काला डुंगर : दत्त चारधाम पैकी एक :

औम अगस्तै नमः।कृन्वंतो विश्वम् आर्यम्।।
                शिवसंकल्पमस्तु।
काला डुंगर : दत्त चारधाम पैकी एक :
'शिवंजय':डॉ संजय होनकळसे
(अवघड नाथ श्री दादा बापट व त्यांच्या अध्यात्मार्धाअंगीनी smt स्वाती बापट याना समर्पित )
दत्तराज पाहुनी आज तुष्टलो मनी !
औदुंबरी नित्य वसे, भक्‍तकाम पुरवितसे !
कमलनयन श्याम दिसे, धन्य तो जनी !
अनसूया ज्याची माय, दृढ धरिले ज्याचे पाय !
त्याचे चरित वर्णू काय, सकळ तो जनी !
विनायक दास दीन, जळाविणा जैसा मीन !
ब्रम्हा-विष्णु-महेश तीन आठवी मनी .

आजकाल दत्तधाम सहलींचं बरेच कार्यक्रम होतात . काही जण व्यवसाय म्हणून तर काही सेवा म्हणून या दत्त धामांच्या यात्रा काढतात,तर काही जण स्वतः च आपल्यापल्या परीने दत्त धाम यात्रा करतात ,काही माझ्यासारखे स्वतः बरोबर येईल त्याला नेतात ,तर काही  आमचे गिरणारीकाका, आमचे गुरुभाई, कैलास कुलकर्णी व शम्भूनाथ महाराज आपल्याबरोबर इतरांचीहि सेवा करवून घेतात ,तरी काही महाभाग सेवा म्हणून यात्रा काढतात पण सेवा न देता मेवाच कमवण्याकडे कलतात.तर काही commercially यात्रा काढतात
पण यासर्व स्थानात गिरनार वगळता कालियुगीन दत्तास्थानांचीच ,म्हणजे कुरव पूर ,पिठापूर,गाणगापूर, मंथनगढ, वाडी अशी स्थानेच करतात. 
हि सारी  कलियुगीन दत्तअवतार, अंशा वतार व दत्तअवतारी संतांची स्थाने आहेत.
अलबत हि स्थाने शक्तीस्थळेच आहेत हे वादातीतच आहे ,तसे अनुभवही अनेक दत्त भक्त घेतात ,काहींना अनुभूतीही लाभते.

पण दत्त अवतार हा सत्ययुगीन असून कालियुगातही त्यांचा प्रभाव आहे 
 दत्तावताराचे स्वरुप :

