गुप्त नवरात्री:$@π√∆¥ #

अगस्तै नमः। कृन्वंतो विश्वम् आर्यम्।।
गुप्त नवरात्री:$@π√∆¥ #
drsanjayhonkalse@gmail.com
drsanjayhonkalse.blogspot.com
सध्या गुप्त नवरात्र सेवा ,उपासना व उत्सव सुरु आहे .व आध्यात्मिक ऊर्जा,उन्नतीसाठी मिळवण्यासाठी अनेक उपासक  आपली साधना आपापल्या परीने करीत आहेत .पण सामान्य भक्त ,उपासक आजचे आधुनिक अर्जुन या बाबत  अनभिज्ञ आहे . साधारण मानव जो आजकल प्रकट नवरात्रही एक  मनोरंजन म्हणून पाहतो  त्याला गुप्त नवरात्र म्हणजे काय याचा विचारही शिवणार नाही .
मी सध्या गुप्त नवरात्री निमित्त  नव चंडी याग सेवा व कुंडलिनी स्वाहाकार  वेदसंपन्न अशा वेदमूर्तींकरवी जसे वेद शास्त्री  विवेकशास्त्री  गोडबोले ,व ओंकारेश्वरचे  पंडित सुरेशजी कौशिक व गोवा येथील विद्वत  मूर्तिंकरवी केला व वेदमूर्ती  विवेक शास्त्रीचा याग व कुंडलिनी स्वाहाकार लाईव्ह टेली कास्ट केला तेंव्हा काही जणांनी विचारणा केली म्हणून हा गुप्त नवरात्री वर लेख प्रपंच करीत आहे .
आपण साधारण पणे  दोन नवरात्री एक अश्विन नवरात्री व दुसरी चैत्र नवरात्री साजऱ्या करतो ,पाळतो व साधना करतो . या दोन नवरात्रीना प्रकट नवरात्री म्हणतात, खुल्या वा ओपन नवरात्री  व  या शाक्त  उपासना  कित्येक जण करतात .होम हवन यद्न्य,देवी पाठ ,नवचंडी ,शतचंडी  ,सहस्त्र चंडी ,नव विधा भक्ती ,नवदुर्गा  सेवा उपासना जागो जागी केली, करवली जाते. व प्रकट पणे केली जाते म्हणजे त्याचा प्रकट  उल्लेख , आमंत्रण , निमंत्रण उत्सव साजरा केला जातो  .तसेच  या दिवसात जे प्रकट शत्रू  जसे चंड मुंड ,रक्तबीज ,शुंभ निशुंभ यांचा वध देवी महाकाली ,महालक्ष्मी व महासरस्वती करवी  केला तसा आपले  जे खुले शत्रू आहेत त्यांचाही नाश देवीने करावा व आपली आर्थिक ,भौक्तिक ,अध्यात्मिक इ उन्नती व्हावी म्हणून  ही उपासना शक्ती उपासना केली जाते व करावी .कारण शक्ती शिवाय शिव हा शव असून 'इ'कारात्मक  हि त्या शवाची शक्ती त्यास शिव बनवते ,कल्याणकारी बनवते .जसे एखाद्या ठिकाणी सर्व वायरिंग आहे पण वीज नाही तर प्रकाश ,अग्नी ,थंडावा ,हवा होऊ शकणे कठीण तसे हे आहे .म्हणून शिव शक्ती उपासना महत्वाची . या बाबत शंकराचार्यांच्या अनुभव हि लक्षांत घेण्या सारखा आहे. तेही सुरुवातीस फक्त  शिव उपासना करीत  पण त्यांच्या अध्यात्म प्रवासात ते केदारनाथ मार्गवरील श्रीनगर येथील एका छोट्या टापूवर जो  अलकनंदा नदीत स्थित आहे ,आजही आहे,त्यावर ध्यानस्थ  बसता त्याना दोन प्रेरणा झाल्या एक श्रीयंत्र शोध व दुसरा शक्ती शिवाय शिव उपासना  fruitless आहे हि जाणीव  व हे उमजून त्यांनी तेथेच देवी अपराध क्षमापन स्तोत्र रचले.
तर अशा या शक्तीची उपासना 4 वेळा नवरात्र स्वरूपात होते .अश्विन नवरात्र जी अश्विन शुक्लपक्ष येते ,दुसरी चैत्र नवरात्री चैत्र शुक्ल पक्ष दरम्यान येते .या दोन नवरात्री प्रकट ,व प्रत्यक्ष नवरात्री म्हणून ओळखल्या जातात .त्या भौक्तिक प्रगती ,उन्नती धन विद्या यासाठी साजऱ्या होतात.
पण याव्यतिरिक्त आणखी दोन नवरात्री एक पौष महिन्यातील शाकंभरी नवरात्री  व आषाढतील नावरात्री या अप्रगट ,अप्रत्यक्ष व गुप्त नवरात्री म्हणून मान्यता पाऊन आहेत .
या नवरात्रीठी घट स्थापना,नव दुर्गा पूजन करतात परंतु या दरम्यान केलेली सेवा ,साधना  याचा गाजा वाजा करीत नाही ,ती साधना अप्रत्यक्ष असते ,अप्रगट व गुप्त असते.
दुसरे असे की या काळी दशमहाविद्या देवीची साधना होते ,दश महाविद्या या शक्तीच्या उपदेवता आहेत  ,त्याची उपा सना हि आध्यत्मिक उन्नतीसाठी उपयुक्त असते.हा शक्ती उपासनेचा जलद मार्ग ,शॉर्ट कट आहे..

