दिव्य व दैवी प्रेमाची रक्तलांछित भूमी: तेजपूर,The city of the blood. डॉक्टर संजय होनकळसे: "शिवंजय":drsanjayhonkalse@gmail.com
दिव्य व दैवी प्रेमाची रक्तलांछित भूमी: तेजपूर,The city of the blood.
डॉक्टर संजय होनकळसे: "शिवंजय":drsanjayhonkalse@ gmail.com
(हे 'रक्तलांछितपण' लादले गेले ते पांच हजार वर्षांपूर्वी कलियुगाला सुरुवात झाल्यावर.जेंव्हा कलियुगातील पहिले ऐतिहासिक प्रेम (First historical love story of moderntimes ) आणि पहिला प्रेम विवाह (First love marriage ) झाला .हा नुसता प्रेम विवाह नव्हता तर गुप्त प्रेम विवाह होता ज्यात वराने वधूस नव्हे तर वधूने वरांस पळवून विवाह केला होता.एवढाच नव्हे तर या विवाहाचा थेट संबंध येतो तो महाभारताचा खरा हिरो,युगंधर कृष्ण व कुटुंबाशी. या विवाहानिमित्ताने घनघोर युद्ध होऊन रक्ताचे पाट वाहिले गेले होते,म्हणून तेजपूरहे नाव पडले.)
ईशान्य भारताच्या भेटीत "काझीरंगा " राष्ट्रीय उद्यानात दोन दिवस जंगल सफारी केली.त्यानंतर आसाम-अरुणाचल सीमेला लागून असलेल्या आसामच्या सोनीतपूर जिल्ह्यातील "तेजपूर"ला जाण्याचा लाभ पदरी पडला. पूर्व हिमालयाच्या पायथ्याशी वसलेले सुंदर व तेवढीच सुंदर निगा राखली जाणारे शहर... तेजपूर!! ब्रह्मपुत्रेच्या उत्तर किनाऱ्यावर वसलेलं हे छोटं शहर अत्यंत देखणं आहे.ब्रह्मपुत्रेच्या पात्राची प्रचंडता दर्शवणारा तीन ते साडेतीन किलो मिटरचा पूल दक्षिणे कडून उत्तर किनाऱ्याला पोहचवतो ते थेट तेजपूरलाच. .
तेजपूरचे नाव प्रथम ऐकले ते १९६२ च्या भारत -चीन युद्धादरम्यान.या युद्धात चीन पार अरुणाचल प्रदेशच्या बॉमडिला पर्यंत घुसला होता."lunch at Bomdila ,and dinner at Tejpur" जेवण बोम्दिलास तर डिनर तेजपूरला"असा त्याचा नारा, catchword होता, म्हणजे चीन च्या हद्दीपासून ते ३५० की.मी आतपर्यंत भारतात पोहचले होते. कावेबाज व धूर्त चीन एकीकडे "हिंदी चीनी भाई भाई "असा नारा देत होते तर कमिन नदीच्या माध्यमातून ते तेजपूर पर्यंत (सध्याच्या बोडो जमातीच्या भागापर्यंत पोहचले तरीही नेहरूंना थांग लागला नाहीं.असें म्हणतात की, नेहरू तिबेट सारखंच या भागावरपण पाणी सोडण्यास तयार होते पण राजकीय दबावामुळे त्यांनी यशवंतरावांना संरक्षण खाते दिले. व वीस पंचवीस दिवसांच्या लांच्छनास्पद माघारी नंतर यशवंतराव चव्हाण यांचे संरक्षण मंत्री म्हणून नेमणूक झाली .सह्याद्री हिमालयाच्या हाकेला धावून गेला.चव्हाण यांना राष्ट्रीय पातळीवर नेतृत्वास वाव मिळून पंतप्रधान होण्याचे स्वप्न दिसू लागले.
आज हाच भाग बोडो आदिवासींचे आंदोलन व त्यांच्या बोडो भूमी च्या मागणीसाठी गाजत आहे.बोडो आंदोलनामुळे एक मात्र फार मोठा ,कदाचित चांगला फरक दिसतो तो म्हणजे आसाम ,अरुणाचल येथे कुठेही भय्ये,बिहारी जे सर्व भारतभर हातपाय पसरून, तेही दादागिरी करत आहेत ते येथे दिसत नाहीत .मुंबईत ज्यावेळी राहुल चा तमाशा चालला होता त्याच दरम्यान आसाम मध्ये घुसलेल्या काही बिहारींची मुंडकी छाटून पाठवली गेली होती त्याची फक्त एक छोटी बातमी ,काही गवगवा नाहीं, छपून आली होती.
