Thil Tarpanpuri तीळ तर्पण पुरी जगातील कदाचित एकमेव नरमुख गणेश मंदिर
Thil Tarpanpuri तीळ तर्पण पुरी जगातील कदाचित एकमेव नरमुख गणेश मंदिर
https://m.facebook.com/story.php?story_fbid=2857993924216266&id=100000170606055
https://shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com/2019/08/thil-tarpanpuri.html
Thil Tarpanpuri तीळ तर्पण पुरी जगातील कदाचित एकमेव नरमुख गणेश मंदिर
: 'शिवंजय': संजय होनकळसे
गणपती हे सर्व हिंदूंचे आदी दैवत आहे,सर्व पूजनात प्रथम स्थान पूजनीय स्थान आहे.अगदी पाश्चात्यांना पण गणपतीचे आकर्षण आहे .
मलेशिया ,इंडोनेशिया, कंबोडिया,मॉरिशस, जावा सुमात्रा इत्यादी अनेक ठिकाणी गणपतीही बुद्धिदाता म्हणून मानला ,पुजला जातो.
अगदी यूरोप अमेरिकेत एलेफं ट गॉड म्हणून मान्य आहे,अमेरिकेतील Citadel येथील कंपनींत तर कॉम्प्युटरचा स्क्रीन saver म्हणून ठेवला गेलाय.
आजकाल जगभर मॉडर्न पिढी गणेशचतुर्थी स गणपतीचा वाढदिवस म्हणून साजरा करतात.व happy birthday Ganesh असे गाणे गातात.
तर असा हा गणेश गजमुखरुपांतच आपण पाहतो व तसाच तो आपल्या मनांत भिनला आहे .
पण गणपती हा काय सोंड घेऊन जन्माला नाही .त्याची पार्वतीने द्वारपाल म्हणून रक्षणासाठी अंघोळीला जाताना नियुक्ती केली hotiv कुणालाही आत सोडू नको म्हणून आज्ञा होती तिचे पालन करताना शिव पार्वतीस भेटण्यास आले असता गणेशाने त्यांना अडवले व आंत जाण्यास मज्जाव केला असता रागावून त्याचा शिरच्छेद केला व नंतर चूक लक्षांत आल्यावर जो उत्तरेस मुख करून झोपलेला पहिला प्राणी मिळेल त्याला आणून त्याचे मुख लावण्याचा आदेश दिला ( म्हणून आपल्याकडे दक्षिणेस पाय करून वा उत्तरेस डोके करून झोपणे अशुभ मानतात व प्राण नाशक मानतात.
तर उत्तरेकडे मुख करून झोपलेला हत्ती दिसला व त्याचे शीर घेऊन तो गजमुख झाला व त्याला गण पती गणांचा पती हे नाव शिवशंकर यांनी दिले अशा शिरहिन गणेशाच मंदिर केदारनाथला तळतटी गौरिकुंड येथे आहे ' सरकटा ' म्हणून प्रसिद्ध आहे ,प्रभकृपे त्याचे दर्शन मी अनेकवार घेतले आहे.
पण नरमुख अशा गणपतीची कल्पना विरळींच पण असे एक मंदिर आहे जिथे नरमुखी गणेश आहे तोही त्रेता युगातील .त्रेता युगात स्थापित हे मंदिर तामिळ नाडू राज्यात आहे .कोठूनूर नावाच्या गावाजवळ मायवरम पोंथोत्तम मार्गावर कोठूनूर पासून 2.5 "कि मीटर वर आहे .अगदी प्राचीन खेडे गाव आहे तो अडीच किमी चा रस्ता खडकाळ व मातीचा आहे.सापडायला कठीण गेला .पोहोचलोटर अगदी प्राचीन look च दृश्य ( विडिओ पहा.)समोरच गवतांची बनवलेली पाठशाळा आहे काही विद्यार्थी अभ्यास करत होते.कुणीही लक्ष दिले नाही.येथे कृष्ण यजुर्वेद शाखेची पाठशाळा आहे .60 विद्यार्थी शिकावयास आहेत.त्यांना सारेच राहणे ,खाणे पिणे ,शिक्षण मोफत आहे.परिसर छान आहे.आम्ही 4 वाजता पोहोचलो मंदिर साडेचारच्या उघडले .नर विनायक मंदिर छोटेसे आहे .पूजन केले .अश्विन नावाचा विद्यार्थी होता त्याने माहिती सांगितली .फोटो काढण्यास मनाई आहे ,काढलेला फोटो delete करावयाला लावला.येथे प्रमुख देवता शिव व स्वर्णवल्ली पार्वती आहे .
इथे श्राद्ध तर्पण याचे महत्व आहे म्हणून तीलतर्पण पुरी असे या ठिकाणचे नाव आहे .प्रमुख देवता मुक्तेश्वर महादेव आहे .त्याविषयी वेगळे विवेचन पूर्ण लिखाण करावे लागेल.कारण हे एक पितृ तर्पण स्थान आहे.
असो अशा या नर मुख विनायकाचे दुर्लभ दर्शन करण्याचं भाग्य लाभले .आपणही जमल्यास येथे जाऊन दर्शन घ्यावे .हे तंजावर पासून 2 तासांवर आहे साधारण 85 कि मी ,येथून वैतीश्वरन 40 कि मी वर आहे.हे कदाचित नरमुख गणेशाचे एकमेव मंदिर असावे,पण बसव कल्याण येथे पण असे मंदिर आहे असे ऐकून आहे.
©
Shivanjay Dr Sanjay©
shivanjaydrsanjayhonkalse. blogspot.com©
Comments
Post a Comment