योनी तंत्र ,भक्ती, श्रद्धा यांचा ज्वलंत व जिवंत त्रिवेणी संगम : नीलांचल पर्वतारूढ कामाख्या देवी :डॉक्टर संजय होनकळसे "शिवंजय" drsanjayhonkalse@gmail.com

योनी तंत्र ,भक्ती, श्रद्धा यांचा ज्वलंत व जिवंत  त्रिवेणी संगम :
      नीलांचल पर्वतारूढ  कामाख्या देवी :डॉक्टर संजय होनकळसे "शिवंजय"              drsanjayhonkalse@gmail.com
आजपर्यंत सारा  भारत  व सर्व प्रमुख  तीर्थ स्थळांच्या दर्शनाचा लाभ व आनंद होऊनही ईशान्य भारतास भेट देण्याचा योग तीव्र  इच्छा असूनही काही येत नव्हता.अगदी 
जलपायगुडी ,दार्जीलिंग नेपाळ,एवढेच काय तिब्बत कैलास ,यात्रा ही  झाली पण जलपाय् गुडी पांसून जवळच असणारया आसाम येथे जाऊ शकलो नाहीं.
आसाम ,तेथील  संस्कृती ,उत्सव, ब्रह्मपुत्रेच प्रचंड प्रवाह्पात्र , हत्ती, जंगले ,ब्रह्मपुत्रेचा पात्राचा शून्य खर्च वाहतूक उपयोग ,चेरापुंजीचा जगप्रसिद्ध पाऊस या सर्वांचा उल्लेख ' वाहतुकीचे अर्थशास्त्र ' शिकवताना   आवर्जून व  वारंवार करीत असें.   
अशा या ईशान्य भारताच्या प्रवासाचा योग आला तो युथ होस्टेल च्या निमित्ताने  व मी ईशान्य भारताचे प्रवेश द्वार गुवाहाटी येथे पोहोचलो .आमचे मित्र युथ होस्टेलचे खंदे कार्यवीर रुपारेलचे  सहपाठी श्री वसंत घाडीगावकर  हे स्टेशन वर स्वागतास हजर होते.गुवाहाटी हे ईशान्य भारताचे एकमेव व शेवटचे शहर ,आसामचे राजधानीचे शहर,व ईशान्य भारताचे, सातबहिणी(seven sisters ) राज्यांचे, प्रवेशद्वार. या शहराच्या  चोफेर छोटे डोंगर आहेत ब्र्ह्मपुत्रेमुळे हे शहर दोन भागांत विभागलेले-वसलेले आहे कारण शहराच्या मधोमध ,कैलास लिंगातून उगम पावत असलेली,प्रचंड ब्रह्मपुत्रा वाहत आहे.भारत नद्यांचा देश आहे एकीकडे एकमेवाद्वितीय अशी स्वर्ग रोहिणी गंगा तर ब्र्ह्मपुरापन अद्वितीय आहे कारण ती एकच अशी आहे जी नदी नाही नदा आहे

