एके काळचा लंकाधिपती,व आताचा ;भंडारी:कुबेर©

एके काळचा "लंकाधिपती",व आताचा खजिनदार "भंडारी":कुबेर©
:शिवंजय डॉ संजय होनकळसे//$hivanjay':$@π√∆¥  #"0"πk@£$€.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2509879739027688&id=100000170606055



भारतीय धर्मशास्त्र व अध्यात्म शास्त्र हे सुयोग्य, पद्धतशीर,व्यापक ,तर्क व शास्त्रशुद्ध आहे. सर्वांभूत सर्वसाक्षी,सर्व व्यापक परमेश्वर व वसुधैव कुटुंबक्कम या तत्वांधारीत आपली परमेश्वरी संकल्पना आहे व तशी कुठेचं नाही ,त्यातून हळू हळू ती जगायिक पातळीवर सार्वत्रिक होत आहे , त्यासाठी आपणास कट्टरता वाद करावा नाही लागत.आपला धर्म Universal आहे .
म्हणून मी नेहमी म्हणतो:
" काही धर्म एकेश्वरवादी आहेत"
काही धर्म अनेकेश्वरवादि आहेत ,
तर आपला धर्म फक्त ईश्वर ="सर्वेश्वरवादि" आहे" .सर्वांभूती परमेश्वर.
*According to some there is Only ONE GOD,
WHILE SOME FEEL THERE ARE MANY GODS,
BUT ACTUALLY  THERE is "ONLY GOD"."
"$hivanjay':$@π√∆¥  #"0"πk@£$€.
तर परमेश्वर चराचरांत आहे ,म्हणूनच आपण त्यास विविध रुपान्त पूजतो जसे नाग(पंचमी),बैल(पोळा),गंगा(दश हरा),वट(पूर्णिमा)अग्नी(होलिकापोर्णिमा)अन्न (शाकंभरी पौर्णिमा),व्यापार व कृषी (दिवाळी),धन (लक्ष्मी पूजन) विद्या -सरस्वती पूजन ( दसरा),शक्ती (नवरात्र), पितर पूजा पितृपक्ष आणि मेडिसिन,औषधे(धन्वंतरीपूजन) आणि ,कुबेर (दिवाळी).
कुबेर हा लक्ष्मीचा धनाचा खजिनदार - भंडारी.त्याचीही पूजा करावी कारण लक्ष्मी अस्थिर आहे, चंचल आहे.
कुबेर तिला स्थैर्य देतो, बरकत देतो म्हणून दिवाळीस नुसती लक्ष्मीच नाहीतर लक्ष्मीकुबेर पूजन करतात.या कारणाने व खालील आणखीन दोन कारणांमुळे कुबेर हा माझ्या जिव्हाळ्याचा व कवतुकाचा विषय झालाय.
गेली 34 वर्षे दर प्रदोष तिथीस शिवाचे षोडशोपचार पूजन करताना नेहमी कुबेराचे आयुष्याचे कथा वाचत आलोय.
तसेंच गेली अनेक वर्षे दर वर्षी मी बद्रीनाथ दर्शनास जातो तेथे मंदिरात कुबेरपण स्थापित आहेत त्यांना विशेष नमन व पूजा मी  मजबरोबरील सहका-यांसह करतो. व समोरील कुबेर पर्वतास नमन करतो जेथे भंडारी कुबेराचे राज्य अधिपत्य आहे. असं म्हणतात की तेथे कुणी वर पर्वतावर जाऊ शकत नाही. प्रयत्न करणारे अपयशी, आंधळे,लुळे होतात.भारतातील अनेक गूढ गुह्यांपैकी हे आहे.
हे ठीकाण उत्तरेस आहे कारण कुबेर हा उत्तराधिपती आहे अष्टदिकपालांपैकी तो उत्तरेचा दिक्पाल आहे.
असा हा धनसम्राट उत्तराधिपती पूर्वी लंकाधिपती होता,लंकेश होता.त्याला तेथून कारस्थानाने घालवले गेले त्याची मजेशीर कथा भविष्य पूराण व नर्मदा पुराणात उदघृत आहे.त्यासाठी कुबेराची वंशेतीहास पाहणे मजेचे ठरेल.
चलाा तर जाऊया सत्य व त्रेतायुगात......पाहूया कुबेराचा लंकाधीपती होण्याचा व नंतर कफल्लक होऊन "भंडारी" होण्याचा प्रवास.
कुबेर हा ब्रह्मदेवाचा पणतू ,पोलत्स्य ,जो  ब्रह्माचा पुत्र,याचा नातू व पोलत्स्य पुत्र विश्रव्याचा मुलगा ,भारद्वाज ऋषींची मुलगी इदविदा हि त्याची आई व सुमाली या राक्षसाची मुलगी कैकसी हि त्याची सावत्र आई.
विश्रव्याचा कुबेर हा जेष्ठ पुत्र व कैकसी पासून त्यास तीन मुले व दोन मुली असे पांच अपत्य ,कुबेर धरून सहा.लंका हि विश्रव्याची राज्य नगरी ,जेष्ठ पुत्र असल्याने विश्र्वयाने आपले राज्य व कारभार कुबेराच्या हवाली वारसाहक्क म्हणून दिले .अशा रितीने  कुबेर हा लंकाधिपती ,लंका नरेश झाला,त्याच्या दिमतीस पुष्पक विमान होते..इथपर्यंत सारे आलबेल होते पण त्याच्या सावत्र भावंडामुळे इथे माशी शिंकली.व कुबेरांस लंकेतून बाहेर काढले गेले तेही बळजोरीने. .असे काय झाले असेल कि त्याला लंका सोडुन वेडापिसा होऊन दर दर भटकावे लागले व नैराश्याच्या गर्तेत अडकावे लागले?
