दत्तलीन पितृतुल्य गुरुनाथ मुंगळे माउली.

दत्तलीन पितृतुल्य गुरुनाथ मुंगळे माउली.
🕉️ अगस्तै  नमः। कृन्वंतो विश्वम आर्यम्।।

अध्यात्मिक क्षेत्रातील जाणते व्यक्तिमत्त्व, संत वाड:मय व तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक,सदा सतेज सदगुरू डॉ. गुरुनाथ विश्वनाथ मुंगळे यांचे गुरुवारी दुपारी वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले
प्रकृती बिघडल्याने त्यांना एका खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दुपारी त्यांना ह्दयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.मुंगळे यांना मानणारा शिष्यवर्ग राज्यभर असून त्यांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांचा पितृतुल्य सहवास व उत्स्फूर्त  मार्गदर्शन मला सतत लाभले.

डॉ. मुंगळे हे शिवाजी पेठ येथील घरी त्यांच्या पत्नीसमवेत राहत होते. त्यांच्या घरी मी अनेकदा  त्यांचा दर्शन भेट  लाभ घेतला आहे.संतांच्या दरबारी टोपी वा आपला टोपा*(स्व) काढून जावे या न्यायाने मी सुरुवातीस अनेक भेटीत फक्त दर्शन व पांच मिनिटं त्यांच्याकडे बसून जात असे.ते मला वैयक्तिक ओळखत नव्हते .
अचानक 2009 साली मला त्यांचा फोन आला ,जो त्यांनी शोधून काढला होता .माझं महावतार बाबाजींवरील पुस्तक त्यांच्या वाचनात आल्याने व ते त्यांना आवडल्याने त्यांनी फोन केला होता.बाबाजींवर चरित्रात्मक असे कुठल्याही भाषेतील ते पहिलेच पुस्तक आहे असे ते म्हणाले.तशी बाबाजी संदर्भात हिंदी इंग्रजीत पुस्तके होती पण चारित्रात्मक असे माझेच पुस्तक आहे व वाचून त्यांना आनंद झाला असे ते म्हणाले .फोनवरच त्यांनी सखोल विवरण व चर्चा केली मार्गदर्शन केले.एकदा येऊन भेट म्हणून सांगितले .मी आपल्याकडे नेहमी येत असतो असे मग मी त्यांना सांगितले. त्या नंतर त्यांचे माझे संबंध पिटा पुत्र तुल्य घट्ट झाले. मी अनेकवार त्यांच्या घरी गेलो ,त्यांच्या ,माय माउली(त्यांच्या सौ) शी बोलून  नमस्कार करून मग बाबांची भेट घेत असे .
असेचे दुसरे पितृतुल्य संतमत्व  साताऱ्याचे उच्च विद्या विभाषित व उच्च पदविभूषित अर्थशास्त्र व वित्तीय संस्था ( बँक) ज्ञानी श्री माजगावकर बाबा याना त्यांनी काही  गुप्त विद्या व ज्ञान दिले आहे .
सातारा जिल्ह्यातील वाई येथे जन्मलेल्या डॉ. गुरुनाथ मुंगळे यांनी इंग्रजी व संस्कृत विषयात एम.ए. ची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी शासकीय तंत्रनिकेतन पुणे व कोल्हापूर येथे इंग्रजीच्या अध्यापनाचे कार्य केले.
1957 साली त्यांची दत्तोपासना सुरु झाली
अभ्यास ,संत वाड:मय,तत्व ज्ञान चिंतन,साधना  करीत ते साधुतत्वाकडे प्रगत झाले.
संतचरित्रे व तत्त्वज्ञान या विषयावर त्यांनी विविध ठिकाणी व्याख्याने व प्रवचन देण्यास सुरुवात केली. संत साहित्यावर विपुल लेखन केले. त्यांना दिल्ली येथील जागतिक शांतता परिषदेला आमंत्रित करण्यात आले होते. डॉ. मुंगळे हे कोल्हापूर येथे भरलेल्या संत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.

