क्षणभंगुर जीवनात अक्षय आशा :अक्षय तृतीया:
क्षणभंगुर जीवनात अक्षय आशा :अक्षय तृतीया:
डॉक.प्रा. संजय होनकळसे
नास्ति क्षयो यस्या सा अक्षया |
अर्थात जिचा क्षय होत नाहीं ती अक्षय आणि जेष्ठ महिन्याच्या "जया" तिथीला म्हणजे तृतीये ला येते ती अक्षय तृतीया.या दिवसात असलेल्या खगोलशास्त्रीय व हवामानातील स्थितीवरून लक्षात येईल की या तिथीचे काय शास्त्रीय महत्व आहे ते.आपले सणवार हे नुसते मिथ्या वा परंपरा,अथवा अंधश्रद्धा नसून त्यामागे किती विचारपूर्वक शास्त्रीय व आध्यात्मिक बैठक आणि सांगड आहे हे लक्षात येईल.
अक्षय तृतीया वैशाख महिन्यात येते तेंव्हा सूर्य मेष राशीत असतो, म्हणजे सौर वर्षाची सुरुवात होते.याला "बैसाखी"म्हणून उत्तरेकडील राज्यात ओळखले जाते."बिहू"म्हणून ईशान्य भारतात,"विशू"म्हणून दक्षिणेस साजरी होते.मेष ही सूर्याची उच्य राशी .सूर्य तप्त त्यात मेष अग्नी रास त्यामुळे वणवा असतो त्यालाच आपण वैशाख वणवा म्हणतो. सूर्य आत्म तत्व दर्शवतो त्यामुळे या योगावर आत्म बळ चांगले असतें.त्याचप्रमाणे प्रमाणे या दिवशी वृषभ राशी असतो , जर का ती रास व चंद्र रोहिणी अथवा कृत्तिका नक्षत्र मय असेल तर चंद्र उचीचा असतो.चंद्र मनाचं कारक व तो उचीचा असल्याने मनोबल उच्च्य असतें.म्हणजेच अक्षय तृतीयेस मनोबल व आत्मबल उच्च्य असून त्यांचा पूरक मिलाप असतो. म्हणूनच याला महापुण्य काल अथवा पर्व काल म्हणतात.आणि म्हणून तो पुण्यकारक/हितकारक असतो. व त्यामुळेच तो सण म्हणून साजरा केला जातो नव्हे साडेतीन शुभ कारक दिवसामधील एक मानला जातो.पूर्वापार चालत आल्याने ती परंपरा व संस्कृतीचा द्योतक झाली.जनमानसात हे बिम्बवण्यासाठी इतिहासाचे अनेक दाखले आहेत.
अक्षय तृतीया ही तिथी युगारम्भाची आहे कारण या तिथीला ,या दिवशी सत्य युगाची सुरुवात झाली. या दिवशी अन्नपूर्णा ,जी अन्न =पूर्ण ब्रह्माची व स्वयंपाकाची देवता आहे तिचा जन्म झाला म्हणून तिची पूजा करतात, अन्न दान करतात.या दिवशी अन्न दान,दान केले तर पुण्य अक्षय होते.
याच दिवशी पांडवांना अक्षय पांत्राचा लाभ झाला ज्यामुळे कधीच त्यांना अन्नाची उणीव भासली नाहीं. याच दिनी श्री शिव शंकरांनी अन्नपूर्णा आईसाहेबांकडून अन्न भिक्षा घेतल्याची नोंद आहे. याच दिवशी सुदाम दादाने भगवान श्री कृष्ण यांना सुदाम्याचे पोहे दिले व श्री कृष्णाचे आशीर्वादाने त्यांस धनसंपदा ,ऐश्वर्य ,व भरभराट प्राप्त झाले. याच दिवशी श्री विष्णूने सहाव्वाअवतार महान तपस्वी,योगी, भगवान परशुरामाचा अवतार धारण केला .म्हणून याच दिवशी परशुराम जयंती साजरी होते,विशेषता कोंकण, मलबार,केरळ येथे उत्साह ओसंडून जातो.केरळ मध्ये तर सर्व धर्मीय यात भाग घेतात,कारण हा सारा विभाग परशुरामाने समुद्र अटऊन स्वत:साठी भूमी तयार केली कारण त्याने पृथ्वी वरील जिंकलेली सर्व भूमी दान दिल्याने स्वत: साठी ही परशुराम भूमी निर्माण केली.अक्षय तृतीयेची देवता ही" गौरी
देवता म्हणून 'गौरी"हा तिचा सण कोंकणात उत्साहाने साजरा होतो.
सूर्य पृथ्वीच्या फार जवळ या दिवशी आलेला असतो म्हणून पृथ्वी तापलेली असतें वैशाख वणवा पसरलेला असतो.त्यामुळे यादिवशी पाणी व अन्न दानाचे महत्व असतें.अक्षयपात्र ,अन्नपूर्णा जन्म ,सुदाम्याचे ऐश्वर्य व भरारत ,पृथ्वीवरील वाढीव तापमान यांची सांगड घालून अन्नदान ,जलदान,तलाव तयार करणे,बगीचा लावणे विहीर खणणे ,पाणपोई सुरु करणे कार्यक्रम होत असतात. व त्याना समाजाच्या उपयुक्ततेसाठी समर्पित करणे हे उपयुक्त कार्यक्रम होत असतात .म्हणून या दिवशी सर्वत्र पाणपोई सुरु होतात. या सर्वांवरून हेच लक्षत येते की आपले सण,वैयक्तिक जीवन ,व समाज जीवन व सौख्य याची किती विचारपूर्वक व शास्त्रीय बैठक आपल्या पूर्वजांनी घातलेली आहे.