धर्मग्रंथानुसार  विश्वामित्र आणि ऋषी वशिष्ठ यांनी दहा महाविद्या सिद्ध करण्यासाठी बरेच प्रयत्न केले पण ते यशस्वी झाले नाहीत. विश्वामित्र गुप्त नवरात्रात दहा महाविद्यांचा अभ्यास करून अद्भुत सामर्थ्यांचा स्वामी झाला, त्याच्या सिद्धींच्या सामर्थ्याने अंदाज लावता येतो की त्याने अगदी नवीन जग निर्माण केले आहे.तसेच, लंकापती रावणाचा पुत्र मेघनाद यांना अतुलनीय सामर्थ्य होते. हे साध्य करण्यासाठी शुक्राचार्य यांनी मेघनादला सल्ला दिला होता की गुप्त नवरात्रामध्ये आपल्या कुटूंबातील देवी निकुमबालाची उपासना केल्यास तो त्यांना अजिंक्य ठरणाऱ्या शक्तींचा स्वामी बनू शकतो.मेघनादनेही तेच केले आणि राम, रावणाची शक्ती प्राप्त केली. युद्ध, केवळ मेघनादांनी भगवान राम यांना लक्ष्मणजींसह नागपश्यात बांधून मृत्यूच्या दाराशी बांधले होते, असे मानले जाते की उपहासांमुळे जरी एखादा नास्तिक मंत्र साधना करत असेल तर त्याचे फळ मिळालेच पाहिजे यश स्वरूपात.  हे या नवरात्रीचे वैभव आहे, जर तुम्हाला मंत्र साधना, शक्ती साधना करायचे असेल आणि कामाशी संबंधित गुंतागुंत झाल्यामुळे तुम्ही साधनाचे नियम पाळण्यास असमर्थ असाल  व साधना सातत्य ठेवता येत नसेल तर तर ही गुप्त नवरात्र वेळ तुमच्यासाठी आईच्या आशीर्वादाने योग्य होईल. आवश्यक किमान नियमांचे पालन करून मातृशक्तीची मंत्र साधना  गुप्त नवरात्रीची साधना सर्व मनोकामना पूर्ण करते.

