त्रिजुगी नारायण:तीन युगांपासून शिवपार्वतीच्या विवाहाचे साक्षीदार.;शिवंजय:डॉ.संजय होनकळसे। ©
त्रिजुगी नारायण:तीन युगांपासून शिवपार्वतीच्या विवाहाचे साक्षीदार.
:"शिवंजय":डॉ.संजय होनकळसे। ©
केदारखंड हि देवभूमी आहे.हरिद्वारपासून जमुनोत्री,गंगोंत्री,केदार नाथ बद्रीनाथ ते परत हरिद्वार पर्यंत हिमालयाचा विभाग हा केदार खंड मानला जातो म्हणजे एवढी योजने हि भगवान शंकराची भूमी आहे . आनंदवन काशी या आपल्या निवासातून येथे ते आले ते ब्रह्महत्या व गुरुहत्या दोष निवारणार्थ भगवान शंकर यांच्या दर्शनार्थ निघालेल्या पांडवांना टाळण्यासाठी.
यांचं केदारAभूमीत गौरीकुंड येथे हिमालय पुत्री पार्वतीने शिवप्रात्यर्थ तपस केले होते.शिव प्रसन्न झाले व पार्वतीशी दुसऱ्या विवाहास तयार झाले.विवाह ठरला व संपन्न झाला तो हिमावत येथील त्रिजुगी नारायण येथे.
या त्रिजुगी नारायण हे स्थान गौरीकुंड पासून 17 किलो मीटर वर स्थित आहे.समुद्रसपाटीपासून 7000 फूट उंचीवर आहे.बद्रीबाथ येथे नारायण रूपांत स्थित आहेत. त्यांच्या साक्षीने येथे शिवपार्वती विवाह संपन्न होण्याचे ठरले.
येथे मग भगवान विष्णू यांनी विवाह प्रेषित केला सर्व देवतांना invite /आमंत्रण दिले गेले सर्व देव देवाधीदेव नीलकंठ महादेव यांच्या विवाहासाठी त्रिजुगीस जमले.
,येथील तीन कुंडे,ब्रह्म कुंड,रुद्रकुण्ड व विष्णूकुंड येथे त्यांनी स्नान केले.विष्णूकुंडामागे सरस्वती कुंड आहे तेथे विवाह वेदी मांडली गेली व विवाह विधी सर्व देवाधी देवांच्या साक्षीनी संपन्न झाला.मग त्रिजुगी नारायणा समोर सप्त पदि साठी लज्जा वेदी स्थापन झाली तेथे शिव पार्वतींनी सात फेरे घेतले व विवाह संपन्न झाला तो त्रेता युगांत.(सत्य युगात सतीशी विवाह संपन्न झाला होता व ती ऑलरेडी सती गेलेली होती.)
हि यज्ञ वेदी आजही धुनिस्वरूपात गेली तीन युगे जागृत आहे.रोज यात्रेकरू व स्थानिक भाविक येथे आहुती देतात.हि धुनी आजही पवित्र व अत्यंत जागृत आहे.
वेदि समोर त्रिजुगी नारायण त्यांचे पंचायतन आहे त्यांच्या जवळच पायाशी जवळ हवाला 1000 सुंदर व पवित्र शाळीग्राम स्थापीत आहेत .बाहेर वेदी व गर्भगृह याच्या दाराशी शेषशाही विष्णूची अनंत शयनरूपी कोरीव दगडात सुंदर मुर्ती आहे. हा विवाह सोहळा त्रेता युगात संपन्न झाला.गेली तीन युगे या विवाहाचे साक्षीदार म्हणून नारायण येथे स्थित आहेत म्हणून ते त्रियुगी नारायण.
अशा या त्रियुगी नारायणाचा मी तिसा-यांदा दर्शन लाभाचा धनी यंदा झालो. पहिल्यांदा मी 1998 -99च्या मे महिन्यात माझ्या काही सुहृद विद्यार्थी मित्रांबरोबर आलो होतो. गौरीकुंडहुन जीपने येथे आलो 100 रुपयात जीप हायर केली होती.
