पितृ शास्त्र :(2)नांदी©

  🕉 अगस्तै नमः ।कृन्वंतो विश्वम् आर्यम्।
पितृ शास्त्र :(2)नांदी©
'शिवंजय':डॉ संजय होनकळसे.

देवताभ्यः पितृभ्यश्च महायोगिभ्य एव च।
नमः स्वधायै स्वाहायै नित्यमेव भवन्त्युत।।
वायू पुराण

पृथ्वी  हा मर्त्य लोक आहे.मानव हा या मर्त्य लोकांतील बुद्धिमान प्राणी आहे.त्याला विवेकाची जोड मिळाल्याने तो बुद्धिनिष्ठ प्राणी आहे.म्हणून तो आपली उन्नती व उद्धार करु शकतो तो. 
उन्नती: आणि खरोखरच मानवाने आपली उत्तम उन्नती केलीय या बुद्धीच्या जोरावर.म्हणून मानव योनी ही कर्म योनी आहे.म्हणून मर्कट ते अत्याधुनिक व प्रगत अशी भरारी त्याने घेतलीय .प्राणी असं नाही करू शकले श्वान हा श्वानच राहतो तो आपली उन्नती वा प्रगती स्वतः करू शकत नाही (माणूस संशोधन करून नवीन श्वानbreed निर्माण करू शकतो पण श्वान असं करू शकत नाही).असं भाग्य मानवेतर प्राण्यांना नाहीये  म्हणून इतर प्राणी भोगयोनी आहेत,मानवेतर प्राण्यांना फक्त भोग आहेत.त्यामुळे पृथ्वी  हा मर्त्य लोक आहे व मानव प्राणी हा या मर्त्यलोकाचा राजा आहे.
बुद्धीमान असल्याने मानवाने आपली चांगलीच प्रगती ,उन्नती केलीय. हि भौक्तिक प्रगती ,उन्नती अफाट आहे हे वादातीत आहे.बुद्धीचा कस लावून त्याने हे प्रशंसनीय स्थान साध्य केलंय,सिद्ध केलंय.
मानवास बुद्धी उन्नती साठी बहाल आहे तसेंच ती उद्धारासाठी पण परमपित्या जगन्नियंत्याने बहाल केलीय,कारण फक्त आणि फक्त मनुष्य योनीच कर्म योनी आहे,त्यामुळं त्याला कर्म विकल्प आहे व योग्य कर्म करून  तो आपली जन्म मारणातून सुटका करू शकतो व आपल्या कर्माने पुनरपि जननम् पुनरपि मरणम् या चक्रव्युव्हात अडकतो.कठोपानिषद सांगते मानव श्रेयकर कर्म  ,जी कर्म स्व कल्याण व समाज कल्याणार्थ ती,करून मुमुक्षत्व प्राप्त करू शकतो पण तो प्रेयकर गोष्टींच्या /कर्माच्या,जी कर्म त्याला 'माया'धीन करत ती,मागे लागतो .  म्हणून यांच बुद्धीच्या जोरावर मानव आपला उद्धारही करू शकतो पण इथे मात्र तो फसतो असं दिसते.त्याने मायेवर स्वार होण्या ऐवजी  मायेस आपल्यावर स्वार करवतो.बघा कसे ते. बुद्धिमान असणं हे  नक्कीच चांगले पण आधुनिक मानव बुद्धीच्या इतका आहारी गेलाय कि तो बुद्धिवादी झालाय आणि इथेच तो फसला. त्यामुळे तो फक्त बुद्धिगम्य गोष्टींच मान्य करू लागला पण काही बाबी या बुद्धी अगम्य आहेत.मर्त्यलोका पालिकडे अनेक लोक आहेत.विज्ञान आजही तिथे थिटे पडतंय.त्यामुळे मानवी बुद्धी व विज्ञान आजही कित्येक बाबींबाबत अजूनही पाळण्यातच आहे. मानवी जीवन,पूर्व जन्म,व मृत्यूशास्त्र,मृत्यूपश्चात जीवन याविषयी विज्ञान अजून चाच पडतच आहे. परंतु वैदिक विज्ञान याचा सांगोपांग विचार करते व ती आपली जगास देन आहे.आज पाश्चात्य विज्ञान याचा विचार करू लागलंय.नाहीतर 1970 पर्यंत मानसशास्त्रास व परामानस शास्त्रही आधुनिक विज्ञानास मान्य नव्हते.
असो, वेदविज्ञान मृत्यूशास्त्र, परामृत्यूशास्त्र ( मृत्यूनंतरच्या विज्ञानLife after )याचा सारासार व तर्कशुद्ध शास्त्रशुद्ध विचार करते.हा आपका कसा व वारसा आहे पण हायरे दुर्दैव आपणU या बाबतही किती बालिश वा अज्ञ आहोत याचे उदाहरणं आसपास दिसतात.हा आपला वसा व वारसा आहे पण दुर्दैवाने राजकीय निरिच्छा(secularism च्या नावाखाली नेहरूंनी वैदिक इतिहासाला जाणीव पुर्वक बगल दिली पण त्याच वेळी इस्लामचे लांगूल चालन केले) व भ्रमित करणारा पाश्चात्य अंधानुकरण ,अंधांग्लनुकरण (Western Blinded impact) आपण या बाबाबत उपेक्षिलो व दुर्लक्षिले गेलोय त्यामुळे काहींना हे पटतच नाही की मृत्यू पाश्चातही जीवन असते .मृत्यूपश्चात जीवास पितर म्हणतात.
'Shivanjay':drsanjayhonkalse©
'shivanjay' drsanjayhonkalse.bligspot.com
drsanjayhonkalse.tripod.com
Statutory statement:मी काही याविषयीचा तज्ञ नाही पण सद्य परिस्थितीतील अज्ञान ,चुकीचे विचार व वरून भुलावणाराअतर्क्य तर्क,तसेंच आपला सनातन विचार हा किती परीपूर्ण  आहे यांचा सापेक्ष व तौलनिक अनुभव या विचाराने जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी सांगावे,share करावे म्हणून हा प्रपंच.'
शिवंजय':डॉ संजय होनकळसे©
shivanjaydrsanjayhonkalse. blogspot.com
drsanjayhonkalse.tripod.com

Comments

Popular posts from this blog

कृष्णसखा उद्धव

पितृशास्त्र भाग 10:"पितृपक्ष: निषिद्ध कार्य :चुकून नका करू हे  काम*

केल्याने देशाटन.......|