श्रीदत्त अवताराचा आणि श्रीदत्तात्रेय देवतेचा उद्भव, उगम आणि प्रवास अद्भुत आहे. पहिल्या स्वायंभुव मनूपासून श्रीदत्तात्रेयांचा आविर्भावकाल असून इसवी सनापूर्वी हजारो वर्षांपासून सत्य युगीन श्रीदत्त अवताराचे चिरंतन अस्तित्व आहे असे मानले जाते. या कालावधीमध्ये श्रीदत्त संप्रदायामध्ये अनेक पंथ आणि परंपरा निर्माण झाल्या आहेत. त्यांना श्रीदत्त संप्रदायाचे उपसंप्रदाय असेही म्हणता येईल. यातील सर्व परंपरांमध्ये श्रीदत्तात्रेय हे मुख्य दैवत, उपास्य दैवत, सद्गुरुरूप, सिद्धिदाता, अष्टांग योग मार्गदर्शक आहेत. श्रीदत्तात्रेय अवतार हा उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही स्थितींचा निर्देशक आहे. तसेच तो त्रिगुणात्मक म्हणजे सत्त्व, रज आणि तम या तिन्ही गुणांनी युक्त आहे. म्हणूनच ‘त्रिगुणात्मक त्रिमूर्ती श्रीदत्त’ असे म्हटलेले आहे. निर्गुण आणि निराकार अशा ब्रह्म तत्त्वाची अनुभूती जो करून देतो तो गुरू. अशा गुरूचांही जो गुरू तो श्रीदत्त गुरू. संपूर्ण विश्वाचे गुरूपद श्रीदत्तात्रेयांना बहाल केले गेले आहे. गुरू हा कैवल्याची मूर्ती, मूर्तिमंत ज्ञान आणि सच्चिदानंद रूप असतो. श्रीदत्त संप्रदायामध्ये त्यागाला सर्वोच्च प्राधान्य आहे. सज्जनांचे रक्षण, दुर्जनांचे निर्दालन, धर्माचे पुनरुज्जीवन, सामाजिक संतुलन आणि विश्वाचे कल्याण यासाठी परमात्मा अवतार घेतो. परमात्म्याचे आत्म्याशी असलेले एकत्व, अविनाशी गुरुतत्त्व आणि अपरोक्ष अनुभूती हे दत्त संप्रदायाचे प्रमुख वैशिष्टय़ आहे. ऐहिक आणि पारमार्थिक सर्व प्रकारच्या प्रगती साठी उपास्य दैवत आणि नित्य अवतार म्हणजे श्रीदत्तात्रेय अवतार हा आहे. दत्त संप्रदाय हा सर्वात प्राचीन, लोकाभिमुख, समन्वयात्मक आणि सर्वाना सामावून घेणारा असा संप्रदाय आहे. तसेच नवनवीन संतांमुळे नित्य नूतन आणि प्रवाही राहिला आहे. दत्त संप्रदाय सर्वाना जवळचा वाटतो. कारण यात प्रपंच, परमार्थ आणि मुक्तीचा यथायोग्य मेळ घातला गेला आहे. प्रापंचिक उन्नती, त्याचबरोबर साधना, उपासना, अनुष्ठाने याद्वारा शारीरिक, मानसिक, भौतिक, कौटुंबिक प्रगती यांची एकत्रित उपाययोजना माणसाला मोक्षाच्या पायवाटेवर अलगद पुढे घेऊन जाते. दत्त संप्रदाय शैव, वैष्णव याचबरोबर शाक्त, गाणपत्य, इ. सर्व पंथांना जवळचा आहे. वारकरी पंथातही दत्तात्रेय अवताराला अतिशय मान आहे. दत्त संप्रदायाचे तत्त्वज्ञान अद्वैत वेदान्ताच्या पायावरच उभे आहे. ‘तत् त्वम् असि’ आणि ‘अहं ब्रह्मास्मि’ इ. वेदप्रणीत महावाक्यांच्या आधारानेच.           तर अशा या सत्ययुगीन दत्तात्रेयांचीही प्रसिद्ध  अशी चारधाम आहेत,त्यापैकी काला डुंगर हि दत्तात्रेयांची तपस्थळी आहे.
माहूर ,गिरनार ,दत्तशिखर व काला डुंगर हि दत्त चारधाम आहेत ,तसे अनुसूया आश्रम ( चित्रकूट) अत्रि आश्रम ,रुद्रनाथ- मंडल -हिमालय  हीही दत्त विशेष स्थान आहेत पण चार धाम प्रमुख स्थाने आहेत.
काला डुंगर हे कालो डुंगर Black Hill म्हणून प्रसिद्ध आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकातून निर्माण झाल्याने हा काळा आहे व म्हणून त्यांचं नावाने प्रसिद्ध आहे.हा गुजरातच्या कच्छ विभाग, जो पाकिस्तानला लागून आहे, येथील सर्वात उंच पॉईंट आहे.1516 फूट म्हणजे462 मीटर वर हा पॉईंट आहे.काला डुंगर हे गुजरातच्या कच्छ या रेल्वे स्टेशन पासून 97 किमी म्हणजे 60 मैल आहे.कच्छ मधील खावडा या गावापासून उत्तरेस 25किमी ,16 मैल दूर आहे.
येथेच रण उत्सव साजरा करतात जो भारतात प्रसिद्ध आहे ,दूरवरून ,अगदी परदेशातूनसुद्धा पर्यटक येतात.हा उत्सव डिसें जानेवारीत भरतो.

काला डुंगर हीच एकमेव जागा आहे जेथून कच्छच्या  रणचे विहंगम दृश्य पाहता येते ,आणि पाकिस्तानची सीमा जवळच असल्याने येथे आर्मीची पोस्ट आहे ज्याच्या पलीकडे फक्त आर्मीची माणसेच जाऊ शकतात.