अर्थात या दिनी शक्ती उपासना  व्रत ,विधी ,वैकल्य नेहमीसारखीच करतात पण केली साधना हि गुप्त रीत्या केली जाते ,गाजा वाजा करीत नाहीत .आणखी एक म्हणजे या नवरात्री अघोरी  ,उपासना ,काळी जादू  इ उपासना करतात .
सर्वात महत्वाचं म्हणजे हितशत्रू ,अप्रगट शत्रू अंतर्गत शत्रू नाश यासाठी हि नवरात्र साधना खूप महत्त्वाची असते 
या उपर या गुप्त नवरात्री साधना शीघ्र फलदायी होतात दुसऱ्या शब्दात  देश हितार्थ व स्व हितार्थ जे गुप्त शत्रू जसे आपल्याकडे  काश्मीर,बंगाल व इतरत्र गुप्त कारवाया चालतात ,आंतरराष्ट्रीय कट कारस्थान चालतात ,व चीन पाकच्या हरकती होतात त्यावर मोदीजी जे शक्ती उपासक आहेत  गप्प राहून  उपाय करतात व आपले intangible अदृश्य शत्रू जसे षडविकार ,व गुप्त शत्रू यांच्यावरील उपाय साठी या नवरात्रीतील साधना फलदायी होते.चाणक्य नीती ,कृष्ण नीती ,शिवाजी ची नीती हेंच दाखवते.कारण गुप्त शत्रूंचा नाश गुप्तपणेच ,गाजा वाजा नकरता  करतात .शिवाजी व कृष्ण यांचा इतिहास पहा ते कधीही कुठच्याही घटनेस त्वरित react झालेले दिसत नाहीत ,त्यांनी आयुष्य भर फक्त ऍकॅशन घेतली ,आपला स्टन्स व स्टँड घेतला कृतीद्वारे , गाजावाजा, गवगवा न करता.मोदीजी जर पाहिले तर ते कितीही उक्सवले ,चिडवले ,शिव्या दिल्या तर गप्प बसतात ,काही हि react करीत नाहीत पण वेळ येताच कृती करतात .आपले सचिन तेंडुलकारही तेंच करित राहिले ते आपल्या बॅटनेच , शब्द , राग द्वेष याने नव्हे ,उत्तर देत राहिले.हे साध्य होते गुप्त नवरात्र साधनेने .

