छोटी दिवाळी:;शिवंजय डॉ संजय होनकळसे© वसू बारसं व गुरु द्वादशी

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2376895062326157&id=100000170606055

छोटी दिवाळी:"शिवंजय डॉ संजय होनकळसे©
वसू बारसं व गुरु द्वादशी

धन टर्सच्या आदल्या दिवशी वसू बारसं व गुरु द्वादशी हे दोन महत्व पूर्ण सण साजरे होतात.खार तर हे दोन वेगळे सण त्यांचं महत्व व माहत्म्य पण वेगळे .व दिवाळीशी संलग्न म्हणून ते दिवाळीबरोबर साजरे होतात.

भाग 1 वसू बारस :
*श्री वसुबारस आणि गुरुद्वादशी*

आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस, वसुबारस हा सण साजरा केला जातो.
वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी.
समुद्रमंथनातून प्रगट झालेल्या पंच कामधेनू गायींपैकी नंदा नावाच्या गायी प्रित्यर्थ हा सण साजरा होतो।

या दिवशी विष्णुलोकातील वासवदत्ता नामक कामधेनु या लहरींचे वहन ब्रह्मांडापर्यंत करण्यासाठी अविरत कार्य करते. या दिवशी या कामधेनूचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करून अंगणात तुळशीवृंदावनाशी धेनु म्हणजेच गाय उभी करून तिचे प्रतिकात्मक रूपात पूजन केले जाते.
यांचं दिवशी श्री विष्णूच्या आपतत्त्वात्मक लहरी कार्यरत होऊन ब्रह्मांडात येतात .तो दिवस म्हणजे वसुबारस !
पहा किती अर्थानी हा दिवस स्पृह्य आहे .

आपल्या अंगणातील गाईला वासवदत्तेचे स्वरूप या दिवशी प्राप्त होते, म्हणजेच तिचे एकप्रकारे बारसे होऊन तिला देवत्व प्राप्त होते. यासाठीच या दिवसाला वसुबारस असे म्हणतात. बारस म्हणजे एखाद्या गोष्टीत नवीन चैतन्यबीजाची निर्मिती होणे. हेच देवत्व तिच्या ठायी कायमस्वरूपी विष्णूरूप पाहून जिवाने टिकवायचे असते आणि तिच्यातून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्यलहरींचा लाभ उठवायचा असतो.
म्हणूनच या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.या दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे. ज्यांच्याकडे घरी गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे ह्यादिवशी पुरणाचा स्वयंपाक करतात. घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात. नंतर हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून र्चांयाच्या फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात. निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात. ह्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरुवात करतात. पुष्कळ स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो. ह्या दिवशी गहू, मूग खात नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात
  या व पुढील अनेक जन्मांतील कामना पूर्ण व्हाव्यात आणि पूजा करत असलेल्या गायीच्या शरीरावर जितके केस आहेत, तितकी वर्षे स्वर्गात रहायला मिळावेम्हणून मनोभावे प्रार्थना करावी. या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया एकभुक्त राहून सकाळी अथवा सायंकाळी सवत्स गायीची पूजा करतात.

हा दिवस आश्विन कृष्ण द्वादशीच्या दिवशी श्रीदत्त यांच्या प्रथम अवतारी श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज त्यांनी निजानंदी गमन केले. हा दिवस आजही गुरुद्वादशी म्हणून दत्तसंप्रदायी लोक श्रद्धेने पाळतात पाहुयात याची महती व माहिती भाग दोन मध्ये।
🙏©शिवंजय 🌹🙏डॉ 🌹संजय 🙏होनकळसे🌹🙏🌹🙏

Comments

Popular posts from this blog

कृष्णसखा उद्धव

पितृशास्त्र भाग 10:"पितृपक्ष: निषिद्ध कार्य :चुकून नका करू हे  काम*

७)पितृशास्त्र:अंत्येष्टी व दशक्रिया