हा तेजपूरचा ताजा इतिहास ."तेज" म्हणजे 'प्रकाश ,तळपणे' रक्तालाही " तेज " असें म्हणतात .तेज पुरला "सिटी ऑफ ब्लड" म्हंटले जाते;कारण येथे रक्ताचे पाट वाहिले गेले आहेत असा इतिहास सांगतो आणि म्हणूनच तेज= म्हणजे रक्ताळलेले ,रक्त लांच्च्छित शहर (पूर) ,तेजपूर हे नाव पडले. हे रक्त लांछित पण लागले गेले ते पांच हजार वर्षांपूर्वी कलियुगाला सुरुवात झाल्यावर.जेंव्हा कलियुगातील पाहिले ऐतिहासिक प्रेम (First historical love story of moderntimes ) आणि पहिला प्रेम विवाह (First love marriage ) झाले.हा नुसता प्रेम विवाह नव्हता तर गुप्त प्रेम विवाह होता ज्यात वराने वधूस नव्हे तर वधूने वरांस पळवून विवाह केला होता.एवढच नव्हे तर या विवाहाचा थेट संबंध येतो तो महाभारताचा खरा हिरो,युगंधर कृष्ण व त्याच्या कुटुंबाशी, या विवाहानिमित्ताने कृष्णाचे घनघोर युद्ध होऊन रक्ताचे पाट वाहिले गेले होते,म्हणून तेजपूरहे नाव पडले..
महाभारताच्या युद्धानंतर,धर्मराज युधिष्ठीर याचा नातू व अभिमन्यू उत्तरेचा मुलगा परीक्षित याचा राज्याभिषेक झाला .परीक्षित हा कलियुगाचा अधिष्ठाता , कलियुगाचा पहिला बळी ज्याने मरता मरता आधुनिक भारतावर अनन्य उपकार केला तो "भागवताच्या "ज्ञानगंगेचं गोमुख बनून. कारण; त्याच्यामुळे आणि त्याच्या माध्यमातून भागवत गंगा जगापुढे अवतीर्ण झाली ,फळली फुलली साक्षात देवत्व पाऊन राहिली.याच कलिच्या प्रभावाने आधुनिक युगातील पहिली लवस्टोरी, लव मरेज ते पण मुलीने मुलाला पळवून केलेले....
तर ती कथा अशी ....हिमालयाच्या या सर्व भागावर राज्य होते ते परमोच्च शिवभक्त बाणासुर याचे. येथे त्याने शंकराची भक्ती - तपस केले .शंकर प्रसन्न झाले तो भाग आज बाणासुर कैलास अथवा किन्नौर कैलास म्हणून सप्त कैलासांपैकी एक गणला जातो. या कैलासाच्या दर्शनाचा लाभ मला दोनदा झाला. त्याच प्रमाणे शिव शंकराचे महाभैरव रूपातील लिंगाची पूजन अर्चन पण नित्य नियमाने करीत असें.हे शिवलिंग आजही तेजपुरची शान आहे. हे महाभैरव लिंग येथील महाभैरव मंदिरात आहे ते लिंग भुवनेश्वर येथील प्रचंड मोठे शिवलीन्गासारखे आहे. आजही या मंदिरातील वातावरण भारलेले असें आहे.हे मंदिर फक्त भक्तांच्या दान दक्षिणेवर चालते,यांस कोणतेही सरकारी अनुदान नाहीं असें ठाकूर नावाच्या येथील पुजार्याने सांगितले.या परिसरातील नागरिकांमध्ये महाभैरावाबद्दल अतूट श्रद्धा आहे. या शिवलिंग पूजानाआधी बाणासुर गणेशाचे पूजन करीत असें. या गणेशाचे मंदिर ब्रह्मपुत्रेच्या गणेश घाटावर आहे , तेथे ही गणपतीची अत्यंत लाघवी व सुंदर ,जागृत मूर्ती आहे.
.अशा या बाणासुराला एक सुंदर व अत्यंत लाडकी अशी ऊषा नावाची गोड मुलगी होतीं.तो तिच्याबाबत अत्यंत हळवा व आसक्त होता.अशा या आपल्या मुलीस जगाच्या नजरेपासून दूर ठेवण्यासाठी त्याने येथे ब्रह्मपुत्रेच्या उत्तर किनार्यावर एक महाल बांधला होता तो सर्व सुख सोयींनी युक्त असा होता.ऊषास या महालाबाहेर जग नव्हत तिला हवं नको ते सर्व या महालातच उपलब्ध केलेले होत. या महालात ती व तिची एक आवडती व जवळची मैत्रीण चित्रलेखा दोघीच राहायच्या .या महालातून त्या बाहेर जाऊ शकत नव्हत्या व बाहेरून कुणी आत येवू जाऊ शकत नव्हते कारण या महालाभोवती एक अग्नीच आवरण-कुंपण होत. या महालास "अग्निगृह " नाव होते. ते आजही तेजपूरचे प्रमुख आकर्षण बिंदू आहे.