मग सर्वात मोठा प्रश्न पडतो ,जो सहसा कुणाला पडणार नाही तो असा की  या दोन नवरात्री पौष व आषाढातच का साजऱ्या होतात ,चैत्र व अश्विनने या का नाहीत गुप्त.त्याचे कारण आहे "संधी काळ"व आपल्या सिद्ध मुनी  व सनातन  धर्म किती शास्त्रोक्त व स्वयंपूर्ण ,सार्वत्रिक, व सर्व परिणामकारक  व सनातन ( हिंदू धर्म is Scientific, Composite n Comprehensive ,Omni present, omnipotent,n Omniscient :$@π√∆¥ #.©®)
आपल्याकडे संधिकाल twilight zone  फार मोलाचा  व पवित्र मानला जातो म्हणून लग्न मुहूर्त ,मुंज ,साधना व संध्या (त्रिकाल संध्या )या काळी करणे अत्यन्त फलदायी व युक्त असते  तसेच ऋतू संध्या हि असते सहसा आपण चैत्र वैशाख जेष्ठ ग्रीष्म ,आषाढ श्रावण भाद्रपद ,वर्षा तर नंतर शरद शिशिर हेमंत व वसंत असे पाहतो,तसेच राशी व वा सूर्यभ्रमणानूसार  पाहू शकतो जसे मकर संक्रांतीस  हेमंत ऋतू ,मेष व वृषभ ला ग्रीष्म ऋतू व आषाढ भाद्रपद ला वर्षा ऋतू म्हणजे संक्रांत काळ हा संधी काळ होय व या काळात वातावरणात व ऋतू मानात अनेक स्थूल सूक्ष्म फरक होतात.आजार ,अनारोग्य,होऊ शकते ,छुपे शत्रू active होतात  सर्दी ताप खोकला विविध आजार ,साथीचे आजार बळावतात,इव्हन पहा  जान फेब ,मार्च एप्रिल जुलै ऑगस्ट आपल्या सीमेवर कारवाया सुरु होतात.तर हा संक्रमण काळ संधिकाल असतो.असे बारा संधी संक्रमण काळ आहेत पण मकर संक्रमण ,जानेवारी व कर्क संक्रमण आषाढ ,म्हणजे जुलै हे अत्यंत परिणामकारक ,असतात व घातकही हि असतात ,व यांचं संक्रमणात दैवी शक्ती कार्यरत असतात म्हणून दुष्ट निर्दालन व स्व उन्नती ,आरोग्य ,धन संपत्ती ,साधना ,विविध गरज जसे लग्न ,संतती,धन ,अध्यात्म यासाठी हा काळ अत्यन्त उपयुक्त असतो व याकाली केलेली पूजा अर्चना  साधना सेवा शिघ्र फलदायी असते  व आपली साधना सेवा खंडित होऊ नये ,कुणाची नजर लागू नये किंवा त्याच्या गतीत खंड पडू नये म्हणू न हि साधना ,शक्ती सेवा गुप्त पणे करतात.म्हणून या साधनेस व उत्सवास गुप्त नवरात्र उत्सव म्हणतात .म्हणून मनोभावे शांतपणे  उत्सव व साधना सेवा  भगवती चरणी रुजू करावी म्हणून मी पण 
हि सेवा ठेवली व कोरोना कृपा lockdown म्हणून ती सार्वत्रिक net द्वारे कित्येकांना पर्यंत पोहोचली अन्यथा मी नेहमी पोस्ट टाकून invite देतो व सर्व जण येऊ शकत नाही.तर नवीन नारायण नारायणी वाचकास हि लिंक पुन्हा देत आहे 
https://youtu.be/aGDVXN62E34
या लेखातील माहिती हि वाचन ,मनन ,अनुभव ,बरीचशी प्रेरणा ,वेदमूर्ती वेदपाठी आचार्य यांच्याशी चर्चा  यावर आधारित आहे
यातील/ सामग्री / गणनाची  ही माहिती विविध माध्यमे / ज्योतिषी / पंचांग / प्रवचन / विश्वास / शास्त्रवचने गोळा करून आपल्यापर्यंत आणली गेली आहे.  आमचा हेतू फक्त माहिती पोहोचविणे व आपला धर्म किती व कसा संमृद्ध  व शास्त्रोक्त  व सार्वत्रिक आहे हे दाखवणे आहे वापरकर्त्यांनी ती केवळ माहिती म्हणून घ्यावी.  याव्यतिरिक्त, त्याचा उपयोग वापरकर्त्याची स्वतःची जबाबदारी असेल.  पण प्रस्तुत लेखकाचा श्री शिवंजय संजय। $#¡v@π√∆¥ dr $@π√∆¥© यांचा अनुभव सांगतो की selfless ,निष्काम व सदुपयोगासाठी सेवा ,साधना ,अघोरी पद्धतीच्या मागे न लागता केलेली,नक्की फायदाच व उन्नती घडवून आणते
https://m.facebook.com/story.php?story_fbid=4778355442180095&id=100000170606055http://shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com/2021/07/blog-post.html
http://shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com/2021/07/blog-post.html
$@π√∆¥ #

http://shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com/2021/07/blog-post.html

https://youtu.be/aGDVXN62E34

Comments

Popular posts from this blog

कृष्णसखा उद्धव

पितृशास्त्र भाग 10:"पितृपक्ष: निषिद्ध कार्य :चुकून नका करू हे  काम*

केल्याने देशाटन.......|