योनी तंत्र ,भक्ती, श्रद्धा यांचा ज्वलंत व जिवंत त्रिवेणी संगम : नीलांचल पर्वतारूढ कामाख्या देवी :डॉक्टर संजय होनकळसे "शिवंजय" drsanjayhonkalse@gmail.com
योनी तंत्र ,भक्ती, श्रद्धा यांचा ज्वलंत व जिवंत त्रिवेणी संगम : नीलांचल पर्वतारूढ कामाख्या देवी :डॉक्टर संजय होनकळसे "शिवंजय" drsanjayhonkalse@gmail.com आजपर्यंत सारा भारत व सर्व प्रमुख तीर्थ स्थळांच्या दर्शनाचा लाभ व आनंद होऊनही ईशान्य भारतास भेट देण्याचा योग तीव्र इच्छा असूनही काही येत नव्हता.अगदी जलपायगुडी ,दार्जीलिंग नेपाळ,एवढेच काय तिब्बत कैलास ,यात्रा ही झाली पण जलपाय् गुडी पांसून जवळच असणारया आसाम येथे जाऊ शकलो नाहीं. आसाम ,तेथील संस्कृती ,उत्सव, ब्रह्मपुत्रेच प्रचंड प्रवाह्पात्र , हत्ती, जंगले ,ब्रह्मपुत्रेचा पात्राचा शून्य खर्च वाहतूक उपयोग ,चेरापुंजीचा जगप्रसिद्ध पाऊस या सर्वांचा उल्लेख ' वाहतुकीचे अर्थशास्त्र ' शिकवताना आवर्जून व वारंवार करीत असें. अशा या ईशान्य भारताच्या प्रवासाचा योग आला तो युथ होस्टेल च्या निमित्ताने व मी ईशान्य भारताचे प्रवेश द्वार गुवाहाटी येथे पोहोचलो ...