ऊषा अत्यंत सुंदर होती .जवानी आणि प्रेम कुणी रोखू शकत नाहीं.कितीही मह्पूस असली तरी ती आता जवान होऊ लागली होती प्रेमाचं पाखरू आता तिच्या ह्र्य्दायात घर करू लागल .बाह्य जगापासून दूर असली तरी अंतर जग भिरभिरत होते तिला एका अनाहूत सुंदर तरुणाचे स्वप्न सतत पडू लागले.तिला त्याची ओढ व आकर्षण वाटू लागले-प्रेमभावना वाटू लागली.पण तो कोण आहे हे तिला कळत नव्हते.अशावेळी तिची मैत्रीण चित्रलेखा तिच्या मदतीस धावून आली.तिच्यावर दैवी कृपा होती तिला कुणाचेही चित्र वर्णनानुसारकाढण्याची कला अवगत होती.(असें चित्रकार यांस गुन्हा अन्वेषण विभागात आजकाल अत्यंत मागणी आहे.तो एक उत्तम व्यवसाय आहे.त्याची सुरुवातीची निंव चित्रलेखाने घातली.)पण याच बरोबर ज्याचे चित्र काढले त्याल ओळखण्याची व त्याबद्दल सारी माहिती समजण्याची कला पण तिला अवगत होती..म्हणजे तिचा मेंदू हा एक रेकोर्ड ब्युरोचं (record bureau ) होता .चित्रलेखाने उषाने केलेल्या वर्णनावरूनत्या स्वप्नप्रेमीचे चित्र काढले व आपल्या जादुई शक्तीने ओळखले.की तो श्रीकृष्णाचा नातू अनिरुद्ध आहे.त्याल मग तिने आपल्या जादुई शक्तीने kidnap केले व अग्निगृहात आणले.
मग काय येथे ऊषा व अनिरुद्ध याचे प्रेम बहरले ,फळले.शृंगार सुरु झाला अशा रितीने ऊषा अनिरुद्ध ही कलियुगातील पहिली romantic जोडी ठरली.त्यांनी मग अग्नी गृहातच गंधर्व विवाह -प्रेम विवाह कलियुगातील पहिला प्रेम विवाह केला.
पण कितीही गुप्त राखले तरी प्रेमाचा सुगंध बाहेर पसरतोच .कालांतराने बाणासुराच्या लक्षात हे प्रकरण आलेच त्याने अन्निरुद्धास बंदी बनवले.कालांतराने श्रीकृष्णाच्या लक्षात आले .अनिरुद्धला सोडवण्यासाठी ब्राह्मपुत्रेतीरी प्रस्थान केले.बनसुराशी युद्ध सुरु केले.बाणासुर परमप्रिय शंकरभक्त असल्याने शंकराचे सहाय्य
लाभले.त्यामुळे ती भूमी हरिहर युद्धभूमी झाली.रणकंदन माजले.,रक्ताचे पाट वाहिले गेले त्यामुळे त्यामुळे ही भूमी - तेजपूर- रक्त लांछित भूमी म्हणून ओळखली जाऊ लागली म्हणून यांस सोनितपूर-तेजपूर city of blood -नाव पडले.
युद्ध फार काल चालले.कालांतराने बनसुरास जाणवले की अनिरुद्ध हाच उशासाठी योग्य वर आहे . मग त्याने त्यांचा विवाह लाऊन दिला हा विवाह उत्तराखंड येथील गुप्तकाशी जवळील उखीमठ (ऊषा मठ )येथे पार पडला याच मठात भगवान केदार्नाथांची शित्कालीन गाडी सहा महिने असतें.
असें हे तेजपूर जिथे महाभारत्काल्पासून आजपर्यंत अस्थिरतेने ग्रासले आहे.तरीपण येथील वातावरण शांत,प्रसन्न,मोहमयी आहे.नागर्व्यावास्थापन माणसे चांगली आहेत.कारण कदाचित एवढे होऊनही या भूमीस श्रीगणेशाचे व श्री महाभैरव शंकराचे आशीर्वाद व कृपा असावी.
dr.sanjay honkalse.
डॉक्टर संजय होनकळसे: "शिवंजय":drsanjayhonkalse@

Comments
Post a Comment