गुवाहाटी हे धार्मिकता , संस्कृती,व्यापार,व्यवहार याचं सुंदर मिश्रण आहे.या पार्श्वभूमीवर येथील कामाख्या मंदिर हे प्रमुख आकर्षण आहे.हे मंदिर गुवाहाटी शहरापासून पांच किलो मीटर अंतरावर स्थित असलेल्या नीलाचल नावाच्या टेकडीवर वसलेले आहे व तेथून चौफेर  नजर टाकल्यास  गुवाहाटी शहराच  संपूर्ण दर्शन होते.
हे भारतखंडातील बावन्न शक्ती  पिठापैकी एक प्रमुख शक्ती पीठ आहे.दक्ष प्रजापतीच्या यज्ञात  मानहानी झाल्यामुळे शिवपत्नी सती हिने यज्ञ वेदितच  प्राण अर्पण केले (ज्यामुळे भारतात सतीची चाल सुरु झाली) त्यावेळी शिवशंकर तिचे पार्थिव धड  घेऊन विमनस्क मनस्थितीत  ऋषिकेश  येथील नीलकंठ पर्वतावर बसले असता त्या धडाचे बावन्न भाग भगवान विष्णुन्द्वारे ५२ ठिकाणी विख्ररवले गेले त्या ठिकाणी ५२ जागृत सती स्थाने -शक्तीपीठ म्हणून प्रसिद्ध आहेत. या बावन्न पीठांपैकी 
जवळ  जवळ  ३५  शाक्तीपिठांना भेट देऊन सेवा साधना  झाल्यावर  कामाख्या पिठाच्या दर्शनाचा योग आला होता म्हणून मन प्रफुल्लीत झाले होते .पण अजून परीक्षा संपली नव्हती गुवाहाटीला पोहचल्या दिवशी वेळ  काढून मंदिरात जाऊ असा विचार होता. पण वसंतरावांनी असाम ,अरुणाचलला जावयासाठी गाडी तयारच ठेवली होती व त्यांच्या शेडूलमध्ये    कामाख्या साठी वेळ नव्हता ते त्यांच्या प्रोग्राम मध्ये नाहीं असें त्यांनी सांगितले व जमल्यास परतीच्या वेळी बघू असें सांगितले .मी आसामच निमंत्रण फक्त काम्ख्यासाठीच स्वीकारले होते व तेंच यात नाहीं हे लक्षात आल्यावर वाईट वाटले. आसाम, तेजपूर, काझीरंगा अरुणाचल,तवांग,शिलॉंग चेरापुंजी इ. ठिकाणी निघालो .आठरा दिवसांनी परत गुवाहातीस संध्याकाळी पांच वाजता पोहोचलो ,९  वाजताची परतीची तिकीट होती ,मनात बेचैनी दाटून होती .गुवाहाटी च्या रस्त्यावर ट्राफिक जाम झाला होता .शेवटी  वसंत रावांना परवानगी घेऊन  मधूनच निघालो चालत काही अंतर कापून मग बसने  कामख्या दर्शनास निघालो अर्ध्या तासात पहाडावर  देवळात पोहोचलो.अशी सत्व परीक्षा देवून मासाहेबांच्या दरबारात हजार झालो.
ज्याज्या ठिकाणी जे सतीच्या शरीराचे भाग पडले त्या ठिकाणी त्या त्या अवयवांची पूजा होते. देवीचा  गुह्यांग  काठमांडू नेपाळ येथे ,गुह्येश्वरी, तर गुप्तांग गुवाहाटीच्या नीलाचल पहाडावर पडले.ते "कामाख्या" म्हणून अत्यंत  जागृत  व योनितंत्र पूजेसाठी महत्वाच अस स्थान आहे.गुवाहाटीच्या जनसामान्यांच अत्यंत जिव्हाळ्याचे श्रद्धास्थान आहे जेथे सतत भक्तांची, स्थानिक व प्रवासी ,वर्दळ असतें. अत्यंत गर्दीचे ठिकाण असूनही येथे एकदम शांत व प्रसन्न वाटते.  येथे  सतीचे गुप्तांग पडले म्हणून येथे गुप्तांगाची  पूजा होते. येथे  मूर्तीची पूजा होत नाहीं .कुरुक्षेत्रातील  शक्तीपीठात पायाची पूजा होते कारण येथे देवीचा पाय स्थापित  आहे ,नेपाळच्या काठमांडू येथे पीठ गुह्यासारखे  आहे व त्यातून मळ मुत्रा च्या वासाचे पाणी = तीर्थ प्रसारित होते. त्या गुह्य पिठाच पूजन होते.
कामाख्या पिठात पण मूर्ती नाहीं `देवळातील एका गुहे मध्ये एका दगडावर " योनी"च्या आकाराचं पीठ कोरले आहे ते स्वयंभू आहे. आत जाताच पवित्र  स्पंदने जाणवतात. गर्दी असूनही सर्व जण शांतपणे दगदग,कट कट न  करता  , न घुसता दर्शन लाभ घेताना दिसतात .गर्दी नसतानाही साधारण दोन तीन तास दर्शनास लागतात. गर्दीच्या  वेळी सहा तास पण लागतात. त्यातून सतत ओलावा पाझरत असतो. हे पीठ इतके जागृत व जिवंत आहे की या योनिपीठातून रज:स्वतेच्या   
