Posts

Showing posts from July, 2013

योनी तंत्र ,भक्ती, श्रद्धा यांचा ज्वलंत व जिवंत त्रिवेणी संगम : नीलांचल पर्वतारूढ कामाख्या देवी :डॉक्टर संजय होनकळसे "शिवंजय" drsanjayhonkalse@gmail.com

Image
योनी तंत्र ,भक्ती, श्रद्धा यांचा ज्वलंत व जिवंत  त्रिवेणी संगम :       नीलांचल पर्वतारूढ  कामाख्या देवी :डॉक्टर संजय होनकळसे "शिवंजय"                drsanjayhonkalse@gmail.com आजपर्यंत सारा  भारत  व सर्व प्रमुख  तीर्थ स्थळांच्या दर्शनाचा लाभ व आनंद होऊनही ईशान्य भारतास भेट देण्याचा योग तीव्र  इच्छा असूनही काही येत नव्हता.अगदी  जलपायगुडी ,दार्जीलिंग नेपाळ,एवढेच काय तिब्बत कैलास ,यात्रा ही  झाली पण जलपाय् गुडी पांसून जवळच असणारया आसाम येथे जाऊ शकलो नाहीं. आसाम ,तेथील  संस्कृती ,उत्सव, ब्रह्मपुत्रेच प्रचंड प्रवाह्पात्र , हत्ती, जंगले ,ब्रह्मपुत्रेचा पात्राचा शून्य खर्च वाहतूक उपयोग ,चेरापुंजीचा जगप्रसिद्ध पाऊस या सर्वांचा उल्लेख ' वाहतुकीचे अर्थशास्त्र ' शिकवताना   आवर्जून व  वारंवार करीत असें.    अशा या ईशान्य भारताच्या प्रवासाचा योग आला तो युथ होस्टेल च्या निमित्ताने  व मी ईशान्य भारताचे प्रवेश द्वार गुवाहाटी येथे पोहोचलो ...

दिव्य व दैवी प्रेमाची रक्तलांछित भूमी: तेजपूर,The city of the blood. डॉक्टर संजय होनकळसे: "शिवंजय":drsanjayhonkalse@gmail.com

Image
दिव्य व दैवी प्रेमाची रक्तलांछित भूमी: तेजपूर,The city of the blood.   डॉक्टर संजय होनकळसे: "शिवंजय": drsanjayhonkalse@ gmail.com ( हे 'रक्तलांछितपण' लादले गेले ते पांच हजार वर्षांपूर्वी कलियुगाला सुरुवात झाल्यावर.जेंव्हा कलियुगातील पहिले ऐतिहासिक प्रेम (First   historical love story of   moderntimes ) आणि पहिला प्रेम विवाह (First love marriage ) झाला .हा नुसता प्रेम विवाह नव्हता  तर गुप्त प्रेम विवाह होता ज्यात वराने वधूस नव्हे  तर वधूने वरांस पळवून विवाह केला होता.एवढाच नव्हे तर या विवाहाचा थेट संबंध येतो तो महाभारताचा खरा हिरो,युगंधर कृष्ण व  कुटुंबाशी. या विवाहानिमित्ताने घनघोर युद्ध होऊन रक्ताचे  पाट वाहिले गेले होते,म्हणून तेजपूरहे नाव पडले.) ईशान्य भारताच्या भेटीत "काझीरंगा " राष्ट्रीय उद्यानात दोन दिवस जंगल सफारी केली.त्यानंतर आसाम-अरुणाचल सीमेला  लागून असलेल्या आसामच्या सोनीतपूर   जिल्ह्यातील  "तेजपूर"ला जाण्याचा लाभ पदरी पडला. पूर्व हिमालयाच्या पायथ्याशी वसलेले सुंदर व तेवढीच सुंदर निगा राखली जाणारे शहर... तेजपूर!! ब्रह्म...