेल ,गुर्जर कुणी असोत त्याला सपोर्ट करणारे पैदा होतात.पण आम्ही हिंदू म्हंटले तर सांप्रदायिक ठरतो
. 14 मराठा मुख्य मंत्री झाले पण कुणीहि हे आरक्षण मान्य केले नाही मग आताच उधाण कां?म्हणतात ना स्वप्नात दिलेले वचन पूर्ण करतो तो हरिश्चंद्र तर सत्यात दिलेले वचन स्वप्नातही पूर्ण न करणारे सारे शरदचंद्र .

त्यामुळेंच  हे आंबेकरांचे कुल दीपक महाशय ईद पण पाळुद्या म्हणतात म्हणजे यांना फर्ग्युसन मध्ये बक-या आणून रक्ताचे पाट वाहायचेत व ते धुण्यासाठी पाणी वाया घालायचेय .
आता मूद्दा उरतो तो शैक्षणिक संस्थेतच का सत्यनारायण केला? सत्यनारायण केला म्हणजे जणू काय वाईट केले ,इतर लोकांच्या भावना दुखावणाऱ्या  काही अत्याचार, चोरी,दरोडा असे थोडीच समाजविघातक कृत्य केले आहे जे की त्यामूळे सुसु उर्फ सुप्रिया सुळेचा जळफळाट झालाय...!! तसं ही राजकीय बेरोजगार झालेली मंडळी आहे त्यामूळे ह्यांना कोणीच सिरीअसली घेत नाहीये.चर्चेत राहण्याचे हे फंडे आहेत आणि काय? हिंदू धर्म म्हणजे जातीयवादी, परंपरावादी, स्पृश्यास्पृश्य मानणारा, एका विशिष्ठ समाजाच्या हातात सर्व अधिकार ठेवणारा अशा अनेक शेलक्या शेलक्या विशेषणांनी संभावना केली जाते. कोण तो मनू....जो काळा का गोरा हे माहीत नसतो किंवा त्याचा तो कुप्रसिद्ध मानला गेलेला ग्रंथ मुळापासून संस्कृतमधून वाचणे तर सोडाच पण साधा पाहिलेलाही नसतो, तरी पण त्याच्यावर ,त्याला चिकटवलेल्या जातीवर, पीएचडी केल्यासारखे असंख्य महामहोपाध्याय तुटून पडतात. पैसा व केम्ब्रिज analytica द्वारे हे केलं जात आहे हे आता जनता नारायणाच्या लक्षांत येत आहे.
मग  अल्पबुद्धीने या धर्मातील रूढी परंपरांमागचा विचार जाणून घेण्याचा प्रयत्न  व विचार करु लागलो की कोडी सहजपणे सुटत जातात आणि प्राणप्रिय वैदिक व अध्यात्म धर्मशास्त्राची महानता समजू लागते.
दरवर्षी घराघरात होणारी सत्यनारायणाची पूजा हीसुद्धा अशीच एक आदर्श परंपरा आहे. सत्यनारायण या नावाचा देव खरंच आहे का ते कित्येकांना  माहित नाही.तो साधुवाणी, कलावती किंवा लीलावती ही पात्रे खरेच होती का हेही माहित नसते .तरीही  हे व्रत पूजा भावुक भाविक करतो कारण त्यातून मिळणारे आत्मिक समाधान त्याला शब्दात वर्णन करता येत नाही पण अनुभवता मात्र जरूर येते. तर यामागे प्रचंड मानसिक  (Psychological फॅक्टर)समाधान असते.
एवढेंच नव्हे तर सामाजिक व अर्थशास्त्रीय व्यवहार व उलाढाल असते.पहा:
नेमके प्रत्येकाच्या घरात व संस्थेत जेंव्हा सत्यनारायणाची पूजा केली जाते तेंव्हा  पूजा होणार म्हणून दोन दिवस अगोदर गृहिणी व सेवेकरी  घराच्या व संस्थेच्या साफ़सफाईला लागते. जाळेजळमटे, अडगळ काढून टाकली जाते. स्वच्छतेतून निर्माण होणारी धार्मिकता घरात वावरू लागते. पूजेसाठी लागणारे साहित्य खरेदीविक्रीतून आपोआपच मार्केटमध्ये पैसे फिरू लागतो. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी हे सण अनेक लोकांना अन्नाला लावतात. सत्यनारायणाची पूजा हीसुद्धा त्याला अपवाद नाही. ही पूजा जर कोणी नाही केली तर फुले, फळे, सुपारी, हळद, नारळ, तांदूळ, गहू, रवा, साखर दूध, आदी उत्पादकांना त्याकाळात वाढीव ग्राहक मिळणार नाही.
पूजेसाठी लागणा-या दुर्वा, पत्री, प्रसाद यांचे केवळ धार्मिक महत्व नाही तर या सगळ्या गोष्टींचा औषधी उपयोग आहे. म्हणूनच शास्त्रकारांनी पूजेत वापर करायला सांगितला आहे. हिंदू धर्मातील कोणतीही रूढी, परंपरा ही माणसाला निसर्गाच्या जवळ नेते आणि निसर्गाचे संवर्धन करायला शिकवते. एवढेंच काय पूजेनंतर वाटला जाणारा प्रसाद हा अनारोग्यातून आरोग्याकडे जाणारा एक राजरस्ताच आहे. प्रसाद भक्षण करून आपण विविध रोगांना आपले भक्ष्य बनू देत नाही हे आपल्या लक्षातच येत नाही.
देवाला नैवेद्य दाखवणे हा पूर्ण भक्तीयोग आहे,शास्त्र आहे त्यातील विज्ञान योग काय तो पाहू.

