क्षणभंगुर जीवनात अक्षय आशा :अक्षय तृतीया:
क्षणभंगुर जीवनात अक्षय आशा :अक्षय तृतीया: डॉक.प्रा. संजय होनकळसे नास्ति क्षयो यस्या सा अक्षया | अर्थात जिचा क्षय होत नाहीं ती अक्षय आणि जेष्ठ महिन्याच्या "जया" तिथीला म्हणजे तृतीये ला येते ती अक्षय तृतीया.या दिवसात असलेल्या खगोलशास्त्रीय व हवामानातील स्थितीवरून लक्षात येईल की या तिथीचे काय शास्त्रीय महत्व आहे ते.आपले सणवार हे नुसते मिथ्या वा परंपरा,अथवा अंधश्रद्धा नसून त्यामागे किती विचारपूर्वक शास्त्रीय व आध्यात्मिक बैठक आणि सांगड आहे हे लक्षात येईल. अक्षय तृतीया वैशाख महिन्यात येते तेंव्हा सूर्य मेष राशीत असतो, म्हणजे सौर वर्षाची सुरुवात होते.याला "बैसाखी"म्हणून उत्तरेकडील राज्यात ओळखले जाते."बिहू"म्हणून ईशान्य भारतात,"विशू"म्हणून दक्षिणेस साजरी होते.मेष ही सूर्याची उच्य राशी .सूर्य तप्त त्यात मेष अग्नी रास त्यामुळे वणवा असतो त्यालाच आपण वैशाख वणवा म्हणतो. सूर्य आत्म तत्व दर्शवतो त्यामुळे या योगावर आत्म बळ चांगले असतें.त्याचप्रमाणे प्रमाणे या दिवशी वृषभ राशी असतो , जर का ती रास व चंद्र रोहिणी अथवा कृत्तिका नक्षत्र मय असेल तर चंद्र ...