गुवाहाटी :"shivanjay"drsanjay honkalse
आसाम,अरुणाचल डायरी
https://m.facebook.com/story.php?story_fbid=2086527768029556&id=100000170606055
आसाम अरुणाचल डायरी:
1)गुवाहाटी :"shivanjay"drsanjay honkalse
गुवाहाटी आसामची राजधानी, पूर्वीची प्रगज्योतिषपूर,हि तंत्रसाधनेची भूमी आहे.सर्व हिमालाय फिरलो अगदी काश्मीर, जम्मू, हिमाचल,उत्तराखंड नेपाळ,येथील सारे तीर्थ ,गंगा गंगोत्री ते गंगासागरतटा वरील सारे धाम सद्गुरुकृपेने झाले पण सिक्कीम ,भूतान व सात बहिणी असाम इत्यादींचा योग येत नव्हता. तो योग युथ हास्टेल या संस्थेमुळे आला तो 2011 व 2015 साली . युथ होस्टेल चा होम स्टे प्रोग्रॅम साठी तेथील राहिवास्यांना होम स्टे ट्रैनिंग साठी सिक्कीमचे काही विभाग टुरिस्ट प्लेसेस म्हणून प्रगत करायचंय व त्या बरोबर स्थानिकांना व्यवसाय साधन म्हणून होम स्टे प्रोग्रॅम सिक्कीम गव्हर्नमेंट ने हाती घेतला होता त्याचाच एक भाग म्हणून आम्ही एक्सपेरिमेन्टल बेसिसवर यात्री म्हणून 20 जण सिक्कीमला गेलो होतो,तेंव्हाच भुतानही केले व आसाम,अरुणाचलप्रदेश,मेघालय युथ हॉस्टेल बरोबरच झाले . मी युथ हॉस्टेलचा लाइफ मेंबर असल्याने हा योग फळला. युथ होस्टेलचे सर्व कार्यकर्ते धडाडीचे व उत्तम कार्यकर्ते पण ते धार्मिक त्यातही हिंदू धर्मस्थळांना भेटी देणे टाळतात। पण गम्मत म्हणजे monastry वगैरे आवर्जून दाखवतात .हि नेहरूंच्या secularism =निधर्मी राज्यव्यवस्थेची पक्षपाती देणगी.
असो त्यामुळे कामाख्या,तेंव्हा,मी अगदी पळून जाऊन केले.
परत योग येणे कठीण वाटत होत.
विश्वनाथ कृपे लायकि नसताना अनंत यात्रा,गिरी पद भ्रमण, विदेश यात्रा (२,३वर्षात ३३ देश)धर्म यात्रा (35 वेळा१२ जोतीर्लिंग,४ वेळा चारधाम, अष्ट नारायण, 2 वेळा कैलास, सप्त कैलास यात्रा, सप्त पु-या,सप्त नद्या स्नान,पञ्च रामा ,पञ्च भूतलिंग,नव नंदी, सहा सुब्रमण्यम स्थाने,33 पितृस्थान, 33 शक्तिपीठे इ. सर्व 20 वर्षात 1997 ते 2017)करउन घेतल्या गेल्या.
गंगासागर दोन वेळा करताकरता 1997 पासून परशुराम कुंड मेळा करण्याची इच्छा मात्र सफल होत नव्हती.
जानेवारी मधे परशराम कुंड मेळा स्नान करायचा योग ,अथक प्रयत्ने,आला होता.
1996- 97 पासून साधारण दरवर्षी प्रयत्न करत होतो पण आशेचा किरण दुरापास्तच.खरं तर गंगासागर संक्रान्त मेळा या दरम्यान दोनदा सफ़ल झाला होता. त्यामुळे साधु सन्यासी यांचा सहवास व ओळख पण झालेली होतीच. त्यात आमचे माझ्यावर अत्यन्त जिव असलेले केदारनाथचे अन्न भण्डारी चंद्रगिरी महाराज हेही व्यवस्था करणारे होते ,त्यांना 2013 च्या प्रलयात समाधी लाभली. त्यामुळे आशा मावळली होती . इच्छा प्रबल होती.पण योगच नव्हता. दैवच्छा बलियासि.
पण सत्यसंकल्पाचा दाता परमपिता परमेश्वरच.2017 साली मे महिन्यापासून अचानक आजारपण मागे लागले तारीख 12 मे 2017 पासून तब्बेत बिघडली तेंव्हा कुमाऊ ,केदार केले मुंबईत आला व आठवडा भरात परत बद्रीनाथला सेलुकर महाराजांचा सौमयागाचे निमंत्रण आमचे स्नेही यज्ञाचे अर्धवयु पंडित सुनील लिमये मार्फत मिळाले म्हणून परत कुमाऊं,केदार बद्री असा प्रवास केला व तेथून तिसऱ्यांदा कैलासला जाण्यासाठी नेपाळ ला प्रयाण केले तर pulminary aedema चा पेशन्ट म्हणून.
मेडिकली सगळं कठीणच झालं.
