काला डुंगर : दत्त चारधाम पैकी एक :
औम अगस्तै नमः।कृन्वंतो विश्वम् आर्यम्।। शिवसंकल्पमस्तु। काला डुंगर : दत्त चारधाम पैकी एक : 'शिवंजय':डॉ संजय होनकळसे (अवघड नाथ श्री दादा बापट व त्यांच्या अध्यात्मार्धाअंगीनी smt स्वाती बापट याना समर्पित ) दत्तराज पाहुनी आज तुष्टलो मनी ! औदुंबरी नित्य वसे, भक्तकाम पुरवितसे ! कमलनयन श्याम दिसे, धन्य तो जनी ! अनसूया ज्याची माय, दृढ धरिले ज्याचे पाय ! त्याचे चरित वर्णू काय, सकळ तो जनी ! विनायक दास दीन, जळाविणा जैसा मीन ! ब्रम्हा-विष्णु-महेश तीन आठवी मनी . आजकाल दत्तधाम सहलींचं बरेच कार्यक्रम होतात . काही जण व्यवसाय म्हणून तर काही सेवा म्हणून या दत्त धामांच्या यात्रा काढतात,तर काही जण स्वतः च आपल्यापल्या परीने दत्त धाम यात्रा करतात ,काही माझ्यासारखे स्वतः बरोबर येईल त्याला नेतात ,तर काही आमचे गिरणारीकाका, आमचे गुरुभाई, कैलास कुलकर्णी व शम्भूनाथ महाराज आपल्याबरोबर इतरांचीहि सेवा करवून घेतात ,तरी काही महाभाग सेवा म्हणून यात्रा काढतात पण सेवा न देता मेवाच कमवण्याकडे कलतात.तर काही commercially यात्रा काढतात पण यासर्व स्थानात गिरनार वग...