सूक्ष्म देहविज्ञानची अनुभूती: अति प्राचीन आदी भैरवी शितला गुफा:
सूक्ष्म देहविज्ञानची अनुभूती: अति प्राचीन आदी भैरवी शितला गुफा: $@π√∆¥ #
काशी येथील अतिप्राचीन गुफा जेथे बाबाजी ,त्यांची मृत्युंजय बहिण नागलक्ष्मी व शामाचरण यांची भेट झाली.©:
भाग 1: गुफा
$@π√∆¥ #♀πk@£$€
shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com
आमचे मित्रवर्य श्री अजित पानसे यांना समर्पित :
(मृत्युंजय महावतार बाबाजी या अप्रकाशित पुस्तकातून)
काशी ,विश्वानाथाची भूमी,येथे शंकर वास्तव्यास होते.काशीचे पूर्वीचे नाव आनंदवन.पांडवाना टाळण्या साठी ते येथून गुप्त काशी व मग केदारनाथ येथे गेले. काशीहि जगातील सर्वात पुरातन नगरी,Oldest surviving city,मोक्षधाम आहे.भारतातील महान संत विभूतींचे हे वास्तव्य स्थान. राजा हरीशचंद्रानी येथेच किरवंतांचा काम केलं तो हरिश्चंद्र घाटही येथलाच,आ दी शंकरा चार्य,गौतम बुद्ध, महावतार बाबाजी,तैलंग स्वामी,टीना स्वामी,करपात्री महाराज ज्यांनी इंदिरा गांधीं ना दोन शाप दिले ज्यामुळे त्यांची हत्या झाली,हिमालया तून एक योगी आधुनिक रूपांत येईल व काँग्रेसचा ऱ्हास करेल ,ते मोदी आज पंतप्रधान आहेत.)व आता असलेले नृसिंह भारती .
तुलसीदास व कबीराचं कर्म स्थान,राणी लक्ष्मीचं जन्म स्थान,तसेंच ज्यांच्या माध्य मा तून महावतार बाबाजींनी क्रिया योग पुन:र्स्थापित करवला,परमहंस योगानंदांच्या माध्यमातून जगभर पसरवला, त्या शामाचरण लाहिरी महाशय यांचे निवास स्थान.योगानंद व युक्तेश्वरांची प्रथम भेटही काशीतच झाली.
अशा या काशीतच एक अति प्राचीन गूफा आहे जी गंगा पृथ्वीवर अवतरण्या आधी पासून आहे जींवर ब्रह्मास्थापित शिवलिंग आहे ब्रह्मेश्वर महादेव म्हणून ,रुद्र कुंड आहे.या गुफेबद्दल मी माझ्या पुस्तकांत ( महावतार बाबाजी :जगातील प्रथम प्रकाशित बाबाजींचं चरित्र रूप पुस्तक वा सिद्ध व सिद्धाश्रम यात व इतरत्र) उल्लेख केला आहे .पण जवळ जवळ 36 वेळा विश्वनाथ सेवेस येऊनही व या गुफेजवळ जाऊन अनेक वार नमस्कार करूनही हि तींचं गुफा हे लक्षातच आले नाही ,पण आता 12 ज्योति र्लिंगे प्रत्येकी 36 वेळा,सप्त कैलास ,सप्त नद्या ,सप्त पुऱ्या पंच केदार ,पंच प्रयाग ,पंच बद्री ,पंच रामा,पंच महाभूत लिंगे (5 वेळा प्रत्येकी) षष्ठ सुब्रमण्यम 5 वेळा प्रत्येकी ,नव नंदी 4 वेळा ,एकादश रुद्र ,4 कुंभ 3 वेळा इ.करवून घेतल्यावर आज 37 व्यांदा काशीत असताना आमचेअध्यात्मिक मित्र श्री अजित पानसे यांनी आठवण केल्यावर लक्षांत आले,कन्फर्म केले ते शिबंदू लाहीरीच्या,शामाचरण यांची परंपरा चालविणारे त्यांचे पणतु ,यांच्या घरी, जेथे आजही शामाचरण यांच्या अस्थी आहेत,गेल्या वर.)