२००१ मध्ये पुणे महापालिकेने त्यांचा मान पत्र देऊन नागरी सत्कार करण्यातआला होता.त्यांच्या संत साहित्यातील कामगिरी बद्दल त्यांचा अनेक ठिकाणी सत्कार करण्यात आलाय.आळंदी नगरपालिका, हुपरी येथील एल.वाय. पाटील ट्रस्ट,श्री वटवृक्ष स्वामी महाराज ट्रस्ट अक्कलकोट यांचा त्यामध्ये समावेश होता.त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून डॉ. डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाने त्यांना डि.लीट ही पदवी देऊन सन्मानित केले होते. कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने त्यांचा करवीर भूषण पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.पुण्यातील पाषाण येथे त्यांच्या नावाने ध्यानगृह सुरू करण्यात आला. दत्त संप्रदायाच्या प्रसारासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. यातूनच राज्यभर त्यांचा शिष्यवर्ग तयार झाला. समाजातील अनेक वरिष्ठ व्यक्तीशी त्यांचा निकटचा संबंध होता.

माझ्या अनेक भेटीत ते अनेक विषयांवर, सूक्ष्मदेह विज्ञान,अध्यात्म शास्त्र इत्यादी अनेक विषयांवर उत्स्फूर्त व बहूमूल्य मार्ग दर्शन करीत.समोरील व्यक्तीचा वैयक्तिक  आराखडा त्यांना लगेच ज्ञात होई .मी जात असे तेंव्हा माझे विद्यार्थीमित्रपण कधी कधी बरोबर असत,बाबा त्यांची चौकशी व त्यांनाही  मार्गदर्शन हि करीत.नाथबा ,पूनम ,व चंद्रशेखर यांनी बरेचदा माझ्याबरोबर  त्यांचा सत्संग  लाभ घेतला आहे .वेळ कसा निघून जाई कळत नसे .शेवटी ते अनेकदा म्हणत एकदा ये ,दिवस भर तुला मी मस्त झुणकाभाकर खायला देतो .त्या लाभ पासून मी वंचितच राहिलो.
नंतर मी लिहलेलता "सिद्ध व सिद्धाश्रम " यां पुस्तकाचे  typoscript त्यांना वाचायला दिल होती ,ती त्यांनी सविस्तर वाचून आनंद व्यक्त केला होता .या विषयावर सविस्तर चर्चा लाभ हि मला मिळाला होता .
त्यांनी त्या पुस्तकासाठी आशीर्वादपर संदेशही लिहून पाठवला होता ,तो इथे देत आहे
पुण्यातील dr श्रॉफ याना त्यांच्या मुळे बाबाजींच्या ध्यान दर्शन प्राप्त झाले होते ,त्यांनीही त्यांचे अनुभव वृत्तांत छापला आहे.
पुणे येथील पाषाण येथे त्यांनी सुंदर ध्यान मंदिर स्थापन केले आहे .दत्त चिले महाराजांचा सतत सानिध्य त्यांना लाभलं होत.कृष्ण सरस्वती यांचा त्यांच्यावर विशेष प्रभाव होता .त्यांच्या घरीही तळघरात एक ध्यान मंदिर आहे .ते शेवट पर्यंत घरी देवघरात पूजन करीत ,दोन तीनदा त्यांच्या पूजा घरातच मला त्यांच्या सत्संग लाभला होता. ते स्पष्ट वक्ते होते ,एकदा माझ्या बरोबर आलेल्या एका साधू'तुल्य' व्यक्तीस त्यांनी खडे बोल सुनावले होते.
गेल्या वर्षी त्यांना बंधू शोक झाला.त्यानंतर मी भेटावयास गेलो होतो .त्या नंतरच्या  काही भेटींत,जरी त्यांचा सत्संग व मार्गदर्शन मिळत होते तरी,ते बंधुवियोगाने  खचून गेले असे जाणवले ,मी तसे त्यांना बोलून हि दाखवले होते.
काल दुपारी त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांच्या शिष्यांनी त्यांना तातडीने नागाळा पार्क येथील एका खासगी रूग्णालयात दाखल केले. आज दुपारी त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. त्यातच अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांना ह्दयविकाराचा तीव्र झटका आला. यामध्येच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावई व नातवंडे असा परिवार आहे.
मला पितरचत्र व पितर माया लाभ पासून वंचित राहावे लागले ,पण मी भाग्यवान कारण मला शक्षणिक जसेत्रातील गुरुतुल्य व्यक्तिमत्वे ,जसे रुपारेल महाविद्यालयातील अनेक शिक्षक व पोदार मधील PJ जोशी  इत्यादीबरोबर  गुरुतुल्य अशा अनेक व्यक्ती चे ,त्या पैकी एक श्री सद्गुरू गुरुनाथ मुंगळे यांचा पितृतुल्य प्रेमाशीर्वाद लाभलेत , मी आज जसा आहे त्यात यासर्वांचा बहुमूल्य वाटाआहे .
ते दत्तलीन आहेतच व त्या स्वरूपात अनेकांना मार्ग दर्शन करीत राहतील हा विश्वास आहे.
अमृतं गमय|
"शिवंजय"डॉ संजय होनकळसे
"$#¡\/@π√∆¥"dr $@π√∆¥ #©πk@£$€
drsanjayhonkalse@gmail
7 जुलै 2020
https://m.facebook.com/story.php?story_fbid=3729875280361455&id=100000170606055

