अवघड नाथ दादा बापट गिरनारी:चैतन्य मूर्ती "तपोवनकार":एक विभूती दिलदार ।दैवीअनुभूतीचा मिरासदार।।
अगस्तै नमः।कृन्वंतो विश्वम् आर्यम्।
अवघड नाथ दादा बापट गिरनारी:
चैतन्य मूर्ती "तपोवनकार":
एक विभूती दिलदार ।
दैवीअनुभूतीचा मिरासदार।।
भाग 1©
"$#¡v@π√∆¥" dr. $@π√∆¥ #●πk@£$€
drsanjayhonkalse@gmail.com
एक लायक मुलाची लायक आई मंदिराजवळ भीक मागताना पाहून एका संताने तिला विचारले की तुझा मुलगा परदेशस्थ श्रीमंतआहे तो तुम्हाला काही पाठवत नाही का ?? *
खरं तर तिचा मुलगा दर महिन्यास तिला 50 हजाराचा बँक draft पाठवीत असे पण अज्ञानामुळे तिने असे 60 draft रंगीत चित्र समजून बाजूस ठेवले होते.अज्ञानवश तिला तिच्याकडे किती मौल्यवान मत्ता आहे हे माहित नव्हते. संताने तिला त्याचे मूल्य समजावून सांगितले. *
* आपल्या हिंदूंची परिस्थितीही त्या वृद्ध आईसारखीच "तूझं आहे तुज पाशी परी तू जागा चुकलाशी "अशी कस्तुरीमृगासम आहे.
आपल्याकडे शास्त्रोक्त,सार्वत्रिक,सर्व समावेशक धर्म व धर्मग्रंथ आहेत पण आपण फक्त ती घरात ठेऊन आहोत त्या आजी सारखी ज्याचा वास्तविक फायदा चिंतन व अज्ञाना अभावी घेत नाही.
दुर्दैवाने Nehruvian philosophy,पहिले तीन अयोग्य शिक्षणमंत्री,आंधांग्ळेले पाश्चातिकरण(Blinded WesternIzati on)जबाबदार आहे
आपल्या शास्त्रांचे शास्त्रज्ञान समजावे म्हणू न काही उच्च विचारी जन प्रयत्न करत आहेत,मी स्वतः Universal व Scientific Hinduism या शिर्षकाखाली लिखाण व अनेक यात्रावर लिखाण आपल्या धर्म व सणांचे वैज्ञानिकत्व समजावे म्हणून करत असतो कि त्यांचे अनुसरण व्हावे!
असेंच प्रयत्न एक संत आहेत तन ,मन धन भावे जीव ओतून करतात ज्यांना मी गेली 5 वर्षे ओळ्खतोय.
To be is to be RELATED या न्यायाने मी त्यांच्याशी RELATE झालो कारण तेही माझ्या सारखेच कट्टर हिंदुत्वाचा प्रेमपूर्वक, तार्किक,विज्ञानिष्ठभावाने व स्वकष्टार्जित तन मन धन भावे तळमळीने प्रचार करतात व तेही उच्च विद्या विभूषित आहेत .अर्थात पोहोच,कार्य,अनुभव,अनुभूती व अधिकार याबाबत ते श्रेष्ठ व सिद्धआहेत.
हे कळण्यासाठी त्यांचा विलक्षण ,विचक्षण आश्चर्यपूर्ण आयुष्यपट थोडक्यात पाहणे उचित होईल.
असे हे संत आहेत श्री दयानाथ बापट जे आज अध्यात्म विश्वात पीर योगी अवघडनाथ म्हणून प्रचुर आहेत.
दादांचा जन्म माघ पौर्णिमा शनिवार 5 फेब 1966 ले सांगली जिल्ह्यातील मिरज येथील ,त्यांचे वडील मिरजेत सुप्रसिद्ध वकील होते.
उपजतच त्यांना देव व दैवी जगताबद्दल आकर्षण व आस्था होती कारण यांच्या घराण्यालाच आध्यत्मिक वारसा लाभला आहे .वर त्यात दयानाथजींचा जन्म हा कोल्हापूरचे कृष्ण सरस्वती महाराज यांच्या आशिर्वादानेच झाला .यांच्या मातोश्रींनी कुंभारस्वामी कृष्णसरस्वती कडे मुलगा व्हावा म्हणून प्रार्थना केली होती. अध्यात्म हे जीन मध्येच/रक्तातच असल्यानेच त्यांचे सतत सांगलीच्या गणपती मंदिरात व मिरज जवळील दंडोबाच्या निसर्च्छादित
दांडीबाच्या देवळातील गुफेत उठ बस असे. या दंडोबा जागृत शिव मंदिरात ते अर्चना ,आराधना करीत असत.
अशातच वयाच्या अवघ्या सहाव्व्या वर्षी त्यांची जीवननाळ नाथसंप्रदायाशी जुळली गेली ती कोल्हापूर येथे माधव नाथ दादा गुरु यांच्या निमित्ताने .माधवनाथ सरकार यांनी त्यांच्यातील अध्यात्मिक ऊर्जा ओळखली व आशीर्वाद देत म्हणाले की हा पुढे जाऊन दत्त संप्रदायाची सेवा करेल जे आज तंतोतांत खरे ठरले आहे.