गणेश हा बुद्धीदाता आहे. आणि मोदकातील पुरण म्हणजे गुळ खोबरे आणि वर तूप हे काॅम्बिनेशन म्हणजे साक्षात बुद्धिवर्धक योग आहे. गुळाने अनेक व्याधी दूर राहतात ,खोब्रेतर कॅन्सरलाही दूर ठेवते ,आता अमेरीकेनेही ,ज्यांनी सुर्यफुल तेलासाठी ,खोबरेल व तूप अनारोग्यकाराक आहे हा प्रचार गेल्या शतकात केला ,ते खोबरे ,खोबरेल तेल व तुपाचे महात्म्य मान्य करते
.बूस्ट बोर्नव्हीटा, माल्टोव्हा, काॅम्प्लान इ. म्हणजे फक्त टीनचे डब्बे. बाकी त्यात सोयाबीनची टरफले, नारळाची भुशी आणि शेंगदाण्याचा चोथाच असतो. जरा जाहीरात दाखवायची खोटी, पडले तुटून त्या डब्यावर. हे जाहिरात तंत्र या कंपन्यांना बरोब्बर माहिती आहे, त्यामुळे जाहिरातींचा मारा करून, सचीन, कपील इ. ब्रॅण्डचा वापर केला की, आपले प्राॅडक्ट खपते. चोथा खाऊनच जर वजन वाढणार असेल तर मग असली नारळ आणि शेंगदाणेच का नकोत ? नारळ आणि शेंगदाणे खाऊन तब्येत सुधारते. घरच्या घरी बारा बारा बाळंतपणे होतात. टाॅनिक म्हणून  गुळ आणि शेंगदाणे. नारळ आणि गुळ. जो आपल्याकडे नैवेद्य म्हणून दाखवला जात होता आणि आमच्याच घरातील बाल हनुमान आणि बाल गणेशांना प्रसाद म्हणून मिळत होता. भक्तीपूर्ण नैवेद्याला, कोलेस्टेरॉलच्या भीतीने बदनाम केले गेले आणि जाणीवपूर्वक आरोग्याचा व्यापार सुरू झाला.तसेंच
देवीचा पुरणाचा नैवेद्य म्हणजे चणे. हरभरे डाळ शिजवून गुळ तूप घालून केलेले मनगणे असो वा कडबू असोत, पुरणाची पोळी असो वा नुसते पुरण असो, आणि या सर्व नाजूक नैवेद्यावर साजूक तूपाची धार...... फक्त ताकद वाढत होती. वेगळ्या टाॅनिकची गरज नव्हती. घोड्याला  खाद्य दिले जाते ते चणे,हरभरेगुळच ना ? घोड्यासारखी गती आणि वाजीकर शक्ती मिळवण्यासाठी तसेच तेच खाद्य आपल्याला मिळण्याची व्यवस्था आपल्या देवांच्या नैवेद्यामधून केलेली होती. गॅस वाढतो, पित्त वाढते, जाडी वाढते म्हणून जेवणातून चणाडाळच हद्दपार केली गेली  आणि प्रोटीन पावडरचे डब्बे मात्र जिममधे खपवले जाऊ लागले हे कधी लक्षातच आलेच नाही.
नागपंचमीला नागोबाला लाह्या, हळदीच्या पानात लपेटलेल्या पातोळ्या, पानगे, गोकुळाष्टमीला शेवग्याच्या पाल्याची भाजी, कोजागिरीला आटीव दूध, गुढीला श्रीखंड, हे नैवेद्य आरोग्य रक्षण करणारेच होते. नारळीपौर्णिमेला नारळीभात ठरलेलाच. नारळावरूनच ओळखली जाणारी ही पौर्णिमा!
वेगवेगळ्या ऋतुमधे येणारे वेगवेगळे सण, आणि या निमित्ताने होणारे नैवेद्य हे जणु काही आरोग्याचे बूस्टर डोसच होते. दरवर्षी नियमाने घ्यायचे आणि आरोग्य सांभाळायचे !
