मिनी भारत : कंबोडिया = कम्बोज

My Culture Fish Tour country 34:कंबोडिया
मिनी भारत : कंबोडिया = कम्बोज
'$#¡v@π√@¥':$@"π√@¥
#♀πk@£$€
भारतीय माणसे साऱ्या जगभर पसरली आहेत.व त्या त्या देशात त्यांनी आपले कर्तृत्व हि सिद्ध केलंय. खरंतर असाही अनुभव आहे की भारतीय भारतात नाही दाखवत एवढे कर्तृत्व ,धार्मिकता ,श्रद्धा परदेशांत गेल्यावर दाखवतो.
असे भारतीय त्या त्या देशांत एखादी सेटलमेंट व commune करून राहतात. व असे areasभारतीय वस्त्या म्हणून ओळखले जातात.
पण कंबोज alias कॉम्बोडिया हा देश यासर्व बाबी असूनही विरळाच,जिथे सारे culture संस्कृती यात भारतीयत्व आहे व तसे ते ऑफिशियली कबुलही करतात.
पहिल्या शतकात काही व्यापारी समुद्रमार्गे येथे आले व येथीलच होऊन राहिले .त्यांनी येथे राज्य केले. जय वर्मन,यशवरमन व सूर्य वर्मन 1 ,2, 3 या नावाने ओळखले गेले.
दुसऱ्या शतकांत भारतातून बुद्धिष्ट लोक आले व त्यांनीही येथे बुद्ध धर्माचा  प्रभाव पाडला व प्रसार केला. येथील लोकांनी तेही स्वीकारले.खरंतर येथे Animism नावाचा धार होता ज्यात निसर्गाची पूजा केली जाते .निसर्ग देव मानला जातॊ. पण येथील लोकांनी हिंदू व बौद्ध धर्म चांगलाच अंगिकारला. आजही तो प्रभाव जाणवतो .उदाहरणा दाखल बोलायचे म्हणजे येथील तरुण वयस्कर व्यक्तीस ममा बाबा म्हणूनच संबोधतात.
स्त्रीला अत्यंतीक महत्व व मान आहे ,आपल्याकडेही स्त्री ला महत्व प्राप्त आहे पण इथे खऱ्या अर्थाने तिला माता ,भगिनी व अप्सरा म्हणून संबोधतात.खरेतर अप्सरा हे बोध चिंन्हच आहे येथील .चौक चौकांत अप्सरेचे पुतळे आहेत.
आज तेरावदा बौद्ध हा येथील राष्ट्रीय धर्म आहे जो Hinduism ,Buddhism व Animism च सुंदर मिश्रण आहे.0तरीही तेवढ्याच आत्मीयतेने हिंदू धर्म पाळला जातो .माणसांची नावेही हिंदूच आहेत फक्त उच्चारां मध्ये फरक आहे.

कंबोडिया हा जगातील एकमेव असा देश आहे ज्याचे नांव एखाद्या व्यक्तीवरून पडले व ती व्यक्तीही अशी की मूळ भारतीय अशी होती.
  एक कंम्बु स्वयंभूव नावाचा राजा  भारतातून येथे आला व येथे स्थायिक झाला व तो शिव प्रेरणेने येथे आला .येथील नागकन्येशी विवाह केला व कंबोजची निव घातली  व नांव - कंबोज मिळाले.पुढे ते कंबोडिया म्हणून प्रसिद्ध झाले .तो येण्या आधी या देशास कॉम्पुचिया म्ह्णून ओळख होती.
तसेच कमबोडिया हा एकमेव असा देश आहे की ज्याच्या झेंड्यावर त्या देशाच्या मंदिराचे छायाचित्र आहे .कंबोडियात जगप्रसिद्ध व सर्वात मोठे 166 हेक्टर वर पसरलेले असे भगवान विष्णूचे हिंदू मंदिर आहे-अंगकोर वाट - हे सूर्यवर्मन 2 या हिंदू राजाने 1113 ते 1150 दरम्यान 40000 कारिगारांच्या साहाय्याने बांधले जे सारे कारीगर हिंदू होते व त्यांच्या कारीगिरीची उत्कटता व उत्कृष्टता,भाव व बारिकी वाखाणण्या जोगी आहे. व त्या कारीगिरीचे प्रचंड दगड 55 कि मी दुरून नदिच्या  माध्यमातून  माणूस हत्ती,व घोडे यांच्या स
हाय्याने वाहून आणले गेले .अशा या अंगकोर वाट  या प्रसिद्ध देवळा चे चित्र यांच्या राष्ट्रीय ध्वजावर आहे.
या देवळात समुद्र मंथन ,रामायण व महाभारत कालवून सुबक ,बारिकी दाखवणारे भिंती शिल्प आहे 45 ते 90 मीटर इतके लांब.महाभारताचे भित्तिचित्रशिल्प तर जगात सर्वांत लांब म्हणजे 90 मीटर एवढे आहे.
तर अशा ता कंबोडियवर भारताचा प्रभाव पदोपदी दिसतो जणू हा मिनी भारतच आहे.व काही अर्थ जास्त चांगला आहे भरतासारखेच अनेक परकीय  अधिपत्य पाहिलंय.हिंदू 12व्या शतकापर्यंत मग बुद्धिस्ट नंतर 1860 नाबतर फ्रेंच वसाहत ,1953 ला स्वातंत्र्य.
पण 1975 ला मग कंमुनिस्ट उठाव ज्यामुळे 8 मिलियन कंबोडियन आपल्या जालियांवाला बागेसारखे मारले गेले,नव्हे निवडून उचभ्रू सुशिक्षित ,डॉक्टर ,वकील,प्राध्यापक ,मारले गेले .1979 पर्यंत हे चालू होते. राजेशाही विरुद्ध हा chinese communism च्या प्रभावा खालील  लोकांचा हा उठाव होता.1979 राजेशाही उलथवली गेली .व कंबोडियन कमुनिस्ट पार्टीचे राज्य सुरु आहे ते आजही.गम्मत आहे ना कंबोडिया हे किंग्डम आहे ,आजही राजा आहे येथे. Presidential Democracy आहे पण राज्य कंमुनिस्ट पार्टी चे  हुन सेन हा गेली 36 वर्षे प्रेसिडेंट आहे.
आणखीन एक गंमत लोक बुद्धिझम व हिंदुइझम मानतात ,बुद्धिस्ट धर्म अहिंसा वादि चोरी सर्वात मोठा गुन्हा मानला जातो येथे.प्रोस्टिट्यूशन बंदी आहे तरी हा देश सर्वात corrupt देशांपैकी एक आहे.बुद्धिस्ट धर्म अहिंसा वादि  पण लोक नॉनव्हेज खातात .येथील आवडतं खाणे साप ,व मगरीचे मटण व ड्राय crocodile meat.

कंबोडियाची लोक संख्या  1.6 कोटी आहे .भारताची त्याच्या दसपट आहे .व भारताची लोकसंख्या दार वर्षी 1.6 कोटीने वाढते म्हणजे भारत दरवर्षी एका कंबोडियास जन्म घालते.तर कंबोडिया भरातभारील एक भारत :मिनी भारत.
‌शिवंजय डॉ संजय होनकळसे ©
shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2883755961640062&id=100000170606055

Comments

Popular posts from this blog

कृष्णसखा उद्धव

पितृशास्त्र भाग 10:"पितृपक्ष: निषिद्ध कार्य :चुकून नका करू हे  काम*

७)पितृशास्त्र:अंत्येष्टी व दशक्रिया