आणि खरोखरच या नंतर त्यांची वैराग्य वृत्ती वाढीस लागली.ते मिरज सांगली जवळील खरसिंग येथील दंडोबाच्या अलौकिक व व निसर्गरम्य प्राकृतिक गुफेत असलेल्या दंडोबाच्या शिव गुफेत जाऊ लागले व तेही रात्री 1 ते 3 च्या दरम्यान.त्या काळी म्हणजे 1972- 73 ला मातीचा रास्ता होता .त्या प्राकृतिक गुफेत त्यांना अनेक उत्तम अनुभव व अनुभूती आल्या .(आता या दंडोबा येथे गेल्या वर्षी इतर अनेक गुप्त गुफा मिळवितात कि जिथे आंत जाणे मुश्किल होते .स्थानिक काही जणच इथे आत गेलेत व तेथे हि त्यांना शिव लिंग सापडलीत. या सर्वामुळे त्याची विरक्ती व वैराग्य वृत्ती वाढीस गेली, इतकी कि वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी त्यांना संन्यस्त जगाची ओढ लागली . त्यांच्या घराण्यात सातपिढयांपूर्वी पूर्वजांनी संन्यास घेऊन रामतीर्थ येथे समाधी घेतली होती. पण जे एकनाथ महाराज ,वा क्रिया योगी लाहिरी लाहिरी महाशय व आधुनिक जगात भारतातील विद्यमान पंत प्रधान श्री नरेंद्र मोदी यांना जसे सांगण्यात आले ( महावतार बाबाजीने मार्फत लहरीजीना व मोदींना दैवी संकेताद्वारे जसे सांगण्यात आले की तुमचे संसारातील काम कार्य हे संन्यास न घेता करायचंय तसेच युवा दयानाथ यांना स्पष्ट सांगण्यात आले.व हे सांगणारे हि दुसरे तिसरे कुणी नाही तर ज्ञानगंजशी संबंध असणारे धारवाड तपोवन येथील श्री महातपस्वी कुमारस्वामी यांच्या मुखातून.
(विषयांतराचा धोका पत्करून " शिवंजय" डॉ संजय होनकळसे मी येथे धारिष्ट्य दाखवून नमूद करू इच्छितो की ज्ञान गंज हि चवथ्या ते नवव्या आयामतील अद्भुत ,अदृश्य, -भूमी नव्हे,-. जग आहे .हि भूमी नाही कारण याला कुठलेही भौगोलिक व physical अस्तित्व नाही व यास सिद्धाश्रम असेही संबोधले जाते ,येथे अनेकानेक उच्च कोटीचे अति मानवी जीव ज्यास सिद्ध म्हणतात ते कार्यरत असंतात. यांचं जीवन कार्य हे विश्वनाथाने निर्मिलेल्या
विश्वाचे ,सृष्टीचे नियमन नियंत्रणाचे कार्य करतात .सदगुरुकृपे मला लेखणी बनवून त्याच विश्वनाथाने या विषयावर 'सिद्ध व सिद्धाश्रम ' हा ग्रंथ लिहवून घेतला आहे जो 2019 साली चार जुलैच्या गुरुपुष्य योगावर इंदोरच्या नाना महाराज तराणेकरांच्या आश्रमात प्रसिद्ध करवला गेला .(पहा :
https://m.facebook. com/story.php?story_fbid= 3776054212410228&id=100000170606055)
या ग्रंथात एक पूर्ण प्रकरण धारवाडच्या कुमारस्वामींवर आहे जे ज्ञान गंज मधून 3 म्मानवी जन्म घेण्यासाठी इथे जन्मले , कुमारस्वामी हा त्यांचा दुसरा जन्म ज्यात ते तत्वज्ञानाचे प्राध्यापक होते ,यांचा सुंदर आश्रम तपोवन धारवाड येथे आहे जिथें तीनचार वेळा जायचे भाग्य मला लाभले.) अशा या ज्ञानगंज संबंधित सिद्धानि युवा दयानाथ याना संन्यास धर्मापासून परावृत्त केले व सांगितले की" तुझे संसार कार्य बाकी आहे ,त्यामुळे तुझा संन्यस्त होण्याचा विचार हा चुकीचा आहे ,तसं केलेस तर तू ना घरचा ना बाहेरचा होशील. तुला समाज व देव धर्म हा संसार करूनच करायचा आहे.ते केल्याने जे तुला जे प्राप्त होईल ते ना एखाद्या साधूच्या ,ना गृहस्थाच्या नशिबात असेल."हे समजून घेणे दादां ना सुरवातीस जड गेलं पण हळू हळू संन्यास जीवनाचा विचार त्यांनी सोडून दिला व सामान्य मानवासारखे आपले उच्च शिक्षण पूर्ण केले.
वाचा
भाग 2
संन्यस्त संसारी दादा अवघडनाथ.:
"$#¡v@π√∆¥"dr $@π√∆¥
https://m.facebook.com/story.php?story_fbid=4404966256185684&id=100000170606055
भाग 2 लिंक
https://m.facebook.com/story.php?story_fbid=4407274282621548&id=100000170606055
Comments
Post a Comment