आयुष्यात पहिल्यांदाच यात्रा सहभाग टा ळ ला .अशातच आमचे विद्यार्थी मित्र मेजर श्री सुशांत गोखले यांच्या मुळे 2018 च्या जानेवारीत परशुराम मेळा जाण्यासाठी सर्व बुकिंग व सहा जणांची व्यवस्था केली .पण परत 11 जानेवारीस रुग्णालयात दाखल व्हावयास लागले.
व आयुष्यात प्रथमच ठरलेला कार्यक्रम रद्द केला व बाकीच्यांना पाठवले. मन खट्टू झाले,दोघांचे मेजर सुशांतचे व माझेही.दोघेही नैसर्गिक अश्रुंचे गुलाम झालो.
भीतभीतच प्रोग्रॅम आखला कामाख्या परशुराम कुंड इ जानेवारीत गेलेलयांना सर्व पत्ते ,ट्रान्सपोर्ट, अकोमडेशन चे रेकॉर्ड ठेवावयास सांगितले पण त्यांची अजाणता व माझं दुर्दैव. सहज पणे निरोप आले काही रेकॉर्ड नाही. मग काय पुनश्च हरी ओम्.
तसे माझे सर्वच विद्यार्थी मित्र मला जीवलगच व तत्यांची प्रगतीही छान आहे .प्रत्येक सहलीत सर्व नवीन साथी त्यांचे गुणगाणच करतात.तेही आपल्या परीने चांगलंच करतात. पण मला त्यांचे पोटांशियल*(potentials) माहिती असल्याने त्यांनी आपल्या परी( स्थिती) च्या वर उठावं असा माझाच अट्टाहास असतो king maker आर्य चाण्यक्य म्हणतो त्याप्रमाणे प्रत्येकाने आपल्या ताकदीच्या वर उठावं या न्यायाने व "I"somania चे शिकार होऊ नये. पण कदाचित मींच कुठेतरी कमी पडतोय.
पण मडकी अजून कचचीच.अपरिपक्व बाळांची परिपक्व बाळांपेक्षा जास्त काळजी वाटते.जाणिवेची उणीव जागृतीचा अभाव निर्माण करते . मोहंमद घोड्याला फक्त नदी पर्यंत नेऊ शकतो .
सर काय ते बघून घेतील?
पण आमची पूनम परिस्थिती ओळखून राबली त्यातच तिचे वडील अत्यवस्थ ,जानेवारी पासून 7/8 वेळां ऍडमिट असूनही त्यांना ,आईला ,नोकरी व मलाही सांभाळले व सर्व प्रोग्रॅम को ऑर्डिनेट केला. तिला त्रिवार वंदन.Hats ऑफ to her, nd hats ऑफ बी4 her.कुठेतरी आपली शिकवण फळाला आली .
अशा परिस्थितीत उन्हातून 55 60 तासांचा प्रवास करतV कामाख्या गोहाटीस 13 एप्रिलला पोहोचलो.
प्रभु कृपे सर्व प्रवासात प्रचंड गर्दी असूनही गारवा लाभला।
drsanjayhonkalse. tripod. com
उमानन्द मंदिर : "शिवंजय" डॉ. संजय।
गोहाटी व कामाख्या च्या भर वस्तीतून ब्रह्मपुत्राचं अफाट ,प्रचंड पात्र वाहाताहे. शहरात पात्र असूनही स्वच्छ व संरक्षित व सुरक्षित आहे । ब्रह्मपुत्रा ब्रह्माचा मानस पुत्र त्यामुळं ती नदी नसून नदा आहे. जगातील एकमेव He रिव्हर she river नव्हे।ब्रह्म पुत्राचा उगम कैलास पर्वतात आहे।तेथिल ब्रह्मकुंडा तुन परशुरामाने पृथ्वीवर अवतरवली,जशी भगिरथाने गंगा पृथ्वीवर आणली.
तर कामाख्या वरून आम्ही बोट करून ब्रह्मपुत्रा नदीत असलेल्या एका बेटावर गेलो जिथे उमा व महेश हे शिवलिंगरूपात प्रगट झालेत. या बेटास peacock बेट म्हणून ओळखले जाते.हे जगातील सर्वात छोटे वस्ती असलेले बेट आहे.
यालाच भस्माचल बेट म्हणूनही ओळखतात कारण येथेच शिवशंकराने कामदेवमदन याचं भस्म केले अशी धारणा आहे.
वर देवळात गुफा आहे त्यात खाली उतरून जाऊन दर्शन करावे लागते.तेही द्वापार युगात शिवलिंग उत्पन्न झाले. शिवलिंगात उमा महेश यांचे मूर्ती युगल आहे। व बाजूला मंदाकिनी गंगा जल प्रसवतंय. फोटो काढावयास बंदी आहे.
बेत व मंदिराचा परिसर सुंदर व मोहक आहे.
येथे सुवर्ण माकडे ,golden monkeys आहेत . आता एखाद दयसरांचं दिसून येतो. आम्हाला मात्रू तो दिसला नाही.
हे मंदिर अहोंम राजा गदाधर (1681 ते 1695) याने 17 व्या शतकात बांधले.
drsanjayhonkalse.tripod.com
Comments
Post a Comment