7 जुलै 2020

Aaasssssszzzzzzzzzzzz

गुरुदेव गुरुनाथ  मुंगळे कालवश  त्यांनी माझ्या पुस्तकास आशीर्वादपर संदेश दिला होता .

गुरुनाथ मुंगळे जीके आशिर्वचन:
सिद्ध एवं सिद्धाश्रम
श्री गुरुभक्त "शिवंजय' : संजय होनकळसेजी अनेक उत्तम मंगल आशीर्वाद ।
सिद्ध और सिद्धाश्रम द्वारा आपने प्रकट किये गये विचार साधकों को शनै शनै मार्गदर्शन
करते रहेंगे। आत्मबोध अवस्था प्राप्ति के लिये साधना शनै शनै ही परमात्मा इच्छानुसार
होती है और उनकी मान्यता से ही साधक प्रयास, प्रवास, अनुभूति, जिज्ञासा, तृप्ति,
पार्थिक एवं अपार्थिव व्यक्तियों की प्रतीति, पंचभौतिक, चिदविलास, तृतीय नेत्रदृष्टि
“गायत्री आचार्य ज्ञानपीठ
आशीर्वाद
अनुभव तादात्म्यता सहजता से निजवस्तु समझाते हैं ऐसा नहीं है। होने तथा न
होने के बीच में मानव का जीवन प्रवाह बहता रहता है । और उसमें बहते रहने वाले
सारे प्राणी भगवंताधीन रहते हुए भी "भ्रामयन सर्व भूतानी'' इस भगवद् वाक्य में ही
भटकते रहते हैं।
आपका प्रतीतिपूर्ण तथा आशयघन लेखन संसार भगवंत के निज भक्तों को सुरक्षित
करने के लिये है यह समझ होती रहेगी कारण यह समझ एक प्रार्थना की तरह उभर
आती है।
अक्षरातीत भावनाओं को अक्षरों में पिरोने का आपका प्रयत्न स्तुत्य तो है ही,
उससे भावना जागृति करके ज्ञानजागृति की ओर ले जाने वाला है और ज्ञान जागृततीसे कर्मप्रवृत्ति बढ़ाने वाला है।
सद्गुरु' गुरुनाथ मुंगळे स्वामी

2775, ए वार्ड, वरुणतीर्थ रास्ता.

Comments

Popular posts from this blog

कृष्णसखा उद्धव

पितृशास्त्र भाग 10:"पितृपक्ष: निषिद्ध कार्य :चुकून नका करू हे  काम*

७)पितृशास्त्र:अंत्येष्टी व दशक्रिया