पहा भारतीय जीवनशैली हि व्यवहार,धर्म आरोग्य,ऋतुमान ,हवामान ,तापमान इ सर्वांचा सारासार विचार करून संस्कृतीचे जोपासना करते.
म्हणूनच  इतरवेळी नाश्त्याला शिरा असतो तोच पूजेच्यावेळी प्रसाद बनतो.जेंव्हा शिरा हा प्रसाद म्हणूनसमोर येतो तेंव्हा त्याची चव वेगळीच लागते. कारण त्यात भक्ती उतरलेली असते. बाकी वर्षभर शिरा हा प्रसादासारखा कधीही लागत नाही.
सत्यनारायणाच्या पूजेत आवर्जून तीर्थ म्हणून दिले जाणारे पंचामृत हे शेतात बायोकल्चर म्हणून वापरले जाऊ शकते. पंचामृताचे अनेक व्याधी निवारक  उपयोग आहेत तो एकवेगळया  लेखाचा विषय होईल।
. साता-यातील एक अवलिया शास्त्रज्ञ श्री शेखर कुलकर्णी यांनी  आपल्या गच्चीवरील मातीविरहित बाग पंचामृताच्या साहाय्याने तयार केली. दूध, दही, साखर, मध आणि तूप हे एकत्र करून पंचामृत तयार केले. एका कुंडीत सर्वात खाली नारळाच्या शेंड्या टाकल्या. त्यावर दोन चमचे पंचामृत टाकले. त्यावर घरातला ओला कचरा टाकून पुन्हा दोन चमचे पंचामृत टाकले. असेच दोन थर तयार करून एक झाड सोबत असलेल्या मातीसहीत लावले. पुढील २१ दिवसात पंचामृताने कच-याचे विघटन केले आणि झाड तरारून वाढले. त्यानंतर त्यात रोजचा कचरा टाकून झाडाला वाढवले. अशा प्रकारे त्यांनी गच्चीत अनेक झाडे फुलवली आहेत. पूर्वी पंचामृत हे तुळशीच्या झाडाखाली टाकले जाई. आणि तुळशी खालील माती ही गांधीलमाशी किंवा मधमाशी चावल्यावर औषध म्हणून लावली जाई. याचा अर्थ पंचामृत हे ख-या अर्थाने अमृत आहे हे आपल्या पूर्वजांना माहीत होते.
तसेंच पुजांमुळे सामाजिक आपुलकि वाढते ,प्रेम जिव्हाळ्याची अनेकानेक माणसे या पूजेच्या निमित्ताने एकाच दिवशी जवळ येतात ,विचार आचार ,संबंध भावबंध यांची देवाण घेवाण ,वाढ होते.आपले सणवार पूजन हे पारंपारिक आहेत ,अमेरिकेत तर ते ओढून ताणून फेस बुक  ,जेथे व्यक्तिगत भेंट सोडाच सारेच virtual भेंट दूरच, फादर,मदर डे ,फ्रँड्स  डे  आहेत.देवाचे दर्शन घ्यायचे असल्याने कोणाच्याही मनात दुस-याबद्दल वाईट विचार नसतात. ती एक प्रसन्न संध्याकाळ असते. सर्वाना एकप्रकारची पॉझिटिव्ह ऊर्जा मिळते. ती दिसत नाही, दाखवता येत नाही पण अनुभवता मात्र जरूर येते.अनुमान ,अनुभव ,व अनुभूती यांत फरक आहे तो आपल्याकडे कळतो.सत्यनारायणाच्या पूजेच्या निमित्ताने त्यांना घडलेला माणसांचा सहवास हा त्यांना नक्कीच आयुष्यात उपयोगी पडतो.