31 तारखेला या गुफेत गेलो पण ती बंद असते व फक्त मंगळवारी उघडेल हे कळले ,थोडा विरस झाला पण पुढल्यावेळी मंगळवार पाहून बोलावं म्हणून आदी भैरविस प्रार्थना केली.
पुढील प्रवासास 4थ्यांदा अयोध्या गाठली.पण वैशाख वणवा पेटला होता तावून सुलाखून निघत होतो,रात्रीस ही शरीर गरम राहत होते रात्रवारा गरम वाफा सोडत होता.जीव लाही लाही होऊन पाणी पाणी करत होता.अगदी ब्रॉइलरमध्ये शरीर टाकल्यासारखं वाटत होतं. सर्वांच्या तब्बेतीवर परिणाम होत होता.म्हणून लगेच परतीचे टिकेट्स मिळते का ते सर्वोत्तपरी पाहिले पण .......
फक्त वाराणशीचेच तिकीट मिळाले मग पुन्हा वाराणशी तच आदी माया आदीशक्ती नेच,प्रार्थना पूर्तीसाठी, खेचून आणले जणू.व भो आश्चर्यम नेमका मंगळवारच गाठला गेला,खरंचआदी माया शितला आईने प्रार्थना स्वीकारून लगेचच बोलावून घेतले.
मग काय सकाळी 6 वाजता घाटावर तीर्थ स्नान केले व जाऊन बसलो गुफेत. गुफेत एकूण पांच भाग आहेत. प्रथम भागात काळ भैरव आहेत ,मग थोडे उजवीकडे सरकलो तर मंगलागौरीच दर्शन,त्या नंतर मुख्य आदी माया दक्षिणा भैरवी शितला यांची गुफा.ती दक्षिण मुखी आहे म्हणून दक्षिणा भैरवी.
चांगली तास दीडतास सारी 'मन'भर,पोटभर साधना के ली,सारे वातावरण भारावले ले होते ,मी व सावंत यांनी साधना केली नाथबा 5 मिनिटांत बाहेर गेले.तिथेच एक बुढि माई शेजारी बसली होती ती रोज तिथे येते असं म्हणाली ती शितला मातेचं गुण गान करीत होती तिला 50 रु दक्षिणा देऊन आदी भैरवी दक्षिणा बुढी बडी शितलामातेस सेवा द्यावी अशी विनंती केली.
आणि मग लक्षांत आले की ही शितला बडी माई व बुढी माई म्हणून ओळखली जाते.
व ती आदी अनादी आहे. अगदी गंगा अवतीर्ण होण्या आधीपासून येथे आहे. दक्षिणा दिल्यावरच आपली सेवा पूर्ती होते व आपण फलप्राप्तीचे हकदार होतो म्हणूनही हि दक्षिणा भैरवी आहे हेहि लक्षांत आले.मग काय !ताडकन माहेशरावांना पैंसे देउन विनंती केली कि दिवा,फुले,नारळ,दूध,वस्त्र मिळेल ते आणा.त्यांच्याही सारे लक्षात आले व त्यांनी सारे सामान आणले, आदि मायेस ते अर्पण केले.देवीस शरणागत भावाने नमस्कार करून निघालो तर आणखिं एक गूढ दिसले ..............
To be continued
$@π√∆¥ #♀πk@£$€
shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com
काशी येथील अतिप्राचीन गुफा जेथे बाबाजी ,त्यांची मृत्युंजय बहिण नागलक्ष्मी व शामाचरण यांची भेट झाली.©:
भाग 2: बाबाजी ,महाशय ,नागलक्ष्मी भेंट।
Comments
Post a Comment