त्यानंतर बरेच पाणी गेले त्यात न्हाऊन धुवून पुढे येत होतो गेल्या मी जून मध्ये दोन वाऱ्या बद्री केदारच्या झाल्या त्याआधी भोले विश्व नाथ यांनी 36 वेळा गेली 20 वर्षे एकही यात्रा सत्र( केदार बद्री यात्रासत्र हि वर्षातून फक्त चार महिनेच सुरु असते) न चूकवता शारीरिक, मानसिक,सामाजिक,आर्थिक,व्यवसाय नोकरी,व आरोग्यदृष्ट्या प्रतिकूल परिस्थिती असतांना सुद्धा बोलावून घेतले. त्याबरोबरच येथील चार धाम ,पंच प्रयाग,पंच केदार ,पंच बद्री,व इतर अनेक शक्तीस्थळे यांची दर्शनसेवा व बाकीची 12 ज्योतिर्लिंग यात्रा तेवढ्याच वेळा (३५) घडवली गेलि हेंच माझ्या फिकट व फाटक्या आयुष्यातील आश्चर्य हे भगवत कृपेचे -करुणेच दर्शक आहे. गेल्या वर्षी दोनदा बद्री केदारदर्शन घेऊन मी कैलास दर्शनास तिस-यांदा गेलो व जीवावर बेतणाऱ्या आजारात पडलो. गेली १ जुलै ते 2018 मार्च पर्यंत तीन वेळा आयुष्याचा खोखोने व हृदयस्थ भिडूंनी चार वेळा खो दिला व ह्रदयाला शारीरिक व मानसिक दौर्बल्याचा 'भागी'दार बनवले.ह्रदयाची सल व झळ घेऊन ह्रदय कार्यक्षमता दौर्बल्याचा मी बळी पडलो.चार वेळा भोज्ज्यास शिवून आलो.
अशा अवस्थेत पुन्हा देवभूमीत पाय ठेवण्याची दानत नसताना यावर्षी मी विचार केला की सारे श्वास "त्या" नेच बहाल केलेत ते त्याच्याच चरणी रुजू व्हावे या विचाराने मला मे मध्ये व आता ऑगस्ट मध्ये आणण्याची कृपा केली तीही काही सुहृदांमार्फतच. मे मध्ये आमच्या भगिनी श्रीमती मालन देशमाने व आमची विद्यार्थी मैत्रीण श्रीमती पूनम यांच्यासह केदार यात्रा केली.
आता ऑगस्टमध्ये आमचे मित्र ''पपा"महेशजी सावंत यांना बद्रीनाथ व पुढे जायचे होते आमचे चिकित्सा चाणक्य श्री नाथजी हेही तयार होतेचं.आमचे जेष्ठ मित्र श्री
संजय केळकर यांनी पण मला गंगा स्नान करायचेय म्हणून फोन केला.पण मग शरीर दौर्बल्यामुळे त्यांचे व दुसऱ्या दोघांचे कॅन्सल झाले.
मग मी ,नाथजी ,आमचे मित्रद्वय संजय कळझुणकर व प्रदीप ,हेमंत असे सहा शिलेदार केदार दर्शनास आलो.Landslide, पाऊस हि दिव्ये पार पाडत आम्ही केदार दर्शन सेवा नितांत सुंदर, व सोज्वळ पणे करवून घेतली गेली व खाली आलो तोवर 5 वाजले होते पाऊस रिपरिप करत होता.पुढे जावयांस गाडी मिळत न्हवती पण दैवी योजना वेगळीच होती .एक गाडीवाला ,मीना नावाचा, जणू आमची वाटच पाहत होता त्रियुगी साठी. मग काय? आहे तेथे राहण्यापेक्षा त्रियुगीस राहणे मी पसंत केले त्यास आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे धनकवडी निवासी श्री शंकर महाराज त्यांच्या तरुणपणी केदार यात्रा करून
त्रियुगी येथे काही काळ वास्तव्यास होते त्यांची व्यवस्था ही एका साधूने एका साधकाकडे केली होती .येथे त्यांनी तप,साधना,ज्ञानेश्वरी, गीता, दासबोध इ अभ्यास केला तो इथेच.तर महेश 'पपा ,नाथ जी व मी या शंकर महाराज भक्तांस हि पर्वणीच होता.तर महाराजांच्या वास्तव्याने पावन पुनीत अशी ही भूमी आहे.
मग चालून आलेल्या संधीचा फायदा घेऊन आम्ही 12500 फुटांवरून खाली येऊन परत 7 हजार फुटांवर पोहोचलो .
वातावरण धुंद करणारे होते ,पाऊस ,त्यात श्रावण मास.राहावयास जागाही छान मिळाली. रात्री आराम करून सकाळी देवळांत गेलो तीन कुंडांपैकी रुद्रककुंडात स्नान केले .माझे केदारनाथचे परिचित पुरोहित श्री शिवप्रसाद सेमवाल यांचे हे गाव ,ते येथे भेटले .जुन्या आठवणींना उजाळा मिळाला ,स्नेह उजागर झाले.