एक छोटीशी पूजा, पण एवढा मोठा अर्थ सांगून जाणारी ! लोकांना एकत्र आणणारी ही पूजा काळाची गरज नव्हे काय ? आज प्रत्येकजण एकमेकांपासून शरीराने आणि मनाने दूर गेलाय. त्यामुळे आजपर्यंत नव्हती इतकी गोष्टींची गरज निर्माण झाली आहे. कोणाला पटो किंवा न पटो, या धार्मिक रूढी, परंपरा लोकांमधला आपपरभाव नाहीसा करून मानवतावाद शिकवतात. मग टीकाकार काहीही म्हणोत.
या उपर सर्वात व अत्याधिक महत्वाचे म्हणजे मुमुक्षत्व . या पूजा या चे साधन आहेत नव्हे त्यासाठीच त्या आहेत हे लक्षांत घेणे महत्वाचे , पहा यासर्व पुजाना "सत्य"हि उपाधी लावलीय म्हणजेच आयुष्याचता अंतिम सत्याचे ध्येय ठेवणाऱ्या,तेथे नेणाऱ्या या पूजा आहेत सत्य हाचं नारायण ,सत्य हेंच दत्त तत्व ,सत्य हाचं विनायक. म्हणजे
पृथ्वी तातवरूपी मूर्तीची जल तत्वाने ,पूजन करून  अग्नी नारायणाच्या साक्षीने आकाश तत्व ,व नंतर निर्गुण ,व पॅरा तत्वाकडे नेणारी अशी ही पावलापावलांनी सत्य ,जे शिव आहे व तेंच कल्याणकारी आहे हेवसांगणारी हि पूजा उपासना हि काळाची गरज आहे व ती साता समुद्रापार मान्यता पाऊन आहे . आमचे शंकरराचार्यांचे प्रतिनिधित्व करणारे वेदमुर्ती पूज्य विवेकशास्त्री यासारखी व्यक्तिमत्वे याचा प्रतिनिधित्व अगदी अमेरिकेत करतात वर्षांतील दोन माहिने  ते तेथील परदेशी व परदेशस्थ अनिवासी भारतीय यांना अनेकानेक पूजा चें महत्व व माहात्म्य सांगतात . आपल्या रसाळ वाणी,अथांग ज्ञान,शास्त्रोक्तपद्धत व निरामय भावाने ते पुढची पीडी तर घडवतातच पण अनेक परदेशस्थ नागरिक व अनिवासी भारतीय याना अध्यात्माची ओढ लावतात हे मी स्वतःपाहिलेय व  अनुभवलेय. शंभर वर्षांपूर्वी ह. ना .आपटे यांनी जसे "पण लक्षांत कोण घेतो "? म्हणत तळमळीने जन जागृती केली तशीचं  जागृती करणारे अनेक विवेक शास्त्री निर्माण होण्याची गरज आहे व तुम्हा आम्हासारख्यानीही ती आपल्या परिने ,आपल्या कुवती नुसार ती पुढे नेता  यावी म्हणून आजच्या रक्षा बांधन व नारळी पोर्णिमेच्यादिवशी पूजन केलेल्या 'सत्य'नारायणांस प्रार्थना करतो.
:
'शिवंजय डॉ संजय होनकळसे..©
shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.
com.
drsanjayhonkalse.tripod.com

Comments

Popular posts from this blog

कृष्णसखा उद्धव

पितृशास्त्र भाग 10:"पितृपक्ष: निषिद्ध कार्य :चुकून नका करू हे  काम*

७)पितृशास्त्र:अंत्येष्टी व दशक्रिया