याला कारण झाला कुबेराचा सावत्र भाऊ कैक्सीचा जेष्ठ पुत्र रावण. होय रावण हा विश्र्वयाचा कनिष्ठ पत्नी कैक्सीचा मोठा मुलगा पण कुबेरास धाकटा .कुंभकर्ण ,बिभीषण व कुंभाषिणि व शूर्पणखा या मुली.
कुबेराचे लंकाधिपती होणे रावणांस अन्याय कारक वाटले तो शिवभक्ती व वरदशंकर पूजन व तप करून  शिवाशीर्वाद मिळवून ताकतवर व दशानन झाला.
शक्तीचा प्रयोग मग त्याने कुबेरावर केला व स्वारी करून त्यास लंकेतून निर्वाचित केले व अशा रीतीने रावण लंकाधिपती झाला व कुबेर राज्यहीन व निराश झाला.नैराश्यग्रस्त असताना त्यास आत्महत्येचे विचार येऊ लागले .अश्या अवस्थेत त्यास नारदाने मदत केली व सांगितले की रावणा प्रमाणे तुही शिउपसना ,तप व वरदशंकर पूजन कर.
मग काय कुबेर नारदाच्या उपदेशानुसार गुजरात येथे  नर्मदा किनारी करणाली या तीर्थ स्थानी जाऊन पूजन तपस करू लागला .नर्मदेतीरी नर्मदामैय्याच्या कृपासाक्षीने अनेक ऋषी मुनी साधू संत एवढेंच काय देव व दानावानीही आपला उध्दार  करवून मान्यता प्राप्त केलीय.
तशीच कृपाप्रसादाचा धनी कुबेर झाला तोही या नर्मदा तीरीच.यांच करणाली येथे नर्मदा पिता शंकर कुबेरांस प्रसन्न झाले व त्याला  उत्तर दिशेच स्वामित्व दिलं व देवांचा खजिनदार बनवले .कुबेर येथे भंडारी झाला व म्हणून येथे कुबेराचे स्थान  कुबेर  भंडारी म्हणून प्रसिद्ध झाले व शिवशंकर कुबेर भंडारी रुपस्थ येथे स्थानापन्न आहेत.सुंदर मंदिर आहे .नर्मदा परिक्रमा करताना 2011 ला व मग कठ घड्याच्या कैवल्याधामच्या अविनाश देशमुख व त्यांचे द्वारे आयोजित 2018 साली नर्मदा परिक्रमेत दर्शन सेवा केली. पण परीक्रर्मेत आयोजक व वेळेच्या मर्यादांमुळे पुरेसा व पूर्ण आनंद घेता नाही आला म्हणून तेथे जाऊन राहण्याची इच्छा झाली. ती अजून  पूर्ण व्हावयाचीय पण आमचे गेली 5 दशके मैत्री असलेले ज्येष्ठ मित्र श्री संजय केळकर ,ex commissioner यांची येथे यायची इच्छा असल्याने त्यान्च्या बरोबर व त्यांच्या मुळे परत योग आला.मनःपूर्वक ,शांत ,प्रसन्नचित्ते गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतले ,छान  वाटले.खरोखरच हे भांडार आहे येथे सतत दिवसभर भंडारा  सुरु असतो.परिक्रमा वासी व दर्शनार्थी लाभ घेत असतात.सुंदर प्रसाद भोज व इतर प्रसाद याचे सतत वाटप होते. तर अशा रीतीने येथे कुबेर ,कुबेर भंडारी झाले.
असे हे कुबेर भंडारी स्थान ,पण याचे माहात्म्य येथे संपत नाही .कुबेराची हि उन्नती पाहून रावण परत मत्सर पावला व त्याने पुष्पक विमानात बसून पुन्हा आपल्या भावावर आक्रमण केले त्यामुळे कुबेर पुन्हा येथे येऊन शंकराची आराधना करता झाला.
त्याच्या संरक्षणासाठी शंकराने कुबेरास भगवती अंबेची आराधना करवून घेऊन या क्षेत्रास व कुबेरास संरक्षण दिले त्यामुळे इथे दर्शनास गेल्यास ,विशेषतः आमवास्येस ,सुख समाधान संतान प्राप्ती होते असे वरदान आहे,व तसा अनुभव आहे.
अशा या कुबेर भांडारीची सेवा कृपाशीर्वाद सतत लाभो हि प्रार्थना करून हि कुबेर सेवा सर्व वाचक नारायणास सादर करतो.
इदं न मम् ,।शिव संकल्पमस्तु।।
:शिवंजय डॉ संजय होनकळसे©
shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com
drsanjayhonkalse.tripod.com

Comments

Popular posts from this blog

कृष्णसखा उद्धव

पितृशास्त्र भाग 10:"पितृपक्ष: निषिद्ध कार्य :चुकून नका करू हे  काम*

केल्याने देशाटन.......|