सरस्वती कुंडात सर्व पितरांची,परिचित अपरिचित मित्र, गुरु,दुरावलेले वा दूरस्थ झालेल्या सर्व सुहृतांचे पितरांचे नावाने तर्पण केले त्यांच्या मुक्तीसाठी प्रार्थना व आमच्या भुक्ती मुक्ती साठी आशिर्वाद मागितले.पुनश्च शिघ्रदर्शन सेवा प्राप्तीची प्रार्थना केली व निघालो. हे स्थान 12 महिने खुले असते केदार बद्री सारखे फक्त चार महिने नाही हाहि एक फायदा.
तर असं हे त्रियुगी /त्रिजुगी नारायण महत्वाचे आहे .लाखातून एखादाच बद्री केदारला पोहोचतो अशा हजारों बद्रिकेदार च्या यात्रेकरू मधून एखादाच हि अशी स्थाने करू शकतो ।मी म्हणतो एकवेळ बद्री केदार यात्रा आपण करतो पण ही अशी स्थान होत नाहीत कारण ती एकतर माहीत नसतात वा वेळ नसतो ,बुद्धी वा ताकत नसते. अशी कित्येक स्थाने या यात्रा मार्गात आहेत व सद्गुरू कृपें ती मजकडून करवली व माझया माध्यमातून इतरांची करवली गेलीत.
त्रिजुगी नारायण आता आणखीन दोन कारणासाठी प्रसिद्ध पावत आहे एक तर धिरुभाई अंबानीचा नातू ,मुकेश अंबानीचा मुलगा याचा विवाह सोहळा पण या भाद्रपदात येथे होणार आहे. त्यामुळे हे स्थान परत एकदा उजेडात येत आहे.या लग्नाच्या निमित्ताने सोयी वाढतील उदा. जिओ चा टॉवर वा इतर बाबी येतील. लोकांना येथे येण्याची इच्छा व प्रवृत्ती होईल।
.दुसरे असे की आता मोदींचे नव्या रस्ता परियोजने नुसार त्रिजुगी तुन मोटार रस्ता अगदी केदार नाथ पर्यंत होतोय,तो येत्या दोन तीन वर्षांत होईल .
मी 1996 पासून रस्ता होईल हे ऐकत आलोय हजारो करोडो रुपये दरवेळी नुसत्या सर्वेत गेलेले ,rather गळ लेले मी पाहिलेत . डोली ,घोडा, कंडी लॉबी हे करू देत नव्हती ,ते मोदी करून दाखवत आहेत . त्यांनी स्वतः केदार येथे साधना केली आहे हे कदाचीत फारच थोड्या जणांस माहित असावे .त्यामुळे त्यांच्या मागे साधना शक्ती प्रचंड इच्छा व उर्जाशक्ती आहे ,गरज आहे ती जन सामान्यांनी त्यांच्या मागे उभे राहण्याची. या रस्त्यामुळे केदारनाथला जाणे सुलभ सोपे होईल ,त्रिजुगीस जाणे होईल .
एकंदरीत अंतर्वेध घेणारी ,अंतर्मुख बनवणारी,अंतरात्मा आत्माराम याचा परिचय करवणारी अशी ही त्रिजुगीची यात्रा.
तुझं माझं करीत एक दिवस आपल्या सर्वांना जायचेच आहे तर चांगले कर्म करून जावे कारण तेंच आपण घेऊन जाऊ शकू भौक्तिक संपदा नाही. 'तू' व 'मी ' आपण नाहीत तर एक आहोत हे एकत्व,togetherness , ONENESS (TO BE ONE WITH THAT "ONE" हि भावजागृती अशा यात्रांमुळेच होते. व मग
अनायासें मरण ,
विना दैन्ये जीवन,
जीवनांती "त्याची" जवळीक जवळपण
हेंची देई देवा दान
अशी प्रार्थना करून हि लेखणी व लिखाण भोले भंडारीच्या सेवेस रुजू करतो.कारण शेवटी कर्म महत्वाचे ,भौक्तिक कमाई नाही,मानवता महत्वाची ,मान्यवरता (status) नाही म्हणून तर हस्तरेखा हातावर असतात मुठीत नाही.
drsanjayhonkalse.tripod.com
shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com
🌿↵↵ 🌹 शिवंजयसंजय© 🌹↵🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿इदं न मम्।
शिवार्पण मस्तु।
Comments
Post a Comment