पण काला डुंगारचे सर्वात जास्त महत्व व माहात्म्य येथील दत्तस्थानाबद्दल.हि दत्ता त्रेयांची तपस्थळी आहे व येथील दत्त मंदिर हे 400 वर्षा पूर्वीचे आहे.अशी मान्यता आहे की दत्तात्रेय जेंव्हा पृथ्वीवर पाऊल टाकते झाले तेंव्हा ते काला डुंगर येथे थांबले.व त्यांनी येथे तप केले ,गिरनार हि त्यांची निवासभुमी आहे तर कालाडुंगर तपोभुमी.
ते इथे आले तेंव्हा त्यांना कोल्ह्यांचा एक कळप दिसला जो अत्यंत दयनीय व मरणप्राय अवस्थेत होता.तो कळप भुकेने व्याकुळ झाला होता व आसपास कजाण्यासाठी व खाण्यासारखे काहीच नव्हते.
कृपाळू व कनवाळू दत्त महाराजांनी त्यांना आपले शरीर खावयास दिले व आश्चर्य म्हणजे त्यांच्या शरीराचा जस जसा एक एक भाग खाल्ला जाई तसं तसा तो भाग परत येई.तर अशा रितीने हे एकीकडे काया कल्प स्थान आहे तर दुसरीकडे दत्त कृपा स्थान आहे .
आणि म्हणूनच येथे कोल्ह्यांचा दर्शन म्हणजे दत्त कृपा मानली जाते जसे अमरनाथ येथे कबुतरांच्या सफेद जोडीचे दर्शन हे शिव दर्शन मानतात तसेच.जाणकार जाणतातच कि हि जोडी अमरजोडी आहे कारण त्यांनी अमरकथा हि संपूर्ण ऐकली आहे.तसेच काला डुंगर येथे कोल्ह्यचे दर्शन हे प्रत्यक्ष दत्ता त्रेय दर्शन मानतात ,आजही येथे दत्ताच्या त्या किंमयेचे द्योतक म्हणून रोजदुपारी 12 वाजता व संध्याकाळी आरतीस येथे गोड भात  चौथरीवर ठेवला जाते व कोल्हे तो गोड भात खावयास येतात.कोल्हे गोड भात खातात हेही एक आश्चर्यच पण नशीबवान तेही येथे अनुभवतात.
आणखीन एक विचित्र व आश्चर्यकारक गोष्ट इथे आढळते व ती म्हणजे हे एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक field आहे जेथून vehicles 80 कि मी च्या स्पीडने ,गाडी बंद केली असता,चालते,व हे फक्त याच ठिकाणी होते तेथील दुसऱ्या hills वर हे होत नाही.काही संशोधक मानतात कि याचा उतार हा दिसतो त्यापेक्षा जास्त steep आहे म्हणून असे होते. पण मॅग्नेत व लोखंडाचे वाहन एकत्र आले तर मॅग्नेटिक फील्डमुळे  गाडी हलणार नाही पण ती नुसती हलत नाहि तर 80 च्या पेक्षा जास्त स्पीडने चालते, तर हे आश्चर्य नव्हे काय?
इतर सर्व दत्त स्थान प्रमाणे येथेही एक जागृत व तप्त धुनी आहे जिथे कित्येक वेळा दत्त पाऊले उमटतात ,अशाच एका उमटलेल्या पदचिन्हानचा एक फोटोही येथे लावलाय.
इथे वाट चुकलेल्या वाटसरुस दत्तात्रेय मार्गदर्शन करतात . आता इथे भक्त निवास व भोजनाची सुविधापण सुरु केली गेलीय.हे रण असल्याने येथे फार गर्मी असेल असे पर्यटकांना वाटते पण येथे हिलस्टेशनसारखा गारवा असतो .
इतर अनेक स्थळे हि येथे आहेत जसे पंच पवित्र सरोवरांपैकी एक नारायण सरोवर ,प्रभू कृपे माझी चार सरोवरे व येथील पुण्य स्नान झालीत.
डिसेंम्बर जानेवारीत येथे रण उत्सव होतो त्या निमित्ताने अनेकानेक पर्यटक येथे येत असतात .
तर अशा या काला डुंगरला निदान रणउत्सवाचे निमित्ताने का होईना साधकांनी व भाविकांनी एकदा तरी भेट द्यावी व दत्त चारधाम पैकी आणखीन एक धाम दर्शन घ्यावे.दत्त कृपे माझी इतर तीन दत्तधाम यात्रा करवून घेतली गेलीय .
shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com
drsanjayhonkalse@gmail.com

https://m.facebook.com/story.php?story_fbid=3119660804716242&id=100000170606055
इदं न मम्।

Comments

Popular posts from this blog

कृष्णसखा उद्धव

पितृशास्त्र भाग 10:"पितृपक्ष: निषिद्ध कार्य :चुकून नका करू हे  काम*

केल्याने देशाटन.......|