Posts

Showing posts from August, 2020

दत्तलीन पितृतुल्य गुरुनाथ मुंगळे माउली.

दत्तलीन पितृतुल्य गुरुनाथ मुंगळे माउली. 🕉️ अगस्तै  नमः। कृन्वंतो विश्वम आर्यम्।। अध्यात्मिक क्षेत्रातील जाणते व्यक्तिमत्त्व, संत वाड:मय व तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक,सदा सतेज सदगुरू डॉ. गुरुनाथ विश्वनाथ मुंगळे यांचे गुरुवारी दुपारी वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले प्रकृती बिघडल्याने त्यांना एका खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दुपारी त्यांना ह्दयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.मुंगळे यांना मानणारा शिष्यवर्ग राज्यभर असून त्यांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचा पितृतुल्य सहवास व उत्स्फूर्त  मार्गदर्शन मला सतत लाभले. डॉ. मुंगळे हे शिवाजी पेठ येथील घरी त्यांच्या पत्नीसमवेत राहत होते. त्यांच्या घरी मी अनेकदा  त्यांचा दर्शन भेट  लाभ घेतला आहे.संतांच्या दरबारी टोपी वा आपला टोपा*(स्व) काढून जावे या न्यायाने मी सुरुवातीस अनेक भेटीत फक्त दर्शन व पांच मिनिटं त्यांच्याकडे बसून जात असे.ते मला वैयक्तिक ओळखत नव्हते . अचानक 2009 साली मला त्यांचा फोन आला ,जो त्यांनी शोधून काढला होता .माझं महावतार बाबाजींवरील पुस्तक त्यांच्या वाच...