ऋजूतेच्या खुणा दिसतात  . पीठ रजस्वला होते.आषाढ सप्तमी ते दशमी दरम्यान देवी रजस्वला,ऋजुता होते . देवीच्या योनिलींगातून रक्तस्त्राव होतो.  यावेळी येथे मोठा उत्सव होतो,प्रचंड उत्साह व गर्दी होते .या उत्सवास "अम्बुबाची" असें म्हणतात .या चार दिवसात देवी चे द्वार बंद असतें द्वादशीला मोठा मेळा भरतो . देवीच्या रजस्वाचा भिजलेला लाल कपडा बरकत म्हणून बाळगला जातो.(असेच एक  देवी पीठ केरळ येथील चेन्ग्नुर येथेपण आहे ती देवी मासिक स्त्राव करते  या देवळात पुरुष पुजारी नाहीत सर्व पूजन अर्चन स्त्रीयांद्वारेच होते पण हे शक्ती पीठ नाहीं )माझ्या भाग्याने मज जवळ एक इंच एवढा तो तुकडा आहे. अम्बुबाची उत्सव आषाढात येतो ज्याप्रमाणे   स्त्री तिच्या ऋतू नंतर जशी पुनश्च जननासाठी तयार होते तशीच जननिमाता  धर्तीदेवी -वसुंधरा पण जीवनान्न तयार करण्यास तयार असतें.या चार दिवसात शेती कामे,नांगरणी, पेरणी,ही बंद असतात .ब्राह्मण ,ब्रह्मचारी या दिवसात शिजवलेले अन्न खात  नाहीत.अम्बुबाची नंतर घरातील उपकरणे, भांडी, ,कपडे इ.  स्वच्छ  करतात.निर्मल करतात. व पूजोत्सव यांस सुरुवात होते.  या दिवशी कामाख्या दर्शन अत्यंत पवित्र मानले जाते. हजारोंच्या संखेने या दिवशी साधक ,भक्त देवीच्या दर्शनास येतात.
या व्यतिरिक्त हे पीठ तंत्रविद्या- तंत्र साधनेसाठी  अत्यंत  महत्वाचे व सिद्ध  मानले जाते. कदाचित सर्व शक्तीपीठांपैकी हे एकच शक्ती पीठ तंत्र  साधनेसाठी प्रसिद्ध असावे. इतर तंत्र पीठे जसे तारापीठ  इ.ही सिद्ध पीठे आहेत  अथवा दशमहाविद्या पीठे आहेत.सकाळी बारावाजेपर्यंत तंत्र साधकांची येथे गर्दी असतें या वेळी बळी पण दिला जातो.सकाळी पांच वाजता मंदिरात पूजा सुरु होते पण दर्शनासाठी  आठ वाजता द्वार खुले होते ,दुपारी १ वाजता भोग लागतो व संध्याकाळी पांच तीस ला दर्शन बंद होते त्यावेळी हजार असलेल्या सर्वांच्या दर्शना नंतर  पट  बंद होते.योगिनी तंत्रानुसार कामाख्या  ही तांत्रिक क्रिया ,अभ्यास ,व साधनेच अत्यंत महत्वाच केंद्र आहे.येथे तन्त्रिकान्चा समूह नेहमी  कार्यरत असतो .ये थे त्यांची साधना ,पूजा साधना सतत सुरु असतें. कधी गुप्तपणे तर कधी खुलेआम ही पूजा होते.
योगिनी तंत्र व कालिका पुराणानुसार येथेच देवीने नरकासुराचा वध   केला अशी नोंद आहे . म्हणूनही या देवीचे पीठ प्रसिद्ध आहे. अशी  आख्यायिका  आहे की नरकासुराने देवीशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली पण देवीने त्याला एक अट घातली की त्याने एका रात्रीत नीलाचल पहाडावर पायर्या बांधाव्या .त्याने ते आव्हान  स्वीकारले पण सकाळ व्हावयाच्या आत देवी ने एका कोंबड्या करवी  बांग  देववली म्हणून मग नरकासुराने आपली हार स्वीकारली .
कामाख्या देऊळ  पहिल्या शाताब्दीस बांधले गी ,ते दोनदा आक्रमणा द्वारे तोडले गेले .सध्याचे बांधकाम १५६५ चे आहे  त्याचा कळस मधमाश्यांच्या पोल्यासारखा आहे ,याची विभागणी तीन भागत आहे. पहिला भाग सहसा बळी  इ साठी वापरला जातो दुसर्या भागांत देवीची उत्सव मूर्ती आहे जी नंतर बसवली गेली. त्याच्या मागे गुहा असून तीमध्ये योनिलिंग आहे..
कामाख्या परिसरात इतर अनेक देवळे आहेत, दशमहाविद्या मंदिरे-तारा,घुमावती,भुवनेश्वरी,छिन्न  मस्तिका, शिवमंदिरे, विष्णू मंदिरे, कामाख्या तंर विद्यापीठ -आहेत. कामाख्या म्हणजे सर्व कामेच्छा पूर्ण करणारी काम म्हणजे पुनर्निर्मितीची देवी.म्हणून इथे भक्तांची , सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण करणारी  अशी कामाख्या ,सतत गर्दी असतें .म्हणूनच हे शाक्त  पूजेचे ,शाक्त  तंत्राच प्रमुख कार्यालय आहे. 
dr.sanjay honkalse.

Comments

  1. कामाख्ये कामसंपन्नै कामेश्वरी हरप्रिये
    कामनाम् देहि मे नित्यम् कामेश्वरी नमो:स्तुते 🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कृष्णसखा उद्धव

पितृशास्त्र भाग 10:"पितृपक्ष: निषिद्ध कार्य :चुकून नका करू हे  काम*

केल्याने देशाटन.......|