तसेच चंद्र हा जलाचा व अन्न ,अन्नरसाचा कारक म्हणून अन्नदान ,पाणीदान महत्वाचे पाणी अन्नाच्यामुळे अथवा त्याच्या अभावाने मरण पावलेल्या पूर्वजांच्या मोक्षासाठी पण दान धर्म ,तर्पण ,प्रोक्षण ,श्राद्ध या दिवशी करतात. त्यांच्या स्मरणार्थ जलकुंभ दान करतात ,अथवा पाणपोई बांधतात .जैन व गुजराती समाजात याला "प्रपादान"असें म्हणतात.त्यामुळे संपत्ती, संतती,वंशवृद्धी होऊन अक्षय पुण्य संचय होतो.विदर्भात तर या सणास दिवाळी इतकेच महत्व आहे व तो त्याच उत्साहात साजरा होतो.
आगामी पर्जन्य मान व हवामानाचे अंदाज याच दिवशी बांधण्याचा विधी खेडोपाडी होत असतो.याच दिवशी नांगराची पूजा होते व पेरणीला सुरुवात केली जाते.यामुळे अन्नधान्न्यदामदुप्पट होते व वातावरण रोग रे मुक्त होते.वैशाखात उसाच्या रसाचे सेवन करतात ते आरोग्यास हितकारक असतें. जैन राजा श्रेयास याने उसाचा रस पिऊन उपवास सोडल्याने त्याचे अन्न्भांदार भरून गेले अशी आख्याइका आहे. देवाला आंबा वाहून आंबा खाण्यास सुरुवात पण याच दिवशी होते. सोन्याच्या खारेदिस्पण हा अत्यंत शुभ मुहूर्त मानला जातो .या दिवशी सोने विकत घेतल्याने त्यात अक्षय वाढ होते व बरकत येते. या दिवशी वस्तू वा गृह प्रवेश याचा मुहूर्त नसतो येवढे वगळता कुठच्याही कार्याची वृद्धी या दिवशी सुरुवात केल्याने होते. याच दिशी केदारनाथ व बद्रीनाथ यांचे पट आम जनतेसाठी खूले होत असतात.हे अलौलिक व शुभकारक आहे .एकंदरीत पुण्यसंचय व आध्यात्मिक उन्नत्ती साठी पण हा दिवस महत्वाचा आहे.
आपले सगळेच उत्सव.
अक्षय तृतीयेस दशमहाहाविद्यांपैकी नववी महाविद्या मातंगी माता हिची हि जयंती आहे .मातंगी माता अक्षय भोग व मोक्ष साधन देणारी आहे ,विश्वामित्र ऋषी म्हणतात कि मातंगी पूजा हि सर्व दहाही महा विद्यांच्या पूजेचे फळ देते .हीच उत्सव / साधना बुद्ध पोर्णिमे पर्यंत करतात .या दिनी ती व तारा महाविद्या जागृत व सिद्ध असतात / होतात.बुद्ध पोर्णिमेवर व मातंगी मातेवर मी वेगळा लेख लिहतोय.
,सणवार,जीवन पद्धत्तीच एकंदरीत शास्त्रोक्त विचारांवर आधारभूत आहे.ज्याज्या बाबी आपल्याला थोतांड ,अथवा अंधश्रद्धा वाटतात त्यामागे शास्त्रीय बैठक आहे अगदी अंघोळीची पद्धत्ती पासून ते खाण पिण नाक कान टोचण ,ते अंत्यविधी व त्यानंतरच्या संस्काराच्या बाबी यांना शास्त्रोक्त आधार आहे, परंपरेने त्या आपण पाळत आलोत म्हणून त्यामागील कारण मीमांसा माहिती असतेच असें नाहीं एवढेच आणि म्हणून ती अंधश्रद्धा वाटते. श्रद्धा ,खरे तर कधीही अंध नसते ,ती डोळ्सच असतें आंधळा असतो तो विश्वास ,श्रद्धा नव्हे .
थोडक्यात या सणामागे शास्त्रीय ,ऐतिहासिक, पौराणिक,आध्यात्मिक,खगोलशास्त्रीय,आधार आहे म्हणूनच हा दिवस साडे तीन मुहूर्तांपैकी एक असा मानला जातो. जीवन हे क्षणभंगुर आहे,या क्षणभंगुर जीवनात अक्षय अशा व अक्षय फळ देणारी अशी ही अक्षय तृतिया आहे.
dr.sanjay honkalse
drsanjayhonkalse.tripod.com
shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com
sir ....kharach dhanyavaad. mala mahit nhavta tyacha mahatva. can I share this on fb and whatsapp?
ReplyDeleteYes of course
DeleteYes
